Audi ने बदलला आपला चार बांगड्यांचा लोगो, काय आहे कारण ?

एकमेकात गुंफलेल्या चार बांगड्या किंवा रिंग असा असलेला जर्मनीच्या ऑडी कारचा लोगो आता बदलला आहे. ऑडी कंपनीने चायनात ऑटो मोबाईल मार्केटमध्ये आपल्या नव्या ईलेक्ट्रीक कार उतरवताना हा लोगो सादर केल्यानंतर जगभरातील ऑडीच्या चाहते नाराज झालेले आहेत.

Audi ने बदलला आपला चार बांगड्यांचा लोगो, काय आहे कारण ?
Follow us
| Updated on: Nov 25, 2024 | 8:41 PM

Audi New Logo : जर्मनची कार कंपनी ऑडीने आपली नवीन इलेक्ट्रीक चीनमध्ये सादर केली तेव्हा लोकांना धक्का बसला आहे, कारण ऑडीने आपली जगभर ओळख असलेला चार बांगड्या ( रिंग ) असलेला लोगो बदलला आहे.सोशल मीडियावर या बातमीने खळबळ उडाली आहे. ऑडीच्या ग्राहकांना देखील कंपनीच्या या पावलाने मोठा धक्का बसलेला आहे. कारण ऑडीच्या या लोगोवर लोकांचे मोठे प्रेम होते, हा लोगो १९३० पासून लक्झरी ब्रॅंडचे प्रतिनिधीत्व करत होता. चीनच्या बाजारात ऑडीने ई कॉन्सेप्ट स्पोर्ट्सबॅक कार उतरवली आहे, तिच्यावर हा लोगो गायब असून केवळ ‘AUDI’ अशी इंग्रजी अक्षरे दिसत आहे. अलिकडेच जग्वार कार कंपनीने देखील तिचा लोगो बदलल्याने अगदी अब्जाधीश इलॉन मस्क पासून सर्वांनी टीपण्णी केलेली होती.

नवीन AUDI लोगो जगातील सर्वात मोठ्या ऑटो मार्केटमध्ये तरुण ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बदलला असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.चीनी वाहन निर्मिती कंपनी SAIC सोबत को- डेव्हलप केलेल्या इलेक्ट्रीक वाहनांसाठी हा लोगो बदल केलेला आहे. ऑडी आणि एसएआयसी या दोन्ही कंपन्यांना चीन बाजारात आपला वाटा मिळविण्यासाठी हा प्रयत्न केलेला आहे. येथे जुन्या वाहन निर्मात्या कंपन्या आणि परदेशी वाहन निर्मिती कंपन्या ईव्ही आणि हायब्रिड सेंट्रिक कंपन्यांशी असलेल्या तगड्या स्पर्धेत टिकण्यासाठी उतरले आहेत.

ऑडीच्या प्रतिष्ठीत चार रिंगाच्या लोगोला  एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व आहे. हा लोगो ऑडीची स्थापना आणि तिच्या चार संस्थापक ब्रंड्सचे प्रतिक आहे.

हे सुद्धा वाचा

चार बांगड्या ( रिंग ) अर्थ काय ?

१९३२ मध्ये जर्मनीच्या चार प्रमुख ऑटोमोबाईल कंपन्यांचे विलीनीकरण झाले होते. त्यानंतर Auto Union AG नावाचा नवा समुह तयार झाला. या चार कंपन्यांचे प्रतिक हा ऑडीचा चार रिंगाचा लोका आहे. या चार कंपन्या खालील प्रमाणे आहेत.

Audi

DKW

Horch

Wanderer

प्रत्येक रिंग एका कंपनीचे प्रतिनिधीत्व करते.या कंपन्याचे विलीनीकरण त्यावेळच्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी आणि जर्मनीच्या ऑटोमोबाइल इंडस्ट्रीला मजबूत करण्यासाठी केले होते. हे चार रिंग समानता, एकता आणि भागीदारीचे प्रतिक आहे. हा लोगो दर्शवितो की कशा चार कंपन्या मिळून एका बड्या उद्योग समुहात परिवर्तित झाली. हा लोगो ब्रॅंडची ताकद आणि गुणवत्ता देखील दाखवतो. आज ऑडीचा लोगो ब्रॅंडच्या लक्झरी, इनोव्हेशन आणि टेक्नॉलॉजीचे प्रतिक बनला आहे. हा लोगो जगातला सर्वाधिक ओळखल्या जाणाऱ्या लोगो पैकी एक आहे.

'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'.
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा.
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी.
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका.
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल.
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी.
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब.
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?.
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती.
'बच गया... दर्शन घे काकांचं..', अजितदादांनी रोहित पवारांना लगावला टोला
'बच गया... दर्शन घे काकांचं..', अजितदादांनी रोहित पवारांना लगावला टोला.