मुंबई : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी कार चालक आणि प्रवाशांना एक महत्त्वाचा संदेश दिला आहे. तुमचा कार प्रवास आता आणखी सुरक्षित होणार आहे. कारण आता 8 सीटर कारसोबत 6 एअरबॅग्स देणे वाहन उत्पादक कंपन्यांसाठी बंधनकारक आहे. रस्ता सुरक्षेसंदर्भातील हा नियम 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू होणार आहे. नवीन नियमांमुळे (New Car Rules)कार कंपन्यांना कारच्या किमती वाढवता येतील. सुरक्षा मानकांचे (Safety Standards) काटेकोर पालन भारतात महत्त्वाचे बनले आहे. मोठ्या कारमधील 6 एअरबॅग वाहनांतील प्रवाशांचे संरक्षण करतील. 8 आसनी (सीटर) वाहनांमध्ये 6 एअरबॅग (Airbag) अनिवार्य करण्याच्या प्रस्तावाला नुकतीच मान्यता देण्यात आली आहे. सरकारने यापूर्वीच सर्व प्रवासी वाहनांना किमान दोन एअरबॅग असणे बंधनकारक केले आहे.
ड्रायव्हरसाठी (चालकासाठी) एअरबॅगची आवश्यकता जुलै 2019 पासून लागू करण्यात आली होती, तर 1 जानेवारी 2022 पासून पुढच्या सीटवर बसणाऱ्या प्रवाशांसाठी (चालकासह) दोन एअरबॅग अनिवार्य आहेत. प्रवाशांना सुरक्षित ठेवण्यासाठी वाहनांमध्ये आणखी चार एअरबॅग्ज अनिवार्य करण्यात आल्या आहेत, जेणेकरून समोरासमोर होणारी टक्कर आणि बाजूने होणारी टक्करींदरम्यान प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण होणार नाही, किंबहुना हा धोका कमी होईल.
मागच्या सीटभोवती दोन एअरबॅग आणि दोन ट्यूब एअरबॅग्ज अनिवार्य केल्यामुळे सर्व प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित होईल. गडकरी म्हणाले की, भारतात कार प्रवास सुरक्षित करण्याच्या दिशेने टाकलेले हे पाऊल आहे. सरकारी आकडेवारीनुसार, 2020 मध्ये महामार्गावर एकूण 1.16 लाख रस्ते अपघात झाले. ज्यामध्ये 47,984 लोकांचा मृत्यू झाला आहे.
एअरबॅग्समुळे कारची किंमत 4,000 रुपयांपर्यंत वाढू शकते. कार उत्पादक कंपन्या कारमध्येच अधिक एअरबॅग्ज बसवू शकतात. पण कार आता तयार आहे, आणि जर तुम्हाला ती पुन्हा बदलायची असेल तर कारची किंमत 50,000 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे.
इतर बातम्या
सिंगल चार्जवर 220 KM रेंज, Komaki DT3000 इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच
सर्वात मोठी चाकं असलेली इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Car Insurance | वाहन विमा घेताय? या गोष्टींकडे करु नका दुर्लक्ष; चांगल्या डीलसाठी रहा आग्रही