बजाज ऑटोची ‘बायबॅक’ची घोषणा, 54 लाख शेअर्स खरेदीचा निर्णय; नेमका काय प्लॅन?
वाहन निर्मितील क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी बजाज ऑटोनं महत्वपूर्ण घोषणा केली आहे. कंपनीच्या संचालक मंडळानं 2500 कोटी रुपयांच्या शेअर बायबॅकची (SHARE BUYBACK) घोषणा केली आहे.

नवी दिल्ली: वाहन निर्मितील क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी बजाज ऑटोनं महत्वपूर्ण घोषणा केली आहे. कंपनीच्या संचालक मंडळानं 2500 कोटी रुपयांच्या शेअर बायबॅकची (SHARE BUYBACK) घोषणा केली आहे. 4,600 रुपये प्रति शेअरच्या किंमतीवर 54.35 लाख शेअर्सची खरेदी करणार आहे. बजाज ऑटो (BAJAJ AUTO) खुल्या बाजारात शेअर बायबॅक करणार आहे. यापूर्वीच कंपनीनं दुचाकी वाहनांच्या किंमतीत दोन हजार रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. कच्च्या मालाच्या वाढलेल्या किंमतीमुळे कंपनीनं हा निर्णय घेतला होता. सप्टेंबर 2021 पर्यंत कंपनीकडे 17,526 कोटी रुपयांचे कॅश सरप्लस होती. मार्च 2021 पर्यंत कंपनीची कॅश सरप्लस (CASH SURPLUS) 17,689 कोटींवर पोहोचला होता.
बजाजचा बायबॅक प्लॅन!
बजाज ऑटोनं शेअर बायबॅकसाठी 4600 रुपये निश्चित केले आहेत. गेल्या आठवड्यात शुक्रवारी बंद झालेला भाव 3,182.20 रुपयांपेक्षा 20.64% हून अधिक होता. तब्बल दोन दशकानंतर कंपनीनं शेअर बायबॅकची घोषणा केली आहे. चालू वर्षी बजाज ऑटोचे शेअर 19 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. सोमवारी कंपनीचे शेअर 1.11 टक्क्यांच्या वाढीसह 3,855 रुपयांच्या किंमतीवर बंद झाले. कंपनीनं जारी केलेल्या माहितीनुसार, कंपनीनं बायबॅकचा प्लॅन पुढे ढकलाल होता. कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीच 14 जूनला निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
शेअर बायबॅक म्हणजे काय?
शेअर बायबॅक म्हणजे सध्याच्या शेअर धारकांकडून कंपनीचे शेअर पुन्हा विकत घेणे यास शेअर बायबॅक म्हटलं जातं. यासाठी कंपनीद्वारे सध्याच्या मार्केटमधील चालू शेअरच्या किमतीपेक्षा अधिक भाव खरेदीदारांना देतात. शेअर बायबॅकच्या स्थितीत कंपनी सेकंडरी मार्केट मधून खरेदी करतात.
हमारा बजाज
बजाज ऑटो लिमिटेड ही आघाडीची भारतीय दुचाकी निर्मिती कंपनी आहे. जगभरात दुचाकी आणि तीन चाकी वाहनांची विक्री करते. बजाज ऑटो ही मोटारसायकल निर्मिती करणारी जगातील तिसऱ्या क्रमांकाची आणि भारतातील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी मानली जाते. आहे. ऑटो क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्यांच्या नजरा बजाजच्या कामगिरीकडे असतात. बजाजच्या शेअर बायबॅकच्या निर्णयाला गुंतवणुकदार नेमका कशा प्रतिसाद देतात याकडं अर्थवर्तृळाच्या नजरा लागलेल्या आहेत.