गेल्या आठवड्यात महिंद्रा & महिंद्राने (Mahindra & Mahindra) आपली नवीन व्हेरिएंटची स्कॉर्पिओ एन (Scorpio-N) लाँच केली. ही कार बाजारात दाखल होणार त्याआधीपासूनच तिची भारतात मोठी चर्चा होती. कारचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स, लूक आदींबाबत भारतीय लोकांमध्ये अत्यंत उत्सूकता बघायला मिळत होती. कारच्या टीझरनंतर कारची संपूर्ण माहिती लिक झाली. लोक खरेदीसाठी या कारची आतुरतेने वाट बघत आहेत. या कारची चर्चा केवळ भारतातच नाही तर शेजारील देश पाकिस्तानमध्येही जोरात सुरू आहे. नवीन लुक आणि फीचर्ससह सादर करण्यात आलेल्या या कारची भारतीयांसोबतच पाकिस्तानमधील लोकांमध्येही (Pakistanis) मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे.
पाकिस्तानमध्ये महिंद्राच्या स्कॉर्पिओ एनबद्दल लोकांमध्ये किती क्रेझ आहे, याचे एक ताजे उदाहरण समोर आले आहे.
सोशल मीडियावर पाकिस्तानातील लोकांच्या प्रतिक्रियांवरून त्यांना या नवीन कारने अक्षरश: वेड लावल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड करण्यात आला असून हा व्हिडिओ आता वेगाने व्हायरल होत आहे. हे पाहता महिंद्राची ही नवी कार आंतरराष्ट्रीय स्तरावरही लोकांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरली आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
पब्लिक रिअॅक्शन यूट्यूब चॅनल ‘पॉपकॉर्न’वर अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये नवीन स्कॉर्पिओ एनबद्दल पाकिस्तानी लोकांची प्रतिक्रिया थक्क करणारी आहे. या गाडीच्या फीचर्स आणि डिझाइनची प्रशंसा केली जात आहे. यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेल्या या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी लोक महिंद्राच्या स्कॉर्पिओ एन एसयूव्हीचे नवीन व्हेरिएंटला पाहून त्याकडे आकर्षिंत झाल्याचे दिसत आहे. लूकची मोठ्या प्रमाणात प्रशंसा करताना दिसतात. काही लोक तिची तुलना टोयोटाच्या फॉर्च्युनरशी करत आहेत. स्कॉर्पिओच्या किमतीची चर्चाही या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आली आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये या कारच्या किमतीबाबत पाकिस्तानी लोकांमध्ये चर्चा दिसून येत आहे. यामध्ये त्याची किंमत 80 लाखांपासून ते एक कोटी पाकिस्तानी रुपयांपर्यंत सांगण्यात येत आहे. या व्हिडिओमध्ये भारतात त्याची किंमत 14 लाख ते 48 लाखांपर्यंत दाखवली जात आहे. वास्तविक, भारताचा एक रुपया पाकिस्तानी 2.59 रुपयाच्या बरोबरीचा आहे. कारची भारतात किंमत 11.99 लाख रुपयांपासून 19.49 लाख रुपयांपर्यंत आहे.
या कारच्या बेस मॉडेलची पाकिस्तानमध्ये सध्या किंमत 31 लाख पाकिस्तानी रुपये आहे. नवीन Scorpio-N बद्दल बोलायचे झाले तर ते Z2 ते Z8 L पर्यंत पाच ट्रिममध्ये उपलब्ध असेल. त्याची सुरुवातीची किंमत 11.99 लाख रुपये आहे आणि टॉप व्हेरिएंटची किंमत 19.49 लाख रुपये आहे.
नवीन स्कॉर्पिओचे बुकिंग 30 जुलै २०२२ पासून सुरू होईल. या कारचे ऑनलाइन बुकिंगही करता येते.
5 जुलैपासून महिंद्राने भारतातील 30 शहरांमधील शोरूममध्ये टेस्ट ड्राइव्हसाठी नवीन स्कॉर्पिओ सादर केली आहे. नवीन स्कॉर्पिओ-एन सध्याच्या स्कॉर्पिओसोबत विकली जाणार आहे. नवीन एसयूव्हीला आधुनिक डिझाइन देण्यात आली असून सध्याच्या मॉडेलपेक्षा ती मोठी दिसत आहे.