2022 MG Gloster आज लाँच होणार, ‘हे’ आहेत 5 सर्वात दमदार फीचर्स
2022 MG Gloster मध्ये 70 हून अधिक कनेक्टेड फीचर्स असणार आहेत. अपकमिंग कार Toyota Fortuner, Jeep Meridian, Skoda Kodiaq तसेच Mahindra Alturas G4 सोबत स्पर्धा करेल.
2022 एमजी ग्लोस्टर (2022 MG Gloster) आज ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. जुन्या मॉडेलच्या तुलनेत या नवीन मॉडेल्समध्ये अनेक नवीन फीचर्स पाहायला मिळतील. या कारबद्दल आत्तापर्यंत अनेक लीक्स आणि फीचर्स समोर आले आहेत. त्यावरून असे दिसून येते, की कंपनी या कारमध्ये कुठलेही मॅकेनिकल (mechanical) बदल करणार नाही. असे असले तरी अपकमिंग कार जुन्या कारपेक्षा अधिक आकर्षक कशी दिसेल याचीही काळजी कंपनीकडून घेण्यात आली आहे. एमजी ग्लोस्टर ही एसयुव्ही सेगमेंटची (SUV Segment) कार आहे. ही कार फॉर्च्युनरसारख्या पूर्ण आकाराच्या एसयुव्ही कारशी स्पर्धा करते.
75 कनेक्टेड फीचर्स
स्मार्ट इंटेलिजेंट सिस्टमअंतर्गत नवीन एसयुव्ही कारमध्ये 75 कनेक्टेड फीचर्स उपलब्ध असतील. याच्या मदतीने, युजर्सना एक चांगला ड्रायव्हिंग अनुभव मिळतो. या कारमध्ये सेफ्टी आणि लक्झरीयस अशा दोन्हींची काळजी घेण्यात आली आहे. 2022 MG Gloster ची कनेक्ट केलेली फीचर्स युजर्सना त्यांच्या लाईफस्टाईलनुसार नवीन फीचर्स आणि सोयीसुविधा देतात.
2022 MG Gloster Remote System
2022 MG Gloster मध्ये येणार्या काही खास फीचर्सच्या मदतीने, युजर्स कारमधील रिमोटमध्ये ऑडिओ AC आणि मूड लाइटसह स्मार्ट फीचर्स देखील वापरु शकतात. अॅपल वॉच युजर्स iSmart फीचरच्या मदतीने कारशी कनेक्ट होऊ शकतात. तर अँड्रॉइड देखील लवकरच सपोर्ट करेल, अशी सोय करण्यात येणार आहे.
2022 MG Gloster चे इंजिन
2022 MG Gloster च्या इंजिन सेटअपबद्दल बोलायचे झाले तर त्यात सध्याच्या व्हेरिएंटसारखेच इंजिन आहे. या नवीन कारमध्ये 1 ADAS आधारित फीचर्स देण्यात आली आहेत.
रोड टेस्टींगदरम्यान स्पॉट
2022 MG Gloster कार या वर्षी रोड चाचणी दरम्यान स्पॉट झाली आहे, त्यामुळे कारचे डिझाइन आणि बॉडी स्टाइल सहज ओळखता येते. मात्र, कलर व्हेरियंट आदींबाबत माहिती समोर आलेली नाही.
या कारशी स्पर्धा
2022 MG Gloster आज लाँच होईल. सध्याच्या व्हेरियंटच्या तुलनेत या कारची किंमत किती आहे, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती नाही, परंतु ही नवीन SUV कार Toyota Fortuner, Jeep Meridian, Skoda Kodiaq तसेच Mahindra Alturas G4 यांच्याशी स्पर्धा करेल.