दमदार फीचर्ससह 4th Generation 2021 Skoda Fabia बाजारात दाखल

स्कोडाने (Skoda Auto) आपली 4th Generation 2021 Skoda Fabia ही कार लाँच केली आहे. प्रागमध्ये कारचा लाँचिंग सोहळा पार पडला.

दमदार फीचर्ससह 4th Generation 2021 Skoda Fabia बाजारात दाखल
2021 Skoda Fabia
Follow us
| Updated on: May 05, 2021 | 5:54 PM

प्राग : स्कोडाने (Skoda Auto) आपली 4th Generation 2021 Skoda Fabia ही कार लाँच केली आहे. प्रागमध्ये (Prague – Czech Republic ची राजधानी) या कारचा लाँचिंग सोहळा पार पडला. नवी फॅबिया आकाराने थोडी मोठी आहे. यामध्ये कम्फर्ट फीचर्स आणि अनेक लेटेस्ट सिक्योरिटी तसेच हेल्प सिस्टिम्सचा समावेश करण्यात आला आहे. (2021 Skoda Fabia breaks cover globally, no plans to launch in India soon)

स्कोडा फॅबियाचा व्हीलबेस 94 mm वाढून 2,564 mm इतका झाला आहे. ज्यामुळे प्रवाशांना अधिक जागा मिळते. नवीन फॅबियाची रुंदी देखील 48 मिमीने वाढून 1,780 मिमी इतकी झाली आहे. स्कोडा ऑटोचे (Skoda Auto) मुख्य कार्यकारी अधिकारी थॉमस शेफर म्हणाले की, लेटेस्ट जनरेशनमध्ये आवश्यक असे सर्व फीचर्स देण्यात आले आहेत. त्यामुळे ही कार तिच्या प्रतिस्पर्ध्यांशी स्पर्धा करण्यास सज्ज आहे. नवीन फॅबिया उत्तम कनेक्टिव्हिटी, नवीनतम सुरक्षा प्रणालीच्या तुलनेत अधिक दमदार आहे.

2021 स्कोडा फॅबियामध्ये खास बदल

एलईडी तंत्रज्ञानासह नवीन हेक्सागोनल ग्रिल आणि एलईडी हेडलाइटसह ही कार लोकांचं लक्ष वेधून घेते. कारच्या मागील बाजूस, दोन एलईडी टेललाइट्स आहेत. स्कोडाने प्रीमियम पॅकेजमध्ये डोर मिरर कॅप, फ्रंट ग्रिल आणि छताभोवती ग्रॅफाइट ग्रे आणि काळा रंग वापरला आहे. 2021 फॅबियाचे व्हेरिएंटनुसार 14 इंच ते 18 इंच आकाराचे टायर आहेत.

नवीन फॅबियामध्ये 9.2 इंचाचा इंफोटेनमेंट डिस्प्ले देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, फॅबिया वैकल्पिकरित्या 10.25 इंच व्हर्च्युअल कॉकपिटसह सुसज्ज केली जाऊ शकते. इन्फोटेन्मेंट स्क्रीन जेश्चर कंट्रोल आणि व्हॉईस असिस्टंट सारख्या वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे. नवीन ऑक्टाव्हियाच्या पावलावर पाऊल ठेवत फॅबियामध्ये टू-स्पोक मल्टीफंक्शन स्टीयरिंग व्हीलदेखील देण्यात आलं आहे. स्कोडा हॉट एयर आणि हॉट स्टीयरिंग व्हीलसारखे ऑप्शनल फीचर्सदेखील प्रदान करते. दरम्यान ही कार भारतात लाँच करण्याची कोणतीही योजना कंपनीने आखलेली नाही. त्यामुळे भारतीयांना या कारसाठी मोठी प्रतीक्षा करावी लागू शकते.

इतर बातम्या

देशातील सर्वात स्वस्त SUV महागली, Renault Kiger च्या किंमतीत 33000 रुपयांची वाढ

टाटा समूह 60 क्रायोजेनिक ऑक्सिजन टँकर्स एअरलिफ्ट करणार, देशभर 400 ऑक्सिजन प्लांट उभारणार

ऑक्सिजन कंटेनर आणि टँकर्सवर GPS Tracking Device बसवणं अनिवार्य, केंद्राचा मोठा निर्णय

(2021 Skoda Fabia breaks cover globally, no plans to launch in India soon)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.