सिंगल चार्जमध्ये 120 किमी रेंज, चार तासात बॅटरी फुल चार्ज, शानदार इलेक्ट्रिक स्कूटर Jaunty Plus बाजारात

एएमओ इलेक्ट्रिक बाइक्स (AMO Electric bikes) या भारतातील झपाट्याने विकसित होणाऱ्या इलेक्ट्रिक मोबिलिटी ब्रॅण्डने त्यांची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर/बाइक (Electric Vehicle) जॉण्टी प्लस (Jaunty Plus) लाँच केली आहे. एर्गोनॉमिक डिझाइन, स्टाइल व फीचर्सच्या परिपूर्ण संयोजनासह डिझाइन करण्यात आलेल्या जॉण्टी प्लसमध्ये 60 व्होल्ट / 40 एएच प्रगत लिथियम बॅटरीची पॉवर आहे.

सिंगल चार्जमध्ये 120 किमी रेंज, चार तासात बॅटरी फुल चार्ज, शानदार इलेक्ट्रिक स्कूटर Jaunty Plus बाजारात
AMO Jaunty Plus
Follow us
| Updated on: Feb 07, 2022 | 5:26 PM

मुंबई : एएमओ इलेक्ट्रिक बाइक्स (AMO Electric bikes) या भारतातील झपाट्याने विकसित होणाऱ्या इलेक्ट्रिक मोबिलिटी ब्रॅण्डने त्यांची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर/बाइक (Electric Vehicle) जॉण्टी प्लस (Jaunty Plus) लाँच केली आहे. एर्गोनॉमिक डिझाइन, स्टाइल व फीचर्सच्या परिपूर्ण संयोजनासह डिझाइन करण्यात आलेल्या जॉण्टी प्लसमध्ये 60 व्होल्ट / 40 एएच प्रगत लिथियम बॅटरीची पॉवर आहे. ही बाइक अधिक अंतर कापते, ज्यामधून ग्राहकांना शहरी साहसी राइडचा आनंद घेण्यास प्रोत्साहन मिळते. या ई-बाइकमध्ये हाय परफॉर्मन्स मोटर, क्रूझ कंट्रोल स्विच, इलेक्ट्रॉनिक असिस्टेड ब्रेकिंग सिस्टिम (ईएबीएस), अॅण्टी-थेफ्ट अलार्म आणि चेसिससह सर्वोत्तम फीचर्स देण्यात आले आहेत. इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास टेलिस्कोपिक फोर्क सस्पेंशन, हाय ग्राऊण्ड क्लीअरन्स, साइड स्टॅण्ड सेन्सर, सेंट्रल लॉकिंग, फ्रण्ट डिस्क ब्रेक, डीआरएल लाइट्स आणि इंजिन किल स्विच आदींचा समावेश आहे.

जॉण्टी प्लस सरासरी 120 किमीहून अधिक अंतराची रेंज देते. ब्रशलेस डीसी मोटरसह फास्ट चार्जिंग असलेली ही ई-बाइक जास्तीत जास्त 4 तासांमध्ये पूर्णपणे चार्ज होते. सुधारित सुरक्षितता व स्टाइलसह जॉण्टी प्लसमध्ये मोबाइल यूएसबी चार्जिंग पोर्ट देखील आहे. यामध्ये फिक्स्ड व पोर्टेबल बॅटरी पॅक पर्याय असेल.

नवीनच लाँच करण्यात आलेली ई-बाइक तीन वर्षांच्या वॉरंटीसह येते आणि रेड-ब्लॅक, ग्रे-ब्लॅक, ब्ल्यू- ब्लॅक, व्हाइट-ब्लॅक व येलो-ब्लॅक या पाच आकर्षक रंगांच्या व्हेरिएण्ट्समध्ये उपलब्ध आहे. स्टाइल, कार्यक्षमता व सुरक्षिततेचे परिपूर्ण संयोजन असणा-या या ई-बाइकची किंमत 1,10,460 रूपये एक्स-शोरूम आहे.

एएमओ इलेक्ट्रिक बाइक्सचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक सुशांत कुमार म्हणाले, “आम्हाला भारतीय ऑटोमोटिव्ह बाजारपेठेमध्ये तंत्रज्ञानदृष्ट्या-प्रगत जॉण्टी प्लस सादर करण्याचा आनंद होत आहे. आमच्या इन-हाऊस संशोधन व विकास टीमने संकल्पना मांडण्यासोबत डिझाइन केलेल्या या पर्यावरणास अनुकूल बाइक्समधून दर्जात्मक ईव्ही मोबिलिटी सोल्यूशन्स व सेवा देण्याप्रती आमच्या ब्रॅण्डची कटिबद्धता दिसून येते. स्टायलिश डिझाइन, डिजिटल डिस्प्ले, दर्जात्मक सुरक्षितता वैशिष्ट्ये आणि सानुकूल स्पीड व अधिकतम रेंजने युक्त जॉण्टी प्लस उच्चस्तरीय इलेक्ट्रिक बाइक्सचा शोध घेणा-या ग्राहकांसाठी परिपूर्ण पॅकेज आहे.” ही बाइक 15 फेब्रुवारी 2022 पासून 140 डिलरशिप्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल.

इतर बातम्या

तुमच्या मनात कारचं स्वप्न असेल तर तुमची गाडी तुम्हाला म्हणतेय ‘गाडी बुला रही है…’; किंमत फक्त…

ऑटो इंडस्ट्रीत कहीं खुशी कहीं गम, जानेवारी 2022 मधील विक्रीचे आकडे जाहीर, Mahindra, Tata ची शानदार सुरुवात

लोकप्रिय Tata Nexon आता CNG सह येणार, Maruti Brezza चं सीएनजी व्हेरिएंटदेखील सज्ज

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.