Artificial Intelligences : आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा आविष्कार…ड्रायव्हरलेस कारची सफर घडणार, ‘या’ देशात झाली सुरुवात

आता ड्रायव्हरलेस कारची चाचपणी सुरु झाली आहे. सध्या एखाद्या ॲपवरुन आपण सहज कॅब बुक करून आपला प्रवास करत आहोत. परंतु या यापुढील टप्पा म्हणजे चक्क ड्रायव्हरलेस कार तुमच्या दारात येणार अन्‌ तुम्हाला हवं त्या ठिकाणी घेउन जाणार आहे. हे पहिल्यांदा ऐकायला अवघड असलं तरी आपल्या शेजारील देशाने याची चाचपणीदेखील सुरु केली आहे.

Artificial Intelligences : आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा आविष्कार...ड्रायव्हरलेस कारची सफर घडणार, ‘या’ देशात झाली सुरुवात
ड्रायव्हरलेस कारImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 30, 2022 | 6:58 PM

Artificial Intelligences : तंत्रज्ञानाच्या जगात रोज वेगवेगळे प्रयोग केले जात आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा (Artificial Intelligences) वापर करून जगात विविध आविष्कार करण्यात येत आहेत. हेच तंत्रज्ञान (Technology) आता सर्वत्र वापरून मनुष्यावरील अवलंबित्व कमी केले जात आहे. आता अशी एक कल्पना करा. तुम्हाला एका ठराविक ठिकाणी जायचे आहे, त्यासाठी तुम्ही नेहमीप्रमाणे एखाद्या ॲपवरुन कॅब बुक केली. निर्धारित वेळेत कॅब आली तुम्ही दरवाजा उघडला तर काय… कॅबमध्ये कोणीच नाही. ही चक्क ड्रायव्हरलेस (driverless) कॅब आहे. आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण होणे साहजिकच आहेत, हे खरच शक्य आहे काय, चालकविरहित वाहन प्रवासासाठी धोकादायक तर नाही ना… परंतु आपल्या शेजारील देश असलेल्या चीनने ड्रायव्हरलेस कॅब सुविधा देण्याला सुरुवात केली आहे. या लेखातून त्याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

रोबोटिक सेवा

चीनमध्ये ऑटोनॉमस ड्रायव्हिंग स्टार्टअप कंपनी Pony.ai ने ड्रायव्हरलेस रोबोटिक सेवा सुरू केली आहे. कंपनीने Baidu या सर्च इंजिनच्या सहकार्याने ही सेवा सुरू केली आहे. Baidu ने अलीकडच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान आणि सेल्फ ड्रायव्हिंगवर जास्त भर दिला आहे. ‘ब्लूमबर्ग’च्या बातमीनुसार, Pony.ai ला या रोबो टॅक्सी सेवेसाठी चीन सरकारकडून परवानाही मिळाला आहे. या टॅक्सीसाठी चालकाची गरज भासणार नाही, असा विशेष उल्लेख परवान्यात करण्यात आला आहे. ग्राहक कंपनीच्या अॅपवरून ही कॅब सेवा बुक करू शकतात. बायडूने याबाबत ट्विटही केले आहे.

हे सुद्धा वाचा

अशी काम करते ही सिस्टीम

ग्राहक कंपनीच्या अॅपवर ड्रायव्हरलेस कॅब बुक करतील. कॅब ग्राहकांपर्यंत पोहोचल्यावर त्याला कारचा क्यूआर कोड स्कॅन करावा लागेल. यानंतर टच स्क्रीनवर कारचे लोकेशन निवडावे लागेल. आणि त्यानंतर कार स्वतः चालेल आणि ग्राहकाला त्याच्या इच्छित स्थळी घेऊन जाईल. यासाठीचे पेमेंटही डिजिटल पद्धतीने केले जाणार आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.