Car Accessories : कारमध्ये नेहमी या 6 एक्सेसरीज हव्यात, प्रवासात कधी येणार नाही अडचण

जर आपण आपल्या कारला आणखीन आरामदायी करायचे असेल तर लॉंग ड्राईव्ह जाण्यासाठी त्याचा लूक चांगला करण्यासाठी या एक्सेसिरिजचा उपयोग होतो.

Car Accessories : कारमध्ये नेहमी या 6 एक्सेसरीज हव्यात, प्रवासात कधी येणार नाही अडचण
Car Accessories
Follow us
| Updated on: Aug 19, 2024 | 9:16 PM

Car Accessories : हल्ली दारी चार चाकी कार असणे हे प्रतिष्ठेचे नव्हे तर गरजेची बाब बनली आहे. कार घेणे खूपच सोपे झाले आहे.विविध बॅंका आता कार घेण्यासाठी लोन देण्यास तयार असतात, ईएमआयवर आपण कार विकत घेऊ शकतो. नवीन कार खरेदी केल्यानंतर आपल्याला शोरुममध्ये अनेक पार्ट्स दिले जात नाही. आपल्या कारसाठी खूपच गरजेचे आहेत. हे पार्ट्स असल्याशिवाय आपण कारला आरामात लॉंग ड्राईव्हला घेऊन जाऊ शकत नाही. तसेच या बाह्य एक्सेसरिजने कारचा लुक देखील भन्नाट दिसतो.

कारमध्ये वापरल्या जाणाऱ्या 6 एक्सेसिरिजची माहिती घेऊयात..या एक्सेसिरिज सीट कव्हर वगळून आहेत. चला कारमध्ये वापरल्या जाणाऱ्या पाच एक्सेसिरीज कोणत्या ते पाहूयात…

कारमध्ये नेहमी हव्या या 6 एक्सेसरिज

फोन होल्डर : आजकल स्मार्टफोनचा वापर केवळ बोलण्यासाठी नव्हे तर नेव्हीगेशन, म्यूझिक आणि कॉलिंगसाठी देखील महत्वाचा आहे. एक चांगला फोन होल्डर आपल्याला फोनला सुरक्षित करण्याबरोबर त्याचा वापर आपल्या फायद्यासाठी देखील करीत असतो. आपले हात त्यामुळे फ्रि रहातात. त्यामुळे चांगला मोबाईल फोन होल्डर गरजेचा आहे.

कार चार्जर : लांबच्या प्रवासात तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी संपण्याचा नेहमीच धोका असतो. एक चांगला कार चार्जर तुम्हाला तुमच्या प्रवासात तुमचा स्मार्ट फोनला चार्ज करण्यासाठी मदत करेल.

पोर्टेबल टायर इन्फ्लेटर : टायर पंक्चर होण्याचा धोका प्रवासात नेहमीच असतो. एखाद्या अज्ञात स्थळी तर कारचे टायर पंक्चर झाले तर हे उपकरण तुमचा प्राण वाचवू शकते. पोर्टेबल टायर इन्फ्लेटर तुम्हाला टायरची हवा भरण्यास मदत करेल,वास्तविक आजकल तर ट्युबलेस टायर तुमच्या मदतीला आहेत. या टायरमध्ये पंक्चर झाले तरी तुम्ही हवा भरुन तुमची कार 100 ते 150 किमी पर्यंत वापर करु शकता.

फर्स्ट-एड किट : कारमध्ये प्रथमोपचार पेटी असायलाच हवी, कारण मेडिकल इमर्जन्सी केव्हाही येऊ शकते. आपातकालीन स्थितीत आपल्याला हे मेडिकल किट कामी येऊ सकते.यात बॅंडेज,मेडिकल पट्ट्या, एंटीसेप्टिक औषधे,पेन किलर औषधे, आणि अन्य आवश्यक औषधे असायलाच हवीत.

टॉर्च : जर आपल्याला ग्रामीण भागात जायचे असेल तर रात्रीच्या अंधारात कारमध्ये काही बिघाड झाल्यास दुरुस्ती करण्यासाठी साहित्य शोधण्यासाठी चांगला प्रकाशझोत असलेली बॅटरी आपल्याकडे असायलाच हवी. तुम्ही जंगलातून प्रवास करीत असाल तर जनावरांना घाबरविण्यासाठी देखील कारमध्ये टॉर्च असणे गरजेचे असते.

छोटी हातोडी : कार जर पुरात अडकली तर दरवाजे काही वेळा एअर लॉक होतात. त्यामुळे कारच्या काचा फोडण्यासाठी हातोडीचा उपयोग होऊ शकतो.तसेच एक मोठा मजबूत दोरखंड देखील कारच्या डिक्कीत असायला हवा जर कार बंद पडली तर खेचण्यासाठी उपयोग होऊ शकतो.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.