रॉयल एनफिल्ड हंटरशी मुकाबला करण्यासाठी Bajaj अन्‌ Triumph मध्ये पार्टनरशिप… दोन बाइक होणार लाँच

अपकमिंग Bajaj Triumph Scrambler मोटरसायकलमध्ये ट्यूबलर चेसिस बोल्ट ऑन रियर सबफ्रेम्स मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. लिक्स झालेल्या इमेजनुसार यात, हायर सिट देण्यात आले आहेत. Bajaj Triumph मोटरसायकलला पुढील वर्षी 2023 मध्ये लाँच केली जाण्याची शक्यता आहे.

रॉयल एनफिल्ड हंटरशी मुकाबला करण्यासाठी Bajaj अन्‌ Triumph मध्ये पार्टनरशिप... दोन बाइक होणार लाँच
रॉयल एनफिल्ड हंटर 350Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Jul 30, 2022 | 2:26 PM

नुकतेच बजाज ऑटो (Bajaj Auto) आणि Triumph Motorcycles मध्ये पार्टनरशिप झाल्याची माहिती समोर आली आहे. आता हे जॉइंट व्हेंचर आपली नवीन बाइकला बाजारात आणण्याच्या तयारीमध्ये आहेत. या दोन्ही अपकमिंग बाईक्सची स्पर्धा रॉयल एनफिल्ड हंटर 350 (Royal Enfield Hunter) सोबत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. Bajaj Auto आणि Triumph Motorcycles मध्ये पार्टनरशिप झाल्यामुळे ऑटोमोबाईल (Automobile) इंडस्ट्रीमध्ये चांगलीच चर्चा रंगत आहे. या दोन्ही कंपन्या आता प्रीमिअम मिड डिसप्लेसमेंट मोटरसायकलचे प्रोडक्शन करणार आहे. भारतासोबत या दोन्ही गाड्यांना विदेशांमध्येही विक्री केले जाणार आहे.

ऑटो वेबसाइट रशलेनच्या रिपोर्टनुसार, या कंपन्या कमीत कमी दोन बाइक बनविण्याचे नियोजन करीत आहेत. असे सांगण्यात येत आहे, की दोन्हींचे इंजिन एकसारखेच असण्याची शक्यता आहे. बॉडी स्टाइल मात्र भिन्न असू शकते. नुकतेच या दोन्ही बाईक्सना कॅमेर्यात टिपण्यात आले आहे. यामधील एक स्क्रँबलर बाईक असून दुसरी नियो-रेट्रो रोडस्टर स्टाइल असलेली बाइक असणार आहे. यातील स्क्रँबलर बाईक रॉयल एनफिल्ड हंटर 350 चा मुकाबला करेल तर, नियो-रेट्रो रोडस्टरची स्पर्धा Yezdi Scrambler सोबत होणार आहे. Bajaj-Triumph Scrambler च्या इंजिनबाबत अद्याप कुठलीही ठळक माहिती समोर आलेली नसली तरी, असं सांगण्यात येतय, की दोन्ही बाईक्समध्ये एक सारखे इंजिन देण्याची शक्यता आहे. यात सिंगल सिलिंडर युनिट सब 500 सीसी डिस्प्लेसमेंट दिले जाण्याची शक्यता आहे.

Street Scrambler सारखे डिझाईन

नवीन Bajaj Triumph मोटरसायकल बाबत असे सांगण्यात येतेय, की याचे डिझाईन Triumph च्या Street Scrambler सारखे असणार आहे. नवीन बाइकमध्ये सिग्नेचर हाइलाइट्‌स राउंड हेडलाइट, क्रॅश गार्डमध्ये इंजिन, टियरड्रॉप शेप्ड फ्यूल टँक साइड रबर पेडसह स्पिलट स्टाइल सीट्‌स देण्याची शक्यता आहे. नवीन बाइकमध्ये फूल एलईडी इल्यूमिनेशन आणि मल्टीपल राइडिंग मोड्‌स देण्यात येण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

अपकमिंग Bajaj Triumph Scrambler मोटरसायकलमध्ये ट्यूबलर चेसिस बोल्ट ऑन रियर सबफ्रेम्स मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. लिक्स झालेल्या इमेजनुसार यात, हायर सिट देण्यात आले आहेत. Bajaj Triumph मोटरसायकलला पुढील वर्षी 2023 मध्ये लाँच केली जाण्याची शक्यता आहे. याची किंमत 2 लाख रुपयांच्या रेंजमध्ये ठेवली जाउ शकते.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.