Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सिंगल चार्जवर 95Km रेंज, ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरला देशात सर्वाधिक पसंती

Electric Two Wheeler सेगमेंटमध्ये बजाज ऑटोच्या चेतक इलेक्ट्रिक स्कूटरला (Bajaj Chetak Electric Scooter) चांगली पसंती मिळत आहे.

सिंगल चार्जवर 95Km रेंज, 'या' इलेक्ट्रिक स्कूटरला देशात सर्वाधिक पसंती
Bajaj Chetak Electric Scooter
Follow us
| Updated on: May 29, 2021 | 4:17 PM

मुंबई : इलेक्ट्रिक टू व्हीलर (Electric Two Wheeler) सेगमेंटमध्ये बजाज ऑटोच्या (Bajaj Auto) चेतक इलेक्ट्रिक स्कूटरला (Bajaj Chetak Electric Scooter) चांगली पसंती मिळत आहे. या स्कूटरला देशात सर्वाधिक मागणी आहे. तर दुसऱ्या स्थानावर टीव्हीएस iQube स्कूटरचं नाव आहे. (Bajaj Chetak Electric Scooter has high demand, it gives 95km range in single charge)

बजाज इलेक्ट्रिकने एप्रिल 2021 मध्ये Bajaj Chetak Electric च्या एकूण 510 युनिट्सची विक्री केली आहे. तर टीव्हीएस स्कूटरने एप्रिलमध्ये 310 युनिट्सची विक्री केली आहे. आकडेवारी पाहिल्यास बजाज चेतक इलेक्ट्रिकने उत्तम कामगिरी केली आहे. मार्चमध्ये या स्कूटरच्या 90 युनिट्सची विक्री झाली होती. बजाज स्कूटरबाबत ग्राहकांकडून दमदार रिव्ह्यू मिळत आहेत. कंपनीने या स्कूटरची ऑनलाइन विक्री सुरू केली होती. त्यानंतर अवघ्या 48 तासात सर्व स्कूटर्सची विक्री झाली आहे.

किंमत

ही स्कूटर अ‍ॅथर 450 एक्स (Ather 450X) आणि TVS iQube ला जोरदार टक्कर देत आहे. ही स्कूटर 1.28 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतक्या किंमतीसह लाँच करण्यात आली होती. आता या स्कूटरची किंमत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता ही स्कूटर 1.47 लाख (एक्स-शोरूम) रुपये या किंमतीत विकली जात आहे. फेम – 2 आणि राज्य अनुदानानंतर (स्टेट सबसिडी) या स्कूटरची किंमत 1.08 लाख (एक्स-शोरूम) इतकी झाली आहे. तर किरकोळ बाजारात या स्कूटरची किंमत 1.30 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे.

Bajaj Chetak इलेक्ट्रिक स्कूटरचे फीचर्स

ही इलेक्ट्रिक स्कूटर अर्बन आणि प्रीमियम या दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. यात 3 किलोवॅट क्षमतेचा बॅटरी पॅक आणि 4.08 किलोवॅटची इलेक्ट्रिक मोटर आहे. सिंगल चार्जवर ही स्कूटर 95 किलोमीटरपर्यंतची रेंज देते. या स्कूटरची बॅटरी केवळ 5 तासात पूर्णपणे चार्ज करू शकता. या स्कूटरमधील इतर फीचर्सविषयी सांगायचे झाल्यास यामध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, key लेस स्टार्ट-स्टॉप सिस्टम आणि डिझायनर अ‍ॅलोय व्हील्स देण्यात आले आहेत. याशिवाय सुरक्षेसाठी डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, पुढच्या बाजूला डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस ड्रम ब्रेक देण्यात आले आहेत. त्याशिवाय हँडलिंगसाठी यामध्ये कंबाईन्ड ब्रेकिंग सिस्टम (सीबीएस) देखील देण्यात आली आहे.

इतर बातम्या

इलेक्ट्रिक वाहन चार्ज करण्याचं टेन्शन खल्लास, मुंबईत 10 नवे चार्जिंग स्टेशन्स सुरु

Hero च्या ‘या’ दोन स्वस्त बाईक्सपैकी तुमच्यासाठी परफेक्ट कोणती? किंमतीत केवळ 1300 रुपयांचा फरक

Hero Destini 125 वर मोठी सूट, स्कूटरमध्ये नवं हिरो कनेक्ट फीचरही मिळणार

(Bajaj Chetak Electric Scooter has high demand, it gives 95km range in single charge)

तुमची मुलगी द्या.., गावगुंडाकडून शिक्षकाला मारहाण, व्हिडीओ बघून हादराल
तुमची मुलगी द्या.., गावगुंडाकडून शिक्षकाला मारहाण, व्हिडीओ बघून हादराल.
'..बहुमत मिळालं म्हणून कोणी माज करू नये', शिंदेंच्या आमदाराचा टोला
'..बहुमत मिळालं म्हणून कोणी माज करू नये', शिंदेंच्या आमदाराचा टोला.
ठाकरे बंधूंची युती अन पवार कुटुंबाचं मनोमिलन? शरद पवार स्पष्टच म्हणाले
ठाकरे बंधूंची युती अन पवार कुटुंबाचं मनोमिलन? शरद पवार स्पष्टच म्हणाले.
सूर्यदेव कोपले! चंद्रपूर ठरला देशातला सर्वात हॉट जिल्हा
सूर्यदेव कोपले! चंद्रपूर ठरला देशातला सर्वात हॉट जिल्हा.
वकील अंजानच्या विरोधात ग्रामस्थ पोलीस अधीक्षकांच्या भेटीसाठी रवाना
वकील अंजानच्या विरोधात ग्रामस्थ पोलीस अधीक्षकांच्या भेटीसाठी रवाना.
लँड स्कॅमचा बादशाह म्हणत शेलारांचा ठाकरेंवर गंभीर आरोप, ऑडिओ व्हायरल
लँड स्कॅमचा बादशाह म्हणत शेलारांचा ठाकरेंवर गंभीर आरोप, ऑडिओ व्हायरल.
'..शेवटी रक्ताचं नातं आहे', युगेंद्र पवारांनी स्पष्टच सांगितलं
'..शेवटी रक्ताचं नातं आहे', युगेंद्र पवारांनी स्पष्टच सांगितलं.
खरं सांगायच तर.., थोपटेंचा भाजपात प्रवेश, सांगितलं पक्ष सोडण्याचं कारण
खरं सांगायच तर.., थोपटेंचा भाजपात प्रवेश, सांगितलं पक्ष सोडण्याचं कारण.
पाण्यासाठी दाहीदिशांना भटकंती; राज्यात पाणीटंचाईचं तिव्र सावट
पाण्यासाठी दाहीदिशांना भटकंती; राज्यात पाणीटंचाईचं तिव्र सावट.
काँग्रेसच्या माजी आमदाराचा भाजपात प्रवेश, हाती घेतलं 'कमळ' अन्...
काँग्रेसच्या माजी आमदाराचा भाजपात प्रवेश, हाती घेतलं 'कमळ' अन्....