Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Toyota Fortuner आणि Legender ची रेकॉर्डब्रेक विक्री, प्रीमियम मॉडेललाही भारतीयांची पसंती

टोयोटा मोटर्सने (Toyota Motors) यावर्षी जानेवारी महिन्यात भारतात फॉर्च्युनरचं (Toyota Fortuner) फेसलिफ्ट वर्जन लाँच केलं होतं.

Toyota Fortuner आणि Legender ची रेकॉर्डब्रेक विक्री, प्रीमियम मॉडेललाही भारतीयांची पसंती
Toyota Fortuner, Legender
Follow us
| Updated on: Apr 21, 2021 | 10:19 AM

मुंबई : टोयोटा फॉर्च्युनर (Toyota Fortuner) हे असे नाव आहे, ज्यावर लोकांनी खूप विश्वास दाखवला आहे. टोयोटाने नुकतीच त्यांची कार पूर्णपणे प्रीमियम अवतारात लाँच केली आहे, तरीही ग्राहक पैशांचा विचार टोयोटा फॉर्च्युनरला चांगला प्रतिसाद देत टोयोटाच्या गाड्या खरेदी करीत आहेत. टोयोटाने नुकतीच या वाहनाची अद्ययावत आवृत्ती (अपडेटेड व्हर्जन) बाजारात आणली आहे. तसेच कंपनीने नवीन व्हर्जन Legender कारदेखील लाँच केली आहे. (2021 Toyota Fortuner, Legender sales crosses 5,300 units)

टोयोटा किर्लोस्कर मोटरने (Toyota Motor India) जाहीर केले आहे की, कार लाँच केल्यापासून आतापर्यंत कंपनीने एकूण 5300 युनिट्सची विक्री केली आहे. इतकेच नव्हे तर या सेगमेंटमध्ये दहा टक्क्यांची वाढ झाल्याचेही टीकेएमनेही सांगितले आहे. टोयोटा इनोव्हा क्रिस्टाने या सेगमेंटमध्ये कंपनीच्या कक्षा रुंदावण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

बोल्ड लुक

कंपनीने आतापर्यंत फॉर्च्युनरच्या एकूण 1.7 लाख युनिट्सची विक्री केली आहे. तर नवीन Legender लुक्स आणि डिझाईनच्या बाबतीत Fortuner च्या रेग्युलर मॉडलपेक्षा अधिक स्पोर्टी आहे. यामध्ये डुअल टोन कलर पॅटर्न, शार्प हेडलँप डे टाईम रनिंग लाईट्ससह नवीन बंपर आणि काही कॉस्मेटिक अपडेट्स दिले आहेत. यामध्ये 20 इंचांचं डु़अल टोन अलॉय व्हीलही देण्यात आलं आहे, ज्यामुळे या कारची साईड प्रोफाईल अधिक बोल्ड दिसते.

अशी आहे नवीन Toyota Fortuner

गेल्या वर्षीच्या सुरुवातीला ही अपडेटेड एसयूव्ही थायलंडमध्ये सादर करण्यात आली होती. नवीन फॉर्च्युनर सध्याच्या (रेग्युलर) 2.8L डिझेल इंजिनचं पॉवरफुल व्हर्जन आहे. अपडेटेड फॉर्च्यूनर 201 bhp पॉवर आणि 500Nm टॉर्क जनरेट करते. याच्या ट्रान्समिशनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. अपडेटेड मॉडल 6 स्पीड मॅन्यूअल आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक गियरबॉक्ससोबत आहे. या एसयूव्हीच्या फ्रंट एंडमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. नव्या डिझाईनमध्ये मॅश पॅटर्न ग्रिल, LED DRL सह रिवाइज्ड हेडलँप्स, अपडेटेड फॉग लँप इनक्लोजर, नवे बंपर, सिल्व्हर स्किड प्लेटही आहे. तसेच यामध्ये नव्या डिझाईनसह एलॉय देण्यात आले आहेत.

टोयोटा फॉर्च्यूनर 2021 फेसलिफ्टच्या केबिन मध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. यामध्ये 8 इंचांची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम देण्यात आली आहे, जी अँड्रॉयड ऑटो आणि अॅपल कार प्लेला सपोर्ट करते. तसेच यामध्ये वायरलेस मोबाइल फोन चार्जिंग, एम्बिएंट लायटिंग, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि पॉवर्ड फ्रंट सीट्ससारख्या फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. फेसलिफ्ट फॉर्च्यूनरची किंमत रेग्युलर मॉडेलपेक्षा जास्त आहे.

