मुंबई : देशातील प्रत्येकाचे काही ना काही नवनवीन शौक असतात. यातील फार कमी लोकांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरतात. तर अनेकजण स्वप्न पूर्ण होण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत असतात. अशाच एका व्यक्तीने घेतलेल्या मेहनतीमुळे त्याला त्याची ड्रीम बाईक मिळाली आहे. होंडा गोल्डविंग Trike असे या बाईकचे नाव आहे. विशेष म्हणजे ही बाईक भारतीय रस्त्यांवर पाहायला मिळत नाही. तो व्यक्ती चक्क बाजारात भाज्या घेण्यासाठी आला होता. या बाईकचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (Babu John Vegetable shopping with Honda Goldwing Trike bike)
होंडा गोल्डविंग Trike ही बाईक दुर्मिळ आहे. ती भारतीय रस्त्यांवर सहसा दिसत नाही. गोल्डविंग Trike ही बाईक रस्त्याच्या कडेला पार्क केली होती. एक व्यक्ती ती बाईक घेऊन भाजी मार्केटमध्ये भाजी घेण्यासाठी आला होता. काही लोकांनी ती बाईक बघितल्यानंतर थक्क झाले. यानंतर ती व्यक्ती भाजी घेऊन परत बाईकपाशी आली. यानंतर त्याने हातातील भाजीच्या पिशव्या गाडीत टाकल्या आणि तो तिथून निघून गेला. एका अनोळखी व्यक्तीने हा व्हिडीओ रेकॉर्ड करुन सोशल मीडियावर अपलोड केला आहे.
या बाईकच्या मालकाचे नाव बाबू जॉन आहे. होंडा गोल्डविंग Trike ही एक वेगळी बाईक आहे. बाबूला ही बाईक UAE मधून आयात करावी लागली. ही बाईक आयात करण्यासाठी त्याला अडचणींचा सामना करावा लागला. गेल्या वर्षी ही बाईक परदेशातून भारतात आणतेवेली ती जप्त करण्यात आली. या बाईकची किंमत 75 लाख रुपये आहे.
कस्टम विभागाने जप्त केलेली ही बाईक सोडवण्यासाठी जॉनला 24 लाख रुपयांची कस्टम ड्युटी भरावी लागली. याशिवाय त्याला अतिरिक्त 38 लाख रुपयेही भरावे लागले. त्यानंतर ही बाईक बाबूला मिळाली.
त्याने ही बाईक 14 महिन्यांपूर्वी आयात केली होती. मात्र ही बाईक कस्टम विभागातून सोडवण्यासाठी जवळपास एका वर्षापेक्षा जास्त वेळ लागला. विशेष म्हणजे या दुचाकीसाठी त्याला कोर्टातही जावे लागले.
होंडा गोल्डविंग Trike बाईकमध्ये 1832 cc, सहा सिलेंडर इंजिन आहेत. हे इंजिन 118 Bhp ची पॉवर देते. या बाईकचे फ्यूल ट्रँक हे 55 लीटर आहे. (Babu John Vegetable shopping with Honda Goldwing Trike bike)
संबंधित बातम्या :
Car Maintenance | या पाच चुका टाळल्यास दीर्घकाळ धावेल तुमची कार