Mahindra Thar 2020 खरेदी करताय? ‘इतके’ महिने वाट पाहावी लागेल
महिंद्रा अँड महिंद्रानेआपली लोकप्रिय ऑफ-रोड एसयूव्ही महिंद्रा ‘THAR 2020’ भारतात (India) लाँच केली आहे.
मुंबई : महिंद्रा अँड महिंद्राने (Mahindra) आपली लोकप्रिय ऑफ-रोड एसयूव्ही महिंद्रा ‘THAR 2020’ भारतात (India) लाँच केली आहे. 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्ताने सेकंड जनरेशन महिंद्रा ‘THAR 2020’चे लाँचिंग पार पडले. भारतात या गाडीची किंमत जवळपास 9.8 लाख रुपये इतकी असणार आहे. तर, महिंद्रा थारचे एलएक्स ट्रिम हे टॉप मॉडेल 12.95 लाखांपर्यंत बाजारात विक्रीस येणार आहे (Mahindra THAR 2020 Launched In India).
महिंद्राने नुकतेच जाहीर केले आहे की, या कारसाठी आतापर्यंत 15 हजारांहून अधिक बुकींग्स झाल्या आहेत. या कारच्या सर्व नवीन मॉडेल्सची डिलीव्हरी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरु करण्यात येईल.
तीन महिन्यांचा वेटिंग पिरियड डिलर्स सुत्रांनी सांगितले आहे की, या कारच्या निवडक व्हेरिएंटसाठी तीन महिन्यांहून अधिक काळ वाट पाहावी लागणार आहे. ऑटोमॅटिक डिझेल व्हेरियंटसाठी सर्वाधिक वेटिंग पिरियड आहे. लोकांना वेळेत डिलीव्हरी देण्यासाठी प्रोडक्शनची क्षमता वाढवली जात आहे.
जुन्या महिंद्रा थारच्या तुलनेत नवीन महिंद्रा ‘THAR 2020’मध्ये बऱ्यापैकी कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत. ग्राहक त्यांच्या पसंतीनुसार पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायांसह नवी महिंद्रा ‘THAR 2020’ खरेदी करू शकतात. या नव्या ‘THAR 2020’मध्ये 4 सीट आणि 6 सीट, असे सीटिंग लेआउट पर्याय देण्यात आले आहेत.
एलएक्स, एएक्स आणि एएक्स (ओ) या तीन ट्रिमसह महिंद्रा ‘THAR 2020’ उपलब्ध होणार आहे. यापूर्वी महिंद्रा थार केवळ एलएक्स आणि एएक्स ट्रिमसह येईल, असे म्हटले गेले होते. मात्र, अॅक्स (ओ) हा व्हेरियंट पेट्रोल आणि डिझेल पॉवरट्रेन पर्यायांसह उपलब्ध करून देण्यात आला आहे.
सेकंड जनरेशन महिंद्रा थारमध्ये पेट्रोल आणि डिझेल इंजिन, असे दोन पर्याय देण्यात आले आहेत. ज्यामध्ये 2.0 लीटर 4 सिलिंडर पेट्रोल इंजिन, जे150 बीएचपी पॉवर आणि 300 एनएम टॉर्क जनरेट करते. तर, 2.2 लीटर डिझेल इंजिनने 130 बीएचपीची पॉवर आणि 300 एनएम टॉर्क जनरेट केले जाते. या नव्या ‘THAR 2020’मध्ये बीएस 6 इंजिन देण्यात आले असून, 6 स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
#TheAllNewThar is here. Starts at ₹9.80 Lakh. Book now: https://t.co/0qbYsCHcfT#ExploreTheImpossible #MahindraThar pic.twitter.com/u1HEtEUgx4
— Mahindra Thar (@Mahindra_Thar) October 2, 2020
सेकंड जनरेशन महिंद्रा ‘THAR 2020’ची वैशिष्ट्ये
सेकंड जनरेशन महिंद्रा थारच्या उर्वरित वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, 9 वेरियंटसह रेड रेज, गॅलेक्सी ग्रे, मिस्टिक कॉपर, रॉकी बेज, नेपोली ब्लॅक आणि अॅक्वामरीन या वेगवेगळ्या रंगात ‘THAR 2020’ लाँच केली गेली आहे.
महिंद्रा ‘THAR 2020’मध्ये 7 इंचाचा टचस्क्रीन इंफोटेनमेंट, अॅडजेस्टेबल सीट, रूफ माउंट स्पीकर्स, क्रूझ कंट्रोल, ड्युअल एअरबॅग, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल, एबीएस, ईबीडी, हिल कंट्रोल, डिजिटल ओडोमीटर, इलेक्ट्रॉनिक मल्टी ट्रिप मीटर, असे फीचर्स देण्यात आले आहेत. महिंद्रा ‘THAR 2020’मध्ये खास चौकोनी एलईडी टेललाईट्स, स्पोक अॅलॉय व्हील्स देण्यात आले आहेत.
संबंधित बातम्या
ठरलं! रॉयल एनफिल्डची बहुप्रतीक्षित Meteor 350 लाँच होणार; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
आत्मनिर्भर भारत! मर्सिडीजच्या कार महाराष्ट्रात असेंबल होणार
Swift limited Edition : शानदार ब्लॅक थीमसह नवीन मारुती स्विफ्ट लाँच
(Are you planning to buy Mahindra Thar 2020, heres how long you might have to wait for delivery)