कितीवेळा पंक्चर झाल्यावर टायर बदलवणे आवश्यक? नाही बदलले तर भररस्त्यात होतो मनस्ताप

Tyre Punctures | वारंवार टायर पंक्चर होत असले तरी अनेक जण ते रिपेअर करुन काम भागवतात. पण सातत्याने टायर पंक्चर होत असेल तर मात्र अलर्ट राहा. कारण तुम्हाला एखाद्यावेळी ही चालढकल महागात पडेल. कितीवेळा टायर पंक्चर झाले तर ते बदलवणे गरजेचे आहे, माहिती आहे का?

कितीवेळा पंक्चर झाल्यावर टायर बदलवणे आवश्यक? नाही बदलले तर भररस्त्यात होतो मनस्ताप
Follow us
| Updated on: Feb 23, 2024 | 3:16 PM

नवी दिल्ली | 23 February 2024 : कार चालविताना अनेकदा टायर पंक्चर होते. जवळपास मॅकेनिक नसेल तर ते दुरुस्त करणे आपल्याला जमत नाही. अशावेळी स्टेफनी उपयोगात येते. अनेक भागात अजूनही अंतर्गत रस्ते चांगले नाहीत. एका शहरातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी रस्ते चांगले नाहीत. अशावेळी वारंवार कारचे टायर पंक्चर होण्याची भीती कायम असते. पण अनेक वाहनधारक वारंवार टायर दुरुस्त करुन तेच दामटवतात. पण असे थिगळं लावलेले टायर किती दिवस कामाला येते, याची शाश्वती नसते. कितीवेळा टायर पंक्चर झालं तर ते दुरुस्त करावं, याची माहिती आहे का ?

कारचे संपूर्ण वजन टायरवर असते. कार रस्त्याच्या मध्येच बंद पडू नये यासाठी टायर चांगले असणे आवश्यक आहे. पण अनेकदा रस्त्यात टायर पंक्चर होतेच. त्यावेळी टायरचे पंक्चर काढून आपण वेळ मारुन नेतो. पण वारंवार टायर पंक्चर झाले असेल आणि तरीही तेच वापरत असाल तर ही तुमच्यासाठी धोक्याची घंटा ठरु शकते.

ट्यूब आणि ट्यूबलेस टायर दरम्यान काय फरक

हे सुद्धा वाचा
  • पंक्चर झाल्यावर ट्यूबवाल्या टायरमधून लागलीच हवा बाहेर पडते. तर ट्यूबलेस टायरमध्ये बऱ्याच वेळपर्यंत हवा असते. पण ट्युबवाले टायर जर दोन तीन वेळा पंक्चर झाले तर त्याचे ट्यूब लवकर खराब होते. पंक्चर करताना मलमपट्टी लावण्यात येते. अनेकदा ही पट्टी पण निघते. त्यामुळे ट्यूब खराब होते. टायरमधील नवीन ट्यूब बदलणे आवश्यक असते.
  • उलट ट्यूबलेस टायर जर पंक्चर झाले तर त्यातील हवा खूप वेळ असते. यामध्ये खिळा घुसला अथवा छोटी वस्तू घुसून पंक्चर झाले तर कार चालक ते स्वतःहून दुरुस्त करु शकतो. हे टायर रिपेअर करणे पण सोपे असते. स्वस्त असते. पण पंक्चर टायर जर जास्तच खराब झाले तर मग ट्यूब आणि टायर बदलणे आवश्यक असते. टायरचा जास्त वापर झाला तर ते लवकर पंक्चर होते.

किती पंक्चरनंतर बदलावे टायर?

टायर वारंवार पंक्चर होत असले तरी पंक्चर काढून अनेकदा ते वापरण्यात येते. ही धकवण्याची कवायत एखाद्यावेळी प्रवासात महागात पडते. सातत्याने टायर पंक्चर झाले तर ते खराब होते. असे टायर फाटण्याची शक्यता अधिक असते. समजा तुमचे टायर 3-4 वेळा वा त्यापेक्षा अधिकवेळा पंक्चर झाले तर ते बदलणे आवश्यक आहे. दोन पंक्चरमध्ये 150 एमएमपेक्षा कमी अंतर असेल तर ते टायर बदलणे योग्य मानण्यात येते.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.