Electric Vehicle | इलेक्ट्रिक वाहनातही आता ‘हमारा बजाज’ , इलेक्ट्रिक वाहनांसाठी बजाज ऑटोची 300 कोटींची गुंतवणूक

| Updated on: Dec 30, 2021 | 9:36 AM

दुचाकी आणि तीनचाकीतील अनुभव पणाला लावून बजाज ऑटो इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारात दमदार मुसंडी मारण्याच्या बेतात आहे. त्यासाठी कंपनीने पुण्याजवळील आकुर्डी येथे उत्पादन प्लॅट उभारणीला सुरुवात केली आहे. या ठिकाणाहून  दरवर्षी 5 लाख इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन करण्यात येणार आहे. तर 800 जणांना रोजगाराची संधी मिळणार आहे. 

Electric Vehicle | इलेक्ट्रिक वाहनातही आता हमारा बजाज , इलेक्ट्रिक वाहनांसाठी बजाज ऑटोची 300 कोटींची गुंतवणूक
bajaj
Follow us on

मुंबई : हमारा बजाज म्हणत सर्वसामान्य भारतीयांच्या मनावर गारुड करणा-या बजाज ऑटोने चेतक नंतर तीन चाकी वाहन उद्योगात मोठी मजल मारली. आता कंपनी इलेक्ट्रिक व्हेईकल उत्पादनात उतरणार आहे. त्यासाठी 300 कोटींची गुंतवणूक करण्यात येत आहे. आकुर्डी येथे उत्पादन सुरु करण्यात येत आहे. विशेष म्हणजे सर्वांची आवडती चेतक स्कूटरचा प्लॅंटही आकुर्डीतच आहे.

सर्व काम ऑटोमॅटिक

या इलेक्ट्रिक वाहन उत्पादन विभागाचे काम स्वयंचलित चालणार आहे. अत्याधुनिक रोबोट आणि ऑटोमॅटिक प्रणालीवर हे काम चालेल. लॉजिस्टिक्स आणि मटेरियल हँडलिंग, फॅब्रिकेशन, पेटिंग, असेंबलिंग ही सर्व कामे ऑटोमॅटिक होणार आहे. हा प्लँट 5 हजार चौरस फुटावर कार्यान्वित होईल. या प्लँटमध्ये जवळपास 800 जणांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल. जून 2022 पर्यंत नवीन वाहन बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे.

इलेक्ट्रिक वाहन इंडस्ट्रीत अग्रेसर

बजाज ऑटोचे प्रमुख राजीव बजाज यांनी इलेक्ट्रिक वाहन उद्योगात बजाजचे वाहन मुसंडी मारेल असा विश्वास व्यक्त केला. 2001 मध्ये बजाज 2.0  पल्सर दुचाकी मार्केट लिडर ठरली. तर 2021 मध्ये बजाज 3.0 आकर्षक चेतकवर विराजमान आहे. बजाजचा पोर्टफोलियो वाढत असून आगेकूच करत आहे. आता आम्ही भविष्यातील ईवी सोल्यूशन्स तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. शहरांची गतिशीलता आणि इलेक्ट्रिक वाहनांची आवश्यकता लक्षात घेत आम्ही भारत आणि जागतिक बाजारात इलेक्ट्रिक वाहन उद्योगात भरारी घेणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

आकुर्डी प्लँट

आकुर्डी हा कंपनीचा पहिल्यांदा वाहन उत्पादनाचा सर्वात जूना प्लँट आहे.  हा प्लँट तब्बल 160 एकरवर उभा असून सध्या बजाज ऑटो संशोधन आणि विकास  ( research and development (R&D)  उपक्रम या ठिकाणी सुरु आहे. तसेच खरेदी आणि विक्री विभागही कार्यरत आहे.

स्वेच्छा निवृत्ती वेतन योजना (voluntary retirement scheme) राबविण्यापूर्वी क्रिस्टल या स्कुटरचे आकुर्डीत उत्पादन होत होते. मात्र शटडाऊनमुळे हा प्लँट प्रभावित झाला होता. बजाज ऑटो सध्या चेतक या लोकप्रिय ब्रँडचे इलेक्ट्रिक व्हर्जन मार्केटमध्ये उतरविण्याच्या तयारीत आहे. Husqvarna brand च्या अंतर्गत कंपनी इलेक्ट्रिक वाहन उत्पादन सुरु करणार आहे. त्यानंतर स्वतःचा ब्रँड बाजारात उतरविणार आहे. 2022 मध्ये कंपनी तीनचाकी इलेक्ट्रिक वाहन बाजारात उतरविणार आहे. त्यासाठी निर्धारीत वेळेपेक्षा अधिकचा उशीर झाला आहे. जुलै 2021 मध्ये बजाज ऑटोने  इलेक्ट्रिक आणि हायब्रीड वाहन उत्पादनाचा निर्णय घेतला. त्यात दुचाकी, तिनचाकी आणि चार चाकी वाहनांचा समावेश आहे.

इतर बातम्या

Ratan Tata birthday : आलिशान घर, प्रायव्हेट जेट ते कोट्यवधींच्या कार, बर्थडे बॉय रतन टाटांविषयी सर्वकाही

E Scooter : One-Moto नं लॉन्च केलं Electa, एका चार्जिंगमध्ये धावणार 50 किलोमीटर!

Mahindra Automotive 2022 : महिंद्रा लॉन्च करणार नव्या लोगो आणि डिझाइनसह XUV300