Bajaj Auto : बजाजचा धमाका! आता थेट CNG Bike

Bajaj Auto : बजाज दुचाकीत क्रांती करण्याच्या तयारीत आहे. सीएनजी बाईकसाठी हालचाली वाढल्याचे संकेत मिळत आहे. पेट्रोलला पर्याय देण्यासाठी हा प्रयोग होत आहे, काय आहे हा प्रयोग

Bajaj Auto : बजाजचा धमाका! आता थेट CNG Bike
Follow us
| Updated on: Sep 19, 2023 | 5:55 PM

नवी दिल्ली | 19 सप्टेंबर 2023 : देशातील प्रमुख दुचाकी उत्पादक कंपनी बजाज ऑटो (Bajaj Auto) क्रांती आणण्याचा प्रयत्न करत आहे. देशाने इलेक्ट्रिक व्हेईकलच्या दिशेने गिअर टाकला आहे. त्याला पर्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. पेट्रोलच्या महागाईवर तोड काढण्यासाठी सीएनजी बाईक (Bajaj CNG Auto) आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सध्या सीएनजी कार आल्या आहेत. त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अनेक शहरात अद्यापही सीएनजी पंप नसल्याने इंधनाची समस्या आहेत. तरी पण या कारला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सीएनजी बाईकची चर्चा पहिल्यांदाच होत आहे, असे नाही. यापूर्वी पण बजाज ऑटोनेच हा विषय मैदानात उतरवला होता. 17 वर्षांपूर्वी एप्रिल 2006 मध्ये व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी याविषयीचे संकेत दिले होते. पण आता असा पर्याय काळाची गरज झाली आहे.

या बाईकमध्ये दिसेल बदल

CNBC च्या एका अहवालानुसार, बजाज ऑटो या आर्थिक वर्षात पल्सर रेंज अपग्रेड करण्याच्या विचारात आहे. तसेच सर्वात मोठी पल्सर बजाज (Pulsar) आणण्याच्या तयारीत आहे. बजाजला ऑटो क्षेत्रात पहिला क्रमांक टिकवायचा आहे. कंपनी पल्सर रेंजमध्ये नवीन 6 मॉडेल अपग्रेड करण्याच्या तयारीत आहे. मीडियातील चर्चेनुसार, पल्सरसह बजाज 100 सीसी सेग्मेंटमधये पण एक सीएनजी बाईक आणण्याचा प्रयोग करु शकते. राजीव बजाज यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना सीएनजी वाहनांवरील वस्तू आणि सेवा कर (GST) कमी करुन 18 टक्के करण्याची विनंती केली आहे.

हे सुद्धा वाचा

Bajaj CNG Bike

बजाज सीएनजी बाईक आणण्याची तयारी करत असल्याची चर्चा 17 वर्षांपूर्वी रंगली होती. एप्रिल 2006 मध्ये राजीव बजाज यांनी याविषयीचे संकेत दिले होते. पेट्रोलऐवजी बाईक दुसऱ्या इंधनावर धावेल, असे संकेत त्यांनी त्यावेळी दिले होते. आतापर्यंत ही बाईक प्रत्यक्षात बाजारात आली नाही. आता CNG बाईकवर GST कमी करण्याची चर्चा समोर आली आहे. त्यामुळे बजाज ऑटो सीएनजी बाईक आणण्याची तयारी करत असल्याची चर्चा रंगली आहे.

Bajaj Chetak

बजाज ऑटो त्यांची लोकप्रिय बजाज चेतक नव्या रुपात बाजारात उतरविण्याची शक्यता आहे. एकमेव इलेक्ट्रिक मॉडेल चेतक आणण्याची तयारी सुरु आहे. कंपनीनुसार भविष्यात चेतक ब्रँड अंतर्गत अन्य इलेक्ट्रिक मॉडल आणण्यात येऊ शकते. ऑगस्ट महिन्यात या ब्रँडचे 8000 युनिट बाजारात आणले. आता सीएनजी पल्सर कधी बाजारात येईल, याची लवकरच माहिती समोर येईल.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.