4 फेब्रुवारीपासून Tata Safari 2021 साठी बुकींग सुरु होणार, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

नव्या बदलांसह भारतीयांची लाडकी कार ऑल-न्यू Tata Safari भारतात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

4 फेब्रुवारीपासून Tata Safari 2021 साठी बुकींग सुरु होणार, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Follow us
| Updated on: Jan 27, 2021 | 4:50 PM

मुंबई : फेब्रुवारीमध्ये लाँचिंगपूर्वी टाटा मोटर्सने नवीन 2021 टाटा सफारी एसयूव्ही (2021 Tata Safari SUV) सादर केली आहे. ही कार मुळात टाटाच्याच हॅरियरचं मोठं व्हर्जन आहे. कंपनीने नुकतीच घोषणा केली आहे की, सफारी एकूण सहा व्हेरियंट्समध्ये सादर केली जाणार आहे. यामध्ये XE, XM, XT, XT+, XZ आणि XZ+ या व्हेरियंट्सचा समावेश असेल. तसेच ईपीबी (इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक) आणि एका मोठ्या पॅनरोमिक सनरूफप्रमाणे काही टॉप फीचर्सना ही कार सपोर्ट करेल. तसेच अधिक नियंत्रणासाठी यामध्ये ESP आधारित टेरेन रिस्पॉन्स मोडही देण्यात आला आहे. या कारच्या बुकिंगला 4 फेब्रुवारीपासून सुरुवात केली जाणार आहे. (2021 Tata Safari: A walkthrough of variants, features, specifications in detail)

या कारमध्ये 7 इंचांची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम एक्सएम ट्रिममध्ये उपलब्ध करुन दिली जाणार आहे. तर ऑटो-सेन्सिंग वायपर्स, ऑटो हेडलँप, टीपीएमएस, आयआरए कनेक्टेड कार अॅपसारखे फीचर्स एक्सटी ट्रिममध्ये उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. हायर-स्पेक ट्रिम XZ मध्ये Letherette सीट्स, Terrain Response System, R 18 machined अलॉय, कॅप्टन सीट्स, Xenon HD प्रोजेक्टर हेडलँप सोबतच अनेक सुविधा दिल्या जाणार आहेत. या करची किंमत 16 ते 24 लाख रुपये असू शकते.

सुरुवातीला या SUV चं नाव Gravitas असं ठेवण्यात आलं होतं. परंतु ही कार ऑल न्यू टाटा सफारी या नावाने सादर केली जाणार आहे. सर्वात आधी ही कार 2020 Auto Expo मध्ये सादर करण्यात आली होती. Tata ची ही फ्लॅगशिप SUV असेल आणि ही 7-सीटर कार असेल. नवीन टाटा सफारी एसयूव्ही OMEGARC (Optimal Modular Efficient Global Advanced Architecture) प्लॅटफॉर्मवर बेस्ड असेल. जो लँड रोव्हर च्या D8 प्लॅटफॉर्मपासून घेण्यात आला आहे.

ऑल-न्यू सफारी ही 5-सीटर हॅरियरचं मोठी व्हेरियंट आहे. ही कार 2019 च्या जिनिव्हा मोटर शोमध्ये सादर करण्यात आली होती. तसेच गेल्या आठवड्यात टाटाने फ्लॅगऑफ सेरेमनीनंतर पहिल्या नव्या Safari चं 26 जानेवारीला आगमन होत असल्याचं जाहीर केलं होतं. या आठवड्याच्या शेवटी ही गाडी शोरूममध्ये उपलब्ध होणार आहे. तसेच लवकरच या गाडीचं बुकिंगही सुरु होणार आहे. टाटा मोटर्सची ही नवी Safari ची इंटेरिअर थीम Oyster White रंगाची आहे. या गाडीत Ash Wood डॅशबोर्डही देण्यात आलंय. याशिवाय या गाडीचे व्हील आणि फ्रंटवर क्रोम फिनिश लूक देण्यात आलाय. टाटा मोटर्सने म्हटलं आहे, “भविष्यात नव्या Safari चं इलेक्ट्रिक व्हर्जनही येऊ शकतं. या गाडीला त्याला साजेसं डिझाईन साकारण्यात आलं आहे.

