8.85 कोटींची कार लाँच,जेम्स बाँडशी आहे अनोखे नाते, पाहा काय आहेत वैशिष्ट्ये?
भारतात आता लक्झरी आणि स्पोर्ट्स कारची मागणी वाढत आहे.त्यामुळे परदेशी कंपन्या देखील बाजारात उतरत आहेत. अशा ब्रिटीश कंपनी अॅस्टन मार्टिनने भारतीय बाजारात एक नवीन कार लाँच केली आहे.

लक्झरी स्पोर्ट्स कार आणि ग्रँड टुरर कार तयार करणारी ब्रिटीश कार कंपनी अॅस्टन मार्टिन हीने शनिवारी भारतात आपली नवीन कार लाँच केली आहे.अॅस्टन मार्टिन कंपनीने व्हॅनक्विश (Aston Martin Vanquish 2025 ) तब्बल 8.85 कोटींना ( एक्स शोरुम प्राईस ) भारतीय बाजारात उतरवले आहे. अॅस्टन मार्टिन कंपनीने सहा वर्षांच्या मोठ्या अंतराने व्हॅनक्विश मॉडेलला पुन्हा सुरु केले आहे. सप्टेंबर २०२४ रोजी या कारचा जागतिक डेब्यु केला होता. या कारच्या केवळ १००० युनिट्स तयार केल्या जाणार आहेत.त्यामुळे जगातील निवडणक अब्जाधीशच ही काळ खरेदी करु शकणार आहेत.
अॅस्टन मार्टिनच्या या व्हॅनक्विश कारची ग्लोबल डिलीव्हरी साल २०२५ च्या चौथ्या तिमाहीपासून होणार आहे. बाजारात असलेल्या अन्य सुपरकार उदा. Ferrari 12cilindri आणि Lamborghini Revuelto ला टक्कर देण्यासाठी ही कार बाजारात उतरवत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. अॅस्टन मार्टिन व्हॅनक्विश, जेम्स बाँडच्या चित्रपटात दाखविली जाणारी लोकप्रिय कार आहे.या कारला साल २००२ मध्ये आलेल्या ‘डाय अनदर डे’ या चित्रपटात V12 व्हॅनक्विशच्या रुपात दिसली होती. या कारमध्ये अनेक खास फिचर्स आहेत.
2025 Aston Martin Vanquish 1




कारचे इंजिन प्रचंड ताकदीचे
s2025 अॅस्टन मार्टिन व्हॅनक्विश कारमध्ये ५.२ लिटर ट्वीन – टर्बोचार्ज्ड V12 पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन्स 823 bhp पॉवर आणि 1,000 nm च्या पिक टॉर्क निर्माण करते. ही कारचा कमाल वेग ३४४ किमी प्रति तास इतका आहे. ही कार ० – १०० किमी प्रति तासाचा वेग केवळ ३.३ सेकंदात पकडू शकते. ही एक रियल व्हील ड्राईव्ह कार आहे यात ८ – स्पीड ZF ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देण्यात आले आहेत.
कारचे डिझाईन
नवीन व्हॅनक्विश कारमध्ये व्हील आर्चच्या चारी दिशेला स्मूथ कर्व्ह सोबत एक मोठा स्टान्स दिलेला आहे. हिच्या समोरील भागात आयकॉनिक एस्टन मार्टीन ग्रील आणि टियर ड्रॉप शेप्ड हेडलॅप्स आहेत.व्हॅनक्विशमध्ये DB12 आणि वँटेज सोबत बॉन्डेड अॅल्युमिनियम बॉडी स्ट्रक्चर आहेत.
2025 Aston Martin Vanquish 3
कारच्या आता लक्झरी फिचर्स
2025 अॅस्टन मार्टिन Vanquish मध्ये मॅट्रीक्स LED हेडलॅम्प आहेत. नवीन LED DRL आणि यु्व्ही प्रोटेक्शन सोबत एक सुंदर पॅनोरमिक सनरुफ याला देण्यात आला आहे. या कारच्या केबिनमध्ये संपूर्ण डिजिटल १०.२५ इंचाचा ड्रायव्हर डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच कनेक्टीव्ही ऑप्शनसह १०.२५ इंचाचा टच स्क्रीन इंफोटेन्मेंट सिस्टीम दिलेली आहे. प्रिमीयम मटेरियल आणि एक सुंदर इंटेरिअर डिझाईन एक शानदार ड्रायव्हींग एक्सीपीरियंस देते.