जबरदस्त फीचर्स आणि शानदार लूक, नवी मारुती सुझुकी स्विफ्ट टर्बो बाजारात
सुझुकीने (Suzuki) सिंगापूरच्या बाजारात नवीन स्विफ्ट स्पोर्ट हॅचबॅक कार (New Swift Sport Hatchback Car) लाँच केली आहे.
सिंगापूर : सुझुकीने (Suzuki) सिंगापूरच्या बाजारात नवीन स्विफ्ट स्पोर्ट हॅचबॅक कार (New Swift Sport Hatchback Car) लाँच केली आहे. या अपडेटेड हॅचबॅकची किंमत 109,900 SGD (जवळपास 60 लाख रुपये) इतकी ठेवण्यात आली आहे. Motul ने नवीन स्विफ्ट स्पोर्टच्या (2021 Suzuki Swift Turbo) लाँचिंगसाठी सुझुकीबरोबर भागीदारीदेखील केली आहे, ज्यामध्ये मर्यादित संख्येने मालक एका वर्षासाठी विनामूल्य लुब्रिकेंट अपग्रेड जिंकतील. सिंगापूर-स्पेक मॉडेलमध्ये 1.4-लीटर, टर्बोचार्ज्ड, इन-लाइन फोर सिलेंडर इंजिन आहे जे 129ps पॉवर आणि 235 एनएम पीक टॉर्क देते. (2021 Suzuki Swift Turbo launched, know price and top features)
या कारचं इंजिन 48V माइल्ड-हायब्रिड प्रणालीसह एकत्रितपणे कार्य करते. ट्रान्समिशन पर्यायांमध्ये 6-स्पीड मॅन्युअल युनिट समाविष्ट आहे. हे पॉवरट्रेन युरो 6 डी एमिशन नॉर्म्सनुसार आहे. या हॅचबॅक कारच्या परफॉर्मन्सबद्दल बोलायचे झाल्यास, स्विफ्ट स्पोर्ट (Suzuki Swift Sport) अवघ्या 9 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास इतका वेग धारण करु शकते. ही कार जास्तीत जास्त 210 किलोमीटर प्रतितास इतक्या वेगाने धावते. त्याच वेळी ही कार प्रतिलिटर सरासरी 21.2 किमी इतकं मायलेज देते.
दमदार फीचर्स
आपण या कारच्या आतील भागाबद्दल चर्चा केली तर आपल्याला एक 7.0 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळेल जी Android ऑटो आणि Apple कार प्ले इंटीग्रेशनसह येते. इन्स्ट्रुमेंट पॅनेलमध्ये 4.2 इंचाचा मल्टी-इन्फो डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याच वेळी, आपल्याला यात इतर अनेक फीचर्सदेखील मिळतात ज्यात कीलेस एंट्री, एलईडी हेडलॅम्प्स / डीआरएल, हॅलोजन कॅमेरा, पुशबटन स्टार्ट स्टॉप, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, रियर पार्किंग सेन्सर्स आणि रियर पार्किंग कॅमेरा देण्यात आला आहे.
शानदार लूक
आपल्याला या कारमध्ये 17 इंचांचा मशीन कट अॅलोय मिळेल. ज्यामुळे या कारला शानदार लुक मिळतो. या कारच्या एक्सटीरियर पेंट थीममध्ये इंटेल सिंगल टोन पर्याय आहे, जो ड्युअल टोन कलर थीमसह येतो.
भारतात कधी लाँच होणार
ही कार भारतात कधी लाँच केली जाईल, याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यास, अशी माहिती मिळाली आहे की, ही कार भारतात लाँच होण्यास बराच वेळ लागू शकतो. ही कार यापूर्वी ऑटो एक्सपो 2020 मध्ये इतर मारुती कार्ससोबत सादर करण्यात आली होती.
इतर बातम्या
शानदार ऑफर! अवघ्या 1.5 लाखात Maruti Suzuki WagonR खरेदीची संधी
(2021 Suzuki Swift Turbo launched, know price and top features)