जगप्रसिद्ध ‘फोर्ड’ कंपनीचा अखेर भारताला अलविदा

| Updated on: Jul 21, 2022 | 1:06 PM

गेल्या काही वर्षांपासून कंपनी मोठे नुकसान सोसत होती. यातून बाहेर पडण्यासाठी कंपनी फोर्ड रिस्ट्रक्चररिंग ऑपरेशन्सचाही भाग बनली. परंतु कंपनीने मागील वर्षी भारतीय मार्केटला बाय बाय केले आहे. फोर्डने चेन्नई प्लांटमधून इकोस्पोर्ट एसयुव्हीचे शेवटचे युनिटला बाजारात आणले आहे.

जगप्रसिद्ध फोर्ड कंपनीचा अखेर भारताला अलविदा
ford
Follow us on

मुंबई: भारतीय ऑटो इंडस्ट्रीमध्ये (Automobile) या वेळी मोठी उलथापालथ होत आहे. अमेरिकेची ऑटो कंपनी फोर्ड मोटरने (Ford Motor) भारताला अखेरचा अलविदा केला आहे. कंपनीने स्थानिक बाजारात आपला प्रवास थांबवला आहे. गेल्या काही वर्षांपासून कंपनी मोठे नुकसान सोसत होती. यातून बाहेर पडण्यासाठी कंपनी फोर्ड रिस्ट्रक्चररिंग ऑपरेशन्सचाही भाग बनली. परंतु कंपनीने मागील वर्षी भारतीय मार्केटला बाय बाय केले आहे. फोर्डने चेन्नई प्लांटमधून इकोस्पोर्ट एसयुव्हीचे (EcoSport SUV) शेवटचे युनिटला बाजारात आणले आहे. गुजरातच्या सानंद आणि तामिळनाडूच्या चेन्नईमध्ये कंपनीचे दोन प्लांट आहेत. सानंद प्लांटमध्ये फीगो, फ्रीस्टाइल आणि ॲस्पायर सारख्या लहान कार्सची निर्मित होते. तर चेन्नइ प्लांटमध्ये फार्ड इकोस्पोर्ट आणि अँडेवर सारख्या एसयुव्हीचे प्रोडक्शन करण्यात येते.

भारत सोडण्याची घोषणा

भारतात फोर्ड कंपनी अनेक वर्षांपासून घाट्यात होती. गेल्या वर्षी 9 सप्टेंबरला फोर्डने भारत सोडण्याची घोषणा केली होती. यात सर्वात आधी सानंद प्लांटला बंद करण्याचा समावेश होता. ऑक्टोबर 2021 मध्ये फोर्ड फ्रीस्टाइलचे शेवटचे युनिट निघाल्यानंतर सानंद प्लांटला बंद करण्यात आले होते. तर, दुसरीकडे कार आणि इंजिनचा एक्सपोर्ट करण्यासाठी चेन्नईचा प्लांट चालू ठेवण्यात आला होता.

इकोस्पोर्टची सुरुवात चांगली

चेन्नई प्लांटमधून इकोस्पोर्टचे शेवटचे युनिट काढण्यासोबतच भारतातील फोर्डचा प्रवास संपला आहे. फोर्ड इकोस्पोर्ट भारतामध्ये सब 4 मीटर एसयुव्ही सेगमेंटमधील सर्वात पहिल्या कारमधील एक होती. याच्या कॉन्सेप्टला 2013 मध्ये दिल्ली ऑटो एक्सपोमध्ये सादर करण्यात आले होते. भारतात इकोस्पोर्टची सुरुवात चांगली राहिली होती. फोर्डजवळ ही एक सर्वात चांगली विक्री होणारी कार होती.

शासकीय मदतीला नकार

मोठे नुकसान होत असल्याने भारतातून काढता पाय घेण्याची घोषणा केल्यावर भारत सरकारने फोर्डच्या मदतीसाठी हात पुढे केला होता. भारत सरकारने प्रोडक्शन लिंक्ड इंसेंटीव्ह स्कीमच्या माध्यमातून ऑटोमोबाईल सेक्टरला प्रोत्साहन दिले होते. तज्ज्ञांच्या मते प्युअल इलेक्ट्रिक व्हीकल कंपनीच्या स्वरुपात फोर्डची वापसी होणार आहे. फोर्डला 20 कंपन्यांमधून निवडवण्यात आले होते, परंतु त्यांनी याला नकार दिला.