देशात कोरोनाची दुसरी लाट, तरीही Bajaj ची घोडदौड सुरुच, एप्रिलमध्ये 3.88 लाख गाड्यांची विक्री
बजाज ऑटो (Bajaj Auto) ने एप्रिल 2021 चा विक्री अहवाल (सेल्स रिपोर्ट) प्रसिद्ध केला आहे. कंपनीने एप्रिल 2021 मध्ये 3,88,016 वाहने विकली आहेत.
मुंबई : बजाज ऑटो (Bajaj Auto) ने एप्रिल 2021 चा विक्री अहवाल (सेल्स रिपोर्ट) प्रसिद्ध केला आहे. कंपनीने एप्रिल 2021 मध्ये 3,88,016 वाहने (दुचाकी + कमर्शियल वाहने) विकली आहेत. तर एप्रिल 2020 मध्ये कंपनीने केवळ 37,878 वाहनांची विक्री केली होती. (Bajaj Auto sells over 3.88 lakh units Vehicles in April 2021)
खरंतर गेल्या वर्षी एप्रिलमध्ये कोरोना साथीच्या रोगामुळे केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊन लादले होते, त्यामुळे कंपनीचे एकही वाहन भारतीय बाजारात विकले गेले नाही. तथापि, या काळात कंपनीने आपली वाहने भारताबाहेर विकली होती.
यावर्षी एप्रिलमध्ये कंपनीने भारतीय बाजारात विक्री केली आहे. परंतु कोरोनाच्या दुसर्या लाटेचा परिणाम वाहनांच्या विक्रीवर झाला आहे. यामुळेच मार्च 2021 च्या तुलनेत एप्रिल 2021 मध्ये कंपनीच्या विक्रीत घट नोंदवली गेली आहे.
भारतीय बाजारातील एकूण विक्री (दुचाकी + कमर्शियल वाहने)
एप्रिल 2021 मधील विक्री | एप्रिल 2020 मधील विक्री | मार्च 2021 मधील विक्री |
1,34,471 युनिट्स | – | 1,98,551 युनिट्स |
वाहनांची एकूण निर्यात (दुचाकी + कमर्शियल वाहने)
एप्रिल 2021 मधील निर्यात | एप्रिल 2020 मधील निर्यात | मार्च 2021 मधील निर्यात |
2,53,545 युनिट्स | 37,878 युनिट्स | 1,70,897 युनिट्स |
दुचाकी वाहनांची विक्री
एप्रिल 2021 मधील विक्री | एप्रिल 2020 मधील विक्री | मार्च 2021 मधील विक्री |
348,173 युनिट्स | 32,009 युनिट्स | 330,133 युनिट्स |
भारतीय बाजारातील दुचाकींची विक्री
एप्रिल 2021 मधील विक्री | एप्रिल 2020 मधील विक्री | मार्च 2021 मधील विक्री |
126,570 – युनिट्स | – युनिट्स | 1,81,393 युनिट्स |
भारताबाहेरी दुचाकींची विक्री
एप्रिल 2021 मधील निर्यात | एप्रिल 2020 मधील निर्यात | मार्च 2020 मधील निर्यात |
2,21,603 – युनिट्स | 32,009 – युनिट्स | 148,740 – युनिट्स |
कमर्शियल वाहनांची विक्री
एप्रिल 2021 मधील विक्री | एप्रिल 2020 मधील विक्री | मार्च 2021 मधील विक्री |
39,843 युनिट्स | 5,869 युनिट्स | 39,315 युनिट्स |
भारतीय बाजारातील कमर्शियल वाहनांची विक्री
एप्रिल 2021 मधील विक्री | एप्रिल 2020 मधील विक्री | मार्च 2021 मधील विक्री |
7,901 युनिट्स | – | 17,158 युनिट्स |
कमर्शियल वाहनांची निर्यात
एप्रिल 2021 मधील निर्यात | एप्रिल 2020 मधील निर्यात | मार्च 2021 मधील निर्यात |
31,942 युनिट्स | 5,869 युनिट्स | 22,157 युनिट्स |
इतर बातम्या
देशातील सर्वात स्वस्त SUV महागली, Renault Kiger च्या किंमतीत 33000 रुपयांची वाढ
टाटा समूह 60 क्रायोजेनिक ऑक्सिजन टँकर्स एअरलिफ्ट करणार, देशभर 400 ऑक्सिजन प्लांट उभारणार
ऑक्सिजन कंटेनर आणि टँकर्सवर GPS Tracking Device बसवणं अनिवार्य, केंद्राचा मोठा निर्णय
(Bajaj Auto sells over 3.88 lakh units Vehicles in April 2021)