Lamborghini : केवळ 10 दिवसांत लक्झरी कार लॅम्बोर्गिनीचे विकले गेले सर्व युनिट
लॅम्बोर्गिनी हुराकन टेकनिकाची डिलिव्हरी पुढील वर्षीपासून सुरू होईल. कंपनी 2023च्या पहिल्या तिमाहीच्या शेवटी किंवा दुसऱ्या तिमाहीच्या सुरूवातीस ग्राहकांना डिलिव्हरी करेल. Lamborghini Huracan Technicaची किंमत 4.04 कोटी रुपये असून विशेष म्हणजे तिचे सर्व मॉडेल केवळ 10 दिवसात विकले गेले.
भारत (India) एक असा देश आहे, ज्या ठिकाणी एकीकडे महागाई, बेरोजगारी आदी समस्यांनी लोक त्रस्त झालेले आहेत. तरी दुसरीकडे श्रीमंत वर्ग आहे, ज्याला याची कुठलीही झळ पोहचत नाही. तो आपल्या सुखगोष्टींवर कोट्यवधी रुपयांची उधळण करीत असतो. याचे उदाहरणच द्यायचे झाल्यास, लॅम्बोर्गिनीच्या (Lamborghini) 4.04 कोटी रुपयांच्या स्पोर्ट्स कारचे सर्व प्रकार लाँच झाल्यापासून अवघ्या 10 दिवसांत त्यांची विक्री झाली आहे. लॅम्बोर्गिनी लक्झरी स्पोर्ट्स कारसाठी (Luxury car) प्रसिद्ध आहे. कंपनीने 25 ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे लॅम्बोर्गिनी हुराकन टेक्निका लॉन्च केली. लाँच झाल्यापासून 10 दिवसांच्या आत हुराकन टेक्निकाची सर्व मॉडेल्स विक्री झालेत. नवीन स्पोर्ट्स कार V10 इंजिनसह येते आणि ती 3.2 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग घेऊ शकते. त्याचा टॉप स्पीड 325 किमी प्रतितास आहे.
लॅम्बोर्गिनी हुराकन टेक्निका
लक्झरी स्पोर्ट्स कार दोन सिटींगसह येते. याला रीअर व्हील स्टिअरिंगसह रिअल व्हील ड्रायव्हर पर्याय मिळतो. लॅम्बोर्गिनी हुराकन टेक्निकाला Lamborghini Dinamica Veicolo Integrata (LDVI) सिस्टीम मिळते. इंटिग्रेटिंग व्हीकल सिस्टमद्वारे कार नियंत्रित करता येते. कंपनीने एप्रिलमध्ये लॅम्बोर्गिनी हुराकन टेक्निका जागतिक स्तरावर लाँच केली होती, तर ती अलीकडेच मुंबईत विक्रीसाठी उपलब्ध आहे.
किती मॉडेल्सची झाली विक्री?
सध्या, लॅम्बोर्गिनीच्या स्पोर्ट्स कारसाठी किती बुकिंग झाले आहे किंवा कंपनी किती युनिट्स देईल हे स्पष्ट नाही. परंतु लॅम्बोर्गिनी इंडियाचे प्रमुख शरद अग्रवाल यांनी बिझनेसलाइनशी बोलताना माहिती दिली आहे की भारतात लॅम्बोर्गिनी हुराकन टेक्निकाची डिलिव्हरी पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या शेवटी किंवा दुसऱ्या तिमाहीच्या सुरुवातीला सुरू होईल
मोठा ग्राहक वर्ग
लॅम्बोर्गिनी हुराकन टेक्निकाला लाँच केल्यानंतर 10 दिवसांच्या आत सर्व मॉडेल्सची विक्री करणे ही कंपनीसाठी मोठी उपलब्धी आहे. शरद अग्रवाल यांच्या मते, भारतीय ग्राहकांशी चांगला कनेक्ट असल्यामुळे स्पोर्ट्स कारची मागणी वाढत आहे. ते म्हणाले की, कंपनीने आपल्या ग्राहकांशी अनेक वर्षांपासून जोडलेल्या सहकार्याचा परिणाम म्हणून हुराकनचे सर्व मॉडेल्स एका आठवड्यात विकले गेले आहेत.