रस्ते अपघातावेळी Golden Hour असतो महत्त्वाचा! 60 मिनिटात जे काही घडतं ते..
भारतात गेल्या काही वर्षात रस्त्यांची संख्या दुपटीने वाढली आहे. मात्र अपघाताचं प्रमाण काही कमी झालेलं नाही. दरवर्षी 1.5 लाखाहून अधिक लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही रस्ते अपघाताबाबत चिंता व्यक्त केली आहे. अशा स्थितीत अपघातावेळी गोल्डन अवर किती महत्त्वाचा आहे ते जाणून घेऊयात
देशात रस्त्यांचा विकास झपाट्याने होत आहे. राष्ट्रीय महामार्गांचं रुंदीकरण करण्यासोबत नवे महामार्ग आणि पूल तयार होत आहेत. अनेक ठिकाणी रस्ते वाहतुकीसाठी खुलेही झाले. असं असताना अपघात कमी करण्याचं हेतू काही साध्य झालेला नाही. दरवर्षी देशात 1.5 लाख लोकांना मृत्यू रस्ते अपघातात होतो. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही रस्ते अपघाताबाबत चिंता व्यक्त केली आहे. इतकंच रस्ते अपघातात कोणाचा जीव जाऊ नये यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. एखाद्या ठिकाणी अपघात झाला तर सुविधा वेळेत पोहोचावा यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. रस्ते अपघात झाल्यानंतर एक तासाचा अवधी खूपच महत्त्वाचा असतो. या एका तासाला गोल्डन अवर असं संबोधलं जातं. यावेळी अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना योग्य वेळी रुग्णालयात पोहोचवलं गेलं तर त्याच्यावर वेळीच उपचार होतील. यामुळे जखमी व्यक्तीचा जीव वाचण्याची शक्यता वाढते. तुम्ही रस्ते अपघाताच्या गोल्डन अवरमध्ये काही गोष्टी लक्षात ठेवून जखमी व्यक्तींचा जीव वाचवू शकता. त्याची दुखापत कमी करून योग्य उपाय करता येतील. चला जाणून घेऊयात त्या एका तासाबाबत
गोल्डन अवरमध्ये कसा जीव वाचेल?
- जर रस्ते अपघात झालेल्या ठिकाणी तुम्ही उपस्थित असाल तर जखमी व्यक्ती कशी प्रतिक्रिया देतोय ते पाहा. तो तुमचं म्हणणं ऐकू शकतो किंवा तुम्ही त्याला वाचवू शकता का?
- एक कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून तुम्हाला पहिल्यांदा कार्डियोप्लमोनरी रेसस्टेशनची माहिती असायला हवी. जर तुम्हाला माहिती नसेल तर त्याचा व्हिडीओ तुम्हाला यूट्यूबवर नक्कीच सापडेल. सीपीआरचा फायदा असा आहे की ते व्यक्तीच्या मेंदूला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनची खात्री देते.
- तुम्ही घटनास्थळी उपस्थित असल्यास जखमी व्यक्तीची सुरक्षा सुनिश्चित करू शकता. जर तुम्ही रुग्णाला रुग्णालयात नेण्याच्या स्थितीत असाल तर तुम्ही रुग्णाला रुग्णालयात नेऊ शकता, अन्यथा तुम्ही मदतीसाठी कोणाला तरी कॉल करू शकता.