लाडकी Tata Safari परत येतेय, लवकरच प्री-बुकिंगला सुरुवात होणार
टाटा मोटर्स कंपनी लवकरच भारतात त्यांचा ‘सफारी’ ब्रँड पुन्हा एकदा सादर करणार आहे.
मुंबई : टाटा मोटर्स (Tata Motors) कंपनी लवकरच भारतात त्यांचा ‘सफारी’ ब्रँड पुन्हा एकदा सादर करणार आहे. आधी या SUV चं नाव Gravitas असं ठेवण्यात आलं होतं. सर्वात आधी ही कार 2020 Auto Expo मध्ये सादर करण्यात आली होती. Tata ची ही फ्लॅगशिप SUV असेल आणि ही 7-सीटर कार असेल. ही कार या वर्षी जानेवारी महिन्याच्या शेवटी लाँच केली जाईल. (All-New Tata Safari may launch in january in India pre-booking may start soon)
या एसयूव्हीसाठी (Tata Safari) लवकरच प्री-लाँच बुकिंग सुरु केलं जाण्याची शक्यता आहे. ऑल-न्यू सफारी ही 5-सीटर हॅरियरचं व्हेरियंट आहे. ही कार 2019 च्या जिनिव्हा मोटर शोमध्ये सादर करण्यात आली होती. टाटा मोटर्सचे हेड शैलेश चंद्र त्यांच्या आगामी एसयूव्हीच्या ऑपचारिक ब्रँडिंगची घोषणा करताना म्हणाले की, “आम्हाला पुन्हा एकदा आमची एसयूव्ही-सफारी सादर करण्याची तयारी करत असताना खूप अभिमान वाटतोय आणि तितकाच आनंदही होत आहे.
हेड शैलेश चंद्र म्हणाले की, सफारी एक मजबूत आणि प्रतिष्ठित ब्रँड आहे. देशातील ग्राहकांनी दोन दशकांहून अधिक काळ या कारला पसंती दिली आहे. या कारचा नवीन अवतार अधिक दमदार आहे. या कारची रचना, कार्यक्षमता, मल्टी टास्किंग, सेवा आणि दीर्घकाळ टिकणारी डेव्हलपमेंट क्वालिटी या एसयूव्हीला पूर्वीपेक्षा अधिक दमदार बनवते. आता आम्हाला या कारच्या लाँचिंगची प्रतीक्षा आहे.”
टाटा सफारी एसयूव्ही OMEGARC (Optimal Modular Efficient Global Advanced Architecture) प्लॅटफॉर्मवर बेस्ड असेल. जो लँड रोव्हर च्या D8 प्लॅटफॉर्मपासून घेण्यात आला आहे. या गाडीमध्ये तुम्हाला नवीन एक्सटिरियर पेंट ऑप्शन आणि नवीन अॅलॉय व्हील्स मिळतील. यामध्ये आतल्या बाजूला सिग्नेचर-स्टाईल डुअल-टोन डॅशबोर्ड, तीन-स्पोक स्टियरिंग व्हिल्स, अँड्रॉयड ऑटो आणि अॅपल कारप्लेसह 8.8 इंचांची फ्लोटिंग इन्फोटेन्मेंट सिस्टिम, व्हॉईस रेकग्नायजेशन, 7-इंच इंस्ट्रूमेंट पॅनल, प्रिमियम ओक दिलं जाऊ शकतं. तसेच गाडीमध्ये तपकिरी रंगाची लेदर सीट, जेबीएल स्पीक्स दिले जातील.
2021 टाटा सफारी एसयूव्ही बीएस 6-कंप्लिट फिएट-सोर्सड 2.0-लीटर, 4-सिलेंडर डिझेल इंजिनद्वारे ऑपरेट होईल. जे 5-सीटर हॅरियर एसयूव्हीला पॉवर देतं. हे इंजिन 6-स्पीड मॅनुअल गियरबॉक्ससह 6-स्पीड ऑटोमॅटिक टॉर्क कन्व्हर्टरशी जोडलेलं असेल.
The Legend, Reborn. The perfect combination of Design, Versatility, Comfort & Performance, is here. The All- New Tata Safari. Get ready to #ReclaimYourLife
Arriving in showrooms this January. pic.twitter.com/Bz3PuR5mp3
— Tata Motors Cars (@TataMotors_Cars) January 6, 2021
हेही वाचा
26 जानेवारीला टाटा जबरदस्त SUV लाँच करणार, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
जानेवारीमध्ये TATA लॉन्च करणार दोन जबरदस्त कार्स, वाचा काय आहे वैशिष्ट्ये आणि किंमत ?
(All-New Tata Safari may launch in january in India pre-booking may start soon)