2022 Maruti Ertiga चे व्हेरिएंट, कलर ऑप्शन्स लीक, कस्टमाईज इंटीरियर-एक्स्टीरियर मिळणार
मारुती सुझुकी (Maruti Suzuki) न्यू जनरेशन अर्टिगा एमपीव्ही (Ertiga MPV) लाँच करण्याची तयारी करत आहे, जी पुढील आठवड्यात देशात विक्रीसाठी उपलब्ध होईल.
मुंबई : मारुती सुझुकी (Maruti Suzuki) न्यू जनरेशन अर्टिगा एमपीव्ही (Ertiga MPV) लाँच करण्याची तयारी करत आहे, जी पुढील आठवड्यात देशात विक्रीसाठी उपलब्ध होईल. आगामी SUV चे बहुतांश डिटेल्स अद्याप जाहीर केलेले नसले तरी, लाँचच्या आधी व्हेरिएंट आणि रंगाचे पर्याय ऑनलाइन लीक झाले आहेत. लीक झालेल्या (Variants, Colors Leaked) माहितीनुसार, नवीन 2022 मारुती अर्टिगा चार ट्रिम्समध्ये येईल ज्यामध्ये LXI, VXI, ZXI आणि ZXI+ यांचा समावेश असेल. VXI, ZXI आणि ZXI+ ट्रिम्स पर्यायी ऑटोमॅटिक व्हेरियंट ऑफर करतील. याशिवाय, पर्ल आर्क्टिक व्हाईट, स्प्लिंडेड सिल्व्हर, पर्ल डिग्निटी ब्राउन, मॅग्मा ग्रे, ऑबर्न रेड, प्राइम ऑक्सफर्ड ब्लू आणि मिडनाईट ब्लॅक शेड्स यांसारख्या सात रंगांचे पर्याय ग्राहकांना निवडण्यासाठी उपलब्ध असतील. MPV ला CNG आणि टूर व्हेरिएंटदेखील मिळतील जे विशेषतः फ्लीट ग्राहकांसाठी चांगले पर्याय असतील.
नवीन 2022 Ertiga चार ट्रिममध्ये येईल, ज्यामध्ये LXI, VXI, ZXI आणि ZXI+ यांचा समावेश असेल.. VXI, ZXI आणि ZXI+ ट्रिम्स पर्यायी ऑटोमॅटिक व्हेरियंटसह येतील. हुड अंतर्गत नवीन Ertiga मध्ये SHVS तंत्रज्ञानासह नवीन 1.5-लिटर ड्युअल जेट, ड्युअल VVT इंजिन असेल. हे इंजिन पाच-स्पीड मॅन्युअल युनिट किंवा सहा-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक युनिटशी जोडले जाईल.
मारुती अर्टिगाचं एक्सटीरियर
एक्सटीरियरमधील बदलांमध्ये नवीन फ्रंट मेन ग्रिल, नवीन अलॉय व्हील आणि रीमास्टर्ड बंपर यांचा समावेश असेल. या व्यतिरिक्त, आगामी Ertiga वरील इतर प्रमुख बदलांमध्ये नवीन व्हील रंग आणि पॅडल शिफ्टर्ससह काही उल्लेखनीय केबिन ट्वीक्स समाविष्ट करणे अपेक्षित आहे. यासह, यात Apple CarPlay/Android Auto सह Suzuki Connect telematics सह नवीन SmartPlay Pro टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देखील मिळेल.
नवीन MPV चं प्री-बुकिंग 11,000 पासून सुरू झालं आहे, ज्याचे पैसे ऑनलाइन किंवा अधिकृत कंपनी डीलरशिपवर दिले जाऊ शकतात. किमतीच्या घोषणेनंतर कारची डिलिव्हरी लवकरच सुरू होणार आहे.
इतर बातम्या
वाहन प्रवास सुकर होणार! रस्त्यांवरील टोल आणि टॅक्सची माहिती Google Maps वर
Top 5 Electric Scooters: ओला आणि हिरोसह ‘या’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर्सना भारतीय ग्राहकांची पसंती
3 लाखांहून कमी किंमतीत सेकेंड हँड कार, जाणून घ्या कुठे मिळतायत शानदार ऑफर्स