एका बातमीने मार्केट झालं टाईट; Reliance Car मुळे कुणाचे दिवस येणार वाईट, टाटा, महिंद्रा, मारुती-सुझुकीत बैठकांचं सत्र

| Updated on: Sep 07, 2024 | 11:48 AM

Reliance Electric Car : रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने रिलायन्स ईव्ही प्रायव्हेट लिमिटेड नावाने कंपनीची नोंद केली आहे. BYD चे माजी अधिकारी संजय गोपालकृष्णन हे या कंपनीशी जोडल्या गेले आहेत. त्यामुळे ईव्हीच्या बाजारात मोठा स्पर्धक येणार आहे. अनेक कंपन्यांसमोर आव्हान उभं ठाकू शकतं.

एका बातमीने मार्केट झालं टाईट; Reliance Car मुळे कुणाचे दिवस येणार वाईट, टाटा, महिंद्रा, मारुती-सुझुकीत बैठकांचं सत्र
रिलायन्स इलेक्ट्रिक कार
Follow us on

अनिल अंबानी यांचा रिलायन्स समूह इलेक्ट्रिक कार निर्मितीत उतरणार आहे. इलेक्ट्रिक कार निर्मितीत ही कंपनी उतरणार असल्याने इतर कंपन्या सावध झाल्या आहेत. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने (Reliance Infrastructure) इलेक्ट्रिक कार आणि बॅटरी तयार करण्याची योजना आखली आहे. त्यासाठी रिलायन्स इन्फ्राने चीनची लोकप्रिय इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी BYD चे माजी अधिकारी संजय गोपालकृष्णन यांना सोबत घेतले आहे. त्यामुळे बाजाराचे कान टवकारले तर भुवया उंचावल्या आहेत.

वर्षाला 2.5 लाख ईव्ही तयार करण्याचे लक्ष्य

बिझनेस स्टँडर्डनुसार रिलायन्स इंन्फ्रास्ट्रक्चर ईव्ही योजनेवर गंभीरतेने विचार करत आहे. त्यांनी हा प्रकल्प कार्यान्वीत करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यावरील खर्चाचे गणित मांडण्यात येत आहे. या प्रकल्पातून दरवर्षी 2.5 लाख ईव्ही तयार करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. याशिवाय येत्या काही वर्षात प्रति वर्षी 7.50 लाख वाहन तयार करण्याचे उद्दिष्ट गाठण्यात येणार आहे. याशिवाय कंपनी 10 गीगावॅट आव्हर्स (GWh) क्षमतेचा बॅटरी प्रकल्प सुरु करण्याच्या विचारात आहे. त्यानंतर 75 गीगावॅट आव्हर्स क्षमतेची बॅटरी तयार करण्यात येईल. अर्थात या सर्व घाडमोडीविषयी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने अधिकृत कोणतीही माहिती दिलेली नाही. या वृत्तामुळे कंपनीच्या शेअरमध्ये जवळपास 2 टक्क्यांची उसळी आली आहे.

हे सुद्धा वाचा

मुकेश अंबानी पण मैदानात

नुकत्याच समोर आलेल्या घडामोडीनुसार, मुकेश अंबानी हे पण बॅटरी तयार करण्याचा प्रकल्प उभारण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, टेस्ला भारतातील प्रकल्पासाठी मुकेश अंबानी यांना सोबत घेण्याची शक्यता आहे. जर अनिल अंबानी हे या क्षेत्रात पुढे आले तर या दोन्ही भावात व्यावसायिक संघर्ष पाहायला मिळेल. सध्या भारतात एकूण विक्री होणाऱ्या कारमध्ये ईव्ही कारचे प्रमाण अवघे दोन टक्के इतकेच आहे. सरकार हे प्रमाण 30 टक्क्यांपर्यंत वाढवण्याच्या विचारात आहे. त्यासाठी ईव्ही, बॅटरी आणि इतर पार्ट्स उत्पादनाला प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्यासाठी 5 अब्ज डॉलरची योजना तयार करण्यात आली आहे.

रिलायन्स ईव्ही प्रायव्हेट लिमिटेड

रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर त्यांच्या या ईव्ही प्रकल्पासाठी चीनसोबतच इतर सहभागीदारांची चाचपणी करत आहे. कंपनीने त्यासाठी दोन उपकंपन्या स्थापन केल्या आहेत. त्यात एक रिलायन्स ईव्ही प्रायव्हेट लिमिटेड (Reliance EV Private Ltd) आहे. सध्या बाजारात टाटा ईव्ही सर्वात अग्रेसर आहे. कंपनीची या क्षेत्रात 70 टक्के दावेदारी आहे. आता महिंद्रा कंपनी पण ईव्ही बाजारात दाखल झाली आहे. तर मारुती सुझुकी आणि हुंदाई पुढील वर्षात त्यांची ईव्ही कार बाजारात उतरवणार आहेत.