दमदार इंजिन

या कारच्या इंजिन आणि गियरबॉक्स चा विचार केल्यास या कारमध्ये 2.0 लीटर क्रायोटेक टर्बो डिझेल इंजिन दिले आहे. याचा वापर हॅरियरमध्ये केला जावू शकतो. हे इंजिन 170 एचपीचे पॉवर जनरेट करते. याशिवाय कारमध्ये सिक्स स्पीड मॅन्यूअल आणि सिक्स स्पीड टॉर्क कन्वर्टर ऑटोमॅटिक गियरबॉक्स दिले आहेत. ही कार 4 व्हील ड्राईव्ह सिस्टम सोबत येते.

नवीन टाटा सफारीमध्ये खास बदल

=>> या एसयूव्हीमध्ये काही कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत. जसे की, प्रोडक्शन व्हर्जनमध्ये मोठे हनीकॉम्ब पॉटर आणि क्रोम हायलाईटसह एलईडी प्रोजेक्टर लाईट दिली जात आहे. =>> नवीन सफारीच्या इंजिन आणि डिझाईनमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. आता ही एसयूव्ही पूर्वीपेक्षा अधिक दमदार फिचर्ससह बनवली जात आहे. =>> या कारमध्ये सिग्नेचर-स्टाईल डुअल-टोन डॅशबोर्ड, 3-स्पोक स्टियरिंग व्हील, अँड्रॉयड ऑटो आणि अॅपल कारप्लेसह 8.8 इंचांची फ्लोटिंग इन्फोटेन्मेंट सिस्टिम, व्हॉईस रिकग्नायजेशन, 7-इंचांचा इंस्ट्रूमेंट पॅनल, प्रीमियम ओक मिळू शकतो. =>> या कारमध्ये तपकिरी रंगांची लेदर सीट आणि जेबीएलचे स्पीकर्स दिले जातील. =>> 2021 टाटा सफारी एसयूव्ही बीएस 6-कंप्लिट फिएट-सोर्सड 2.0-लीटर, 4-सिलेंडर डिझेल इंजिनद्वारे ऑपरेट होईल, जे 5-सीटर हॅरियर एसयूव्हीला पॉवर देतं. हे इंजिन 6-स्पीड मॅनुअल गियरबॉक्ससह 6-स्पीड ऑटोमॅटिक टॉर्क कन्व्हर्टरशी जोडलेलं असेल. =>> या गाडीमध्ये तुम्हाला एक्सटिरियर पेंट ऑप्शन आणि नवीन अलॉय व्हील्स मिळू शकतात. =>> नव्या अवतारातील एसयूव्हीमध्ये ग्राहकांना प्रवासाचा जबरदस्त अनुभव मिळेल. या कारचं डिझाईन, परफॉर्मन्स, मल्टी टास्किंग आणि अनेक प्रकारच्या सर्विसेसमुळे ही कार अधिक दमदार बनली आहे.

हेही वाचा

नवीन Tata Safari चे फोटोज लीक, लाडक्या एसयूव्हीचा फर्स्ट लुक पाहा

Renault गाड्यांवर 65 हजारांपर्यंत सूट; ट्रायबर, क्विड आणि डस्टरचा समावेश

भारतीय मार्केटमध्ये टाटाच्या ‘या’ छोट्या SUV चा धुमाकूळ, विक्रीमध्ये 21 टक्क्यांची वाढ

टाटाच्या नव्या Safari चा फर्स्ट लूक, काय आहेत फीचर्स?

(2021 Tata Safari: A walkthrough of variants, features, specifications in detail)

अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.