मोठी बातमी, देशातील पहिल्या Bajaj CNG बाईकचे या दिवशी दर्शन; सीईओ राजीव बजाज यांनी उघड केले हे गुपीत

Bajaj CNG Bike : पेट्रोलच्या महागाईवर प्रत्येकाला उतारा हवा आहे. देशात दोन ते तीन वर्षांत इलेक्ट्रिक बाईक, स्कूटरचे प्रचलन वाढले आहे. आता आणखी एक पर्याय समोर आला आहे. बजाज सीएनजी बाईक पुढील महिन्यात या तारखेला दाखल होत आहे.

मोठी बातमी, देशातील पहिल्या Bajaj CNG बाईकचे या दिवशी दर्शन; सीईओ राजीव बजाज यांनी उघड केले हे गुपीत
बजाजा सीएनजी बाईक लवकरच बाजारात
Follow us
| Updated on: May 10, 2024 | 3:27 PM

देशातील आघाडीची दुचाकी कंपनी Bajaj अजून एक प्रयोग करत आहे. पेट्रोलच्या किंमती गेल्या दहा वर्षांत गगनाला भिडल्या आहेत. ग्राहक नवनवीन पर्याय शोधत आहे. सध्या इलेक्ट्रिक बाईक, स्कूटरचा बोलबाला आहे. ग्राहकांसाठी बजाजने आणखी एक पर्याय समोर आणला आहे. Bajaj CNG Bike बाजारात दाखल होत आहे. पुढील महिन्यात, जून