एथरची ईव्ही OLA ला आस्मान दाखवणार? दमदार फीचरची रंगली चर्चा

Ather 450 Apex | नवीन अथर 450X जबरदस्त असेल. त्यात दमदार इलेक्ट्रिक मोटर आणि मोठे बॅटरी पॅक असेल. टीझरनुसार, या स्कूटरमध्ये पारदर्शक रिअर पॅनल आणि एक ऑरेंज सब-फ्रेम असेल. या स्कूटरसाठी कंपनीने बुकिंग सुरु केले आहे. पुढील वर्षात ही स्कूटर ग्राहकांच्या हातात असेल. ते या ईव्हीला सूसाट दामटू सकतील.

एथरची ईव्ही OLA ला आस्मान दाखवणार? दमदार फीचरची रंगली चर्चा
Follow us
| Updated on: Dec 20, 2023 | 3:18 PM

नवी दिल्ली | 20 डिसेंबर 2023 : इलेक्ट्रिक टू व्हीलर्स निर्माता कंपनी एथर एनर्जी त्यांची सर्वात दमदार आणि वेगवान इलेक्ट्रिक स्कूटर 450 एपेक्स तयार करत आहे. कंपनीने या नवीन स्कूटरसाठी प्री-ऑर्डर बुकिंग विंडो सुरु केली आहे. ग्राहकांना ही ईव्ही खरेदी करायची असेल तर कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन या ईव्हीचे बुकिंग करावे लागेल. कंपनी या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरची डिलीव्हरी मार्च 2024 पासून सुरु करणार आहे. ग्राहकांना दोन महिन्यानंतर ही स्कूटर दामटता येणार आहे. ओला कंपनीची एस1 प्रो सध्या सर्वाधिक वेगवान स्कूटर आहे. या स्कूटरला अथर जोरदार टक्कर देऊन बाजारातील तिचा वाटा वाढविण्याच्या विचारात आहे.

एथर 450 एपेक्सची वैशिष्ट्ये

एथर एनर्जीने 450 एपेक्सच्या वैशिष्ट्याविषयी खुलासा केलेला नाही. पण अनेक टीझर याविषयीचा दावा करत आहेत. अपकमिंग व्हेरिएंट कंपनीची आतापर्यंतची सर्वात वेगवान इलेक्ट्रिक स्कूटर असेल. एथर 450 एपेक्स इलेक्ट्रिक स्कूटमध्ये चार रायडिंग मोड असतील. यामध्ये इको, राइड, स्पोर्ट आणि वॉर्प+ सह Warp+ मोड असेल. ही स्कूटर आतापर्यंतची वेगवान स्कूटर असेल.

हे सुद्धा वाचा

टीझरमध्ये काय आहे

नवीन एथर 450X मध्ये जादा पॉवरफुल इलेक्ट्रिक मोटर आणि मोठा बॅटरी पॅक असण्याची शक्यता आहे. टीझरमध्ये जे समोर येत आहे. त्यानुसार स्कूटरमध्ये पारदर्शक रिअर पॅनल आणि एक ऑरेंज सब फ्रेम आहे. या अपकमिंग स्कूटरमध्ये 100 किमी प्रति तासाहून अधिकचा वेग मिळण्याची शक्यता आहे. सध्याच्या एथर 450X मध्ये कंपनीचा दावा आहे की तिचा टॉप स्पीड 90 किमी तास आहे आणि ती 3.3 सेंकदात 0-40 किमी प्रति तासाचा वेग पकडेल.

एथर 450 एपेक्स बॅटरी पॅक

एथर 450X इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये 6.4 kW इलेक्ट्रिक मोटर असेल. ती 26Nm चा टॉर्क जनरेट करेल. यामध्ये 3.7 kWh बॅटरी पॅक देण्यात आला आहे. एकदा चार्ज झाल्यावर ही स्कूटर 150 किमीपर्यंतची रेंज देईल. नवीन 450 एपेक्स व्हेरिएंट थेट ओला एस1 प्रो ला टक्कर देईल. ही स्कूटर अधिक वेगाने पळण्याचा दावा करते.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.