मॉडेल्सच्या किंमती

1) Toyota Fortuner फेसलिफ्ट- पेट्रोल

>> 4X2 मॅन्यूअल : 29.98 लाख रुपये >> 4X2 ऑटो : 31.57 लाख रुपये

2) Toyota Fortuner फेसलिफ्ट- Diesel

>> 4X2 मॅन्यूअल : 33.48 लाख रुपये >> 4X2 ऑटो : 34.84 लाख रुपये >> 4X4 मॅन्यूअल : 35.14 लाख रुपये >> 4×4 ऑटो : 37.43 लाख रुपये

3) Fortuner Legender फेसलिफ्ट – Diesel

>> 4X2 ऑटो: Rs 37.58 लाख रुपये

फीचर्स

फॉर्च्यूनरच्या नव्या मॉडलमधील स्टँडर्ड व्हर्जनमध्ये Sleek Headlamps, नवे ग्रिल, नवे बंपर स्प्लिटर दिलेले आहे. या सर्व बदलांमुळे जुन्या Fortuner च्या तुलनेत नवी Fortuner अतिशय स्टाईलीश आणि अ‌ॅग्रेसीव्ह अशी आहे. Toyota कंपनीने Fortuner या गाडीचे इंजिन अपग्रेड केले आहे. नव्या इंजिमध्ये जास्त कार्यक्षमता असून नवी Fortuner पेट्रोल आणि डिझेल अशी दोन्ही प्रकारच्या इंधनांवर चालू शकते. 2.7 लीटर Petrol Engine 164 Bhp च्या क्षमतेने 245 Nm च्या Peak टॉर्कची निर्मीती करेल.

इतर बातम्या

Tata Safari Vs Hyundai Alcazar; कोणती SUV अधिक दमदार, कोणाचे फीचर्स टॉप क्लास?

Nissan च्या ‘या’ कारला तुफान मागणी, उत्पादन वाढवण्याचा कंपनीचा निर्णय, दर महिन्याला 3500 गाड्या बनवणार

(2021 Toyota Fortuner, Legender sales crosses 5,300 units)

निधी वाटपात भेदभाव? शिंदेंच्या मंत्र्यांना मिळाला सर्वात कमी निधी
निधी वाटपात भेदभाव? शिंदेंच्या मंत्र्यांना मिळाला सर्वात कमी निधी.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं.
देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात आरोपीच्या मित्रांना पोलिसांनी का घेतलं
देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात आरोपीच्या मित्रांना पोलिसांनी का घेतलं.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला कोणत्या न्यायालयात चालणार?
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला कोणत्या न्यायालयात चालणार?.
खुर्च्यांची अदलाबदल शिंदेंच्या मनातून जाईना...म्हणाले; 'आता फक्त...'
खुर्च्यांची अदलाबदल शिंदेंच्या मनातून जाईना...म्हणाले; 'आता फक्त...'.
विधानभवनाच्या गॅलरीत उद्धव ठाकरेंची फडणवीसांना मिश्किल टोलेबाजी
विधानभवनाच्या गॅलरीत उद्धव ठाकरेंची फडणवीसांना मिश्किल टोलेबाजी.
कराडकडून १५ लाखांची खंडणी? आरोपांवर शिवराज बांगर स्पष्टच म्हणाले...
कराडकडून १५ लाखांची खंडणी? आरोपांवर शिवराज बांगर स्पष्टच म्हणाले....
अजित पवारांची सभागृहात शायरी, म्हणाले; सुभानअल्लाह म्हणायचं नाही..
अजित पवारांची सभागृहात शायरी, म्हणाले; सुभानअल्लाह म्हणायचं नाही...
“सर्वांसाठी घरे”, नवीन गृहनिर्माण धोरण कसं असणार अजित पवार म्हणाले...
“सर्वांसाठी घरे”, नवीन गृहनिर्माण धोरण कसं असणार अजित पवार म्हणाले....
संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणार
संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणार.