volkswagen | महाराष्ट्र हे फॉक्सवॅगन कारचं माहेरघर, पण महाराष्ट्रातील या शहरांची मुंबई-पु्ण्यालाही कार खरेदीत टक्कर

volkswagen | महाराष्ट्र हे फॉक्सवॅगन कारचं माहेरघर, पण महाराष्ट्रातील ही शहरं मुंबई-पु्ण्यालाही कार खरेदीत टक्कर देत आहेत. या शहरातील ग्राहकांनीही आता सुरक्षित कार आणि सर्वोच्च तंत्रज्ञान यांचा विचार करण्याची सुरुवात केली आहे. खरं तरं मुंबई पुण्याला सुबत्तेच्या बाबतीत ही शहरं टक्कर देत आहेत.

volkswagen | महाराष्ट्र हे फॉक्सवॅगन कारचं माहेरघर, पण महाराष्ट्रातील या शहरांची मुंबई-पु्ण्यालाही कार खरेदीत टक्कर
Follow us
| Updated on: Jul 21, 2023 | 6:41 PM

मुंबई : जर्मन तंत्रज्ञान असलेली फॉक्सवॅगन कारचं महाराष्ट्र हे माहेरघर आहे. कारण या कारचं मुख्यालय मुंबईत आहे. या कारच्या इंजीनची निर्मिती पुण्यात होते, तर औरंगाबाद शहरात असेंबली प्लान्ट आहे. फॉक्सवॅगनची सेल्स आणि मार्केटिंग कार्यालय मुंबईत आहे. ही एक सुरक्षित आणि तंत्रज्ञानाने सुसज्ज अशी कार आहे. हे कुणीही सांगेल की मुंबई, पुण्यात या कारची विक्री मोठ्या प्रमाणात होत असेल. पण आश्चर्यकारक गोष्ट अशीही आहे की, महाराष्ट्रातील प्रगतीशील शहरांमध्ये या फॉक्सवॅगन कारची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जातेय. ती शहरं कोणती आहेत हे नक्कीच येथे जाणून घ्या. कारण या शहरांनी मुंबई, पुण्याला कार खरेदीबाबत टक्कर द्यायला सुरुवात केली आहे.

या कारची राज्यभरात १२ प्रमुख शहरांमध्ये विक्री केली जाते. यात १६ विक्री आणि १३ संबंधित सर्विस देणारे सेंटर्स आहेत. देशात १२९ शहरं आणि १७२ विक्री सेंटर्स, तर १२९ सर्व्हिस सेंटर्स आहेत.महाराष्ट्रात फॉक्सवॅगन कारची मोठी मागणी आहे, यात प्रिमियम एसयूव्ही टिगुआनची मोठी मागणी मुंबईत आहे. विशेष म्हणजे फॉक्सवॅगन इंडियाच्या १५ टक्के कार या एकट्या महाराष्ट्रात विकल्या जातात. यात मुंबई,पुणे हे आघाडीवर आहेत. महाराष्ट्रात सध्या सर्वात जास्त विकली जाणारी फॉक्सवॅगनची कार ही ताइगुन आहे.

महाराष्ट्रात सध्या तायगुन सर्वात जास्त विकली जाणारी फॉक्सवॅगनची कार आहे. मुंबई आणि पुण्याला फॉक्सवॅगन कार विक्रीत काही प्रगतीशील शहर जोरदार टक्कर देत आहेत, यात कोल्हापूर आहे. एवढंच नाही कोल्हापूर पाठोपाठ, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, अहमदनगर यासारख्या शहरात ही सुरक्षित आणि आधुनिक तंत्रज्ञानयुक्त कारची मागणी वाढत चालली आहे.

सुरक्षित कार बनवताना तंत्रज्ञान दिवसेंदिवस विकसित करावं लागतं, अपडेट करावं लागतं, यात आर्थिक भार देखील घ्यावा लागतो, पण ग्राहक सुरक्षा आणि पैशांची बचत हे दोन्ही मुद्दे पाहतात. हे सर्व एका रेषेत आणून याचा विचार करुन फॉक्सवॅगनने कारची किंमत रास्त कशी असेल यावर भर टाकला आहे. यात सुरक्षा आणि कारची किंमत कमी कशी असेल याचा एक संयोग करण्यात आला आहे. जिल्हास्तरावर पोहोचण्याआधी सर्व्हिस सेंटर्स वाढवले आहेत, तंत्रज्ञानाची ओळख करुन देण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.