Bike Tips: प्रवासादरम्यान बाइक मध्येच बंद पडली? अशावेळी किती अंतर कापू शकते, ते जाणून घ्या

Bike Tips: लांबचा पल्ला गाठताना अनेकदा गाडीतील पेट्रोल मध्येच दगाफटका देणार नाही ना? असा प्रश्न सतावत असतो. त्यामुळे जवळपास पेट्रोलपंप कुठे यासाठी धावती नजर लागून असते. पण कधी कधी पेट्रोलपंपावर पोहोचायच्या आतच गाडी बंद पडते, अशा वेळी काय करायचं ते जाणून घ्या

Bike Tips: प्रवासादरम्यान बाइक मध्येच बंद पडली? अशावेळी किती अंतर कापू शकते, ते जाणून घ्या
Bike Tips: बाइकने प्रवास करताना मध्येच गाडी बंद पडली तर काय? पेट्रोलशिवाय किती अंतर कापते? समजून घ्या
Follow us
| Updated on: Sep 21, 2023 | 9:32 PM

मुंबई : बाइकने दूरचा पल्ला गाठताना पेट्रोलचं टेन्शन लागून असतं. गाडी मधेच बंद पडू नये यासाठी धाकधूक असते. पण अनेकदा नशिबाची साथ मिळत नाही आणि गाडी प्रवासादरम्यान बंद पडते. अशावेळी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. जवळपास पेट्रोल पंप नसेल तर डोकेदुखी आणखी वाढते. अनेकदा चार पाच किमी अंतर बाइकला धक्का मारून गाठवं लागतं. अनेकदा दुसऱ्या बाइकस्वारांकडून मदतीचा हात मागितला जातो. पण प्रत्येक जण मदत करेल असं नाही. त्यामुळे लांबच्या प्रवास करताना काही टिप्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे. प्रवासादरम्यान रस्त्यातच पेट्रोल संपलं तर टेन्शन घेऊ नका. तुम्ही या ट्रिकच्या माध्यमातून आरामात पेट्रोल पंप किंवा इच्छित ठिकाणी पोहोचू शकता. कसं ते समजून घ्या

बाइकचं रिझर्व्ह मोड फीचर

बाइकमधील हे सर्वात महत्त्वाचं फीचर आहे. यामुळे टाकीतील पेट्रोल किती संपलं आहे याचा अंदाज बांधता येतो. गाडी रिझर्व्ह मोडवर जाण्यापूर्वी बंद पडते किंवा धक्का खात पुढे जाते. गाडी रिझर्व्ह मोडवर असेल तर गाडीत पेट्रोल भरण्यासाठी तजवीज करणं गरजेचं आहे. पेट्रोल पंप जवळ असेल तर तात्काळ गाडीत पेट्रोल भरणं गरजेचं आहे. बाइकमध्ये इंडिकेटर रिझर्व्ह मोड ऑन असतो. जर इंडिकेटर ब्लिंक होत असेल तर तात्काळ पेट्रोल भरलं पाहीजे. इंडिकेटर तु्म्हाला पेट्रोल लवकर संपेल याची सूचना देत असतं. तुम्ही याकडे दुर्लक्ष केलं तर रस्त्यात अडकू शकता.

रिझर्व्ह मोडवर गाडी किती किमी अंतर कापते?

समजा, तुमच्या बाइकची रिझर्व्ह टँक कॅपिसिटी 2 लिटर आहे. गाडीचा मायलेज 50 असेल तर बाइक जवळपास 100 किमी अंतर आरामात कापू शकते. अशात बाइकने 50 ते 60 किमी अंतर कापलं तर पेट्रोल पंपावर जाऊन पेट्रोल भरून घ्या. तुमच्याकडे टीव्हीएसची बाइक असेल तर ही गाडी एक लिटर पेट्रोलवर 95 किमी अंतर कापते असा दावा कंपनी करते.

तुमच्या बाइकच्या पेट्रोल टँक कॅपेसिटीवर आणि मायलेजवर गणित बांधू शकता. बाइकच्या रिझर्व्ह मोडमध्ये किती पेट्रोल असतं आणि गाडी किती मायलेज देते? यावर तुमची अडचण दूर करण्यास मदत होते.

सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.