इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारात महिंद्रा आणि टाटांमध्ये वॉर, XUV400 लॉन्च झाल्यानंतर टाटानंही उचललं एक पाऊल पुढे…

टाटा मोटर्स या महिना अखेरीस आपली कार टियागोचे इलेक्ट्रिक व्हेरिएंट लॉन्च करणार आहे. टियागो ही टाटाची तिसरी इलेक्ट्रिक कार ठरणार आहे. यापूर्वी टाटाच्या नेक्सॉन आणि टिगोरने इलेक्ट्रिक मार्केटमध्ये आपला ठसा उमटवला आहे.

इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारात महिंद्रा आणि टाटांमध्ये वॉर, XUV400 लॉन्च झाल्यानंतर टाटानंही उचललं एक पाऊल पुढे...
टाटा टिएगो इलेक्ट्रिक कारImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Sep 09, 2022 | 5:23 PM

देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी असलेली टाटा मोटर्स (Tata Motors) या महिन्याच्या अखेरीस टियागोचे इलेक्ट्रिक व्हेरिएंट लॉन्च करणार आहे. टियागो ही टाटाची तिसरी इलेक्ट्रिक कार ठरणार आहे. यापूर्वी टाटाच्या नेक्सॉन आणि टिगोरने इलेक्ट्रिक मार्केटमध्ये आपला ठसा उमटवला आहे. टाटाच्या घोषणेच्या एक दिवस आधीच महिंद्राने आपली पहिली इलेक्ट्रिक कार (Electric car) एक्सयुव्ही 400 बाजारात आणली आहे. टाटा मोटर्सने शुक्रवारी ‘ग्लोबल इलेक्ट्रिक व्हेकल डे’ निमित्त सांगितले, की टियागो ईव्ही हे नेक्सॉन आणि टिगोरनंतर (Tigor) इलेक्ट्रिक सेगमेंटमधील कंपनीचे तिसरे प्रोडक्ट ठरणार आहे. यानंतर आता टाटाच्या इलेक्ट्रिक कार पोर्टफोलिओमध्ये आणखी एका कारची वाढ झाली आहे.

किंमतीबाबत ग्राहकांमध्ये आकर्षण

कंपनीने टाटा टियागोचे इलेक्ट्रिक व्हेरिएंट आणण्याची घोषणा केली आहे. परंतु याबाबत अद्याप पुरेशी माहिती समजलेली नाही. टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्सचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्र म्हणाले, ‘आजचा दिवस आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. आम्ही Tiago EVसह आमच्या ईव्ही सेगमेंटच्या विस्ताराची घोषणा करत आहोत. कंपनीची Tiago EVची किंमत आणि इतर फीचर्स येत्या आठवड्यात जारी करण्याची योजना आहे.

महिंद्रामुळे टाटा चिंतेत

महिंद्रामुळे टाटांचा ताण वाढणार आहे. भारताच्या इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये टाटा आघाडीवर आहे. परंतु टाटाच्या गडाला धक्का लावण्यासाठी महिंद्रानेही कंबर कसली आहे. महिंद्राने कालच आपली पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही XUV400 लॉन्च केली आहे. त्यामुळे टाटा आणि महिंद्रामध्ये पुढील काळात चांगली स्पर्धा बघायला मिळणार आहे. महिंद्राने 15 ऑगस्ट रोजी आगामी काळात आपल्या पाच इलेक्ट्रिक कारचेही अनावरण केले होते. महिंद्रा 2024पर्यंत बाजारात एक नव्हे तर अधिक इलेक्ट्रिक SUV लाँच करण्यास तयार राहील, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

मारुतीही स्पर्धेत

मारुती सुझुकी इंडिया मिड साइज एक्सयुव्ही बाजारात आणणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या माध्यमातून टाटा आणि महिंद्राला टक्कर देण्याचा मारुतीचा प्रयत्न असणार आहे. मारुतीकडे मिड एसयूव्ही सेगमेंटमध्ये कोणतीही कार सध्या नाही. मारुतीचा एकूण मार्केट शेअर्स 45 टक्क्यांपेक्षा कमी आहे. तो आकडा 50 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा कंपनीचा प्रयत्न असणार आहे.

मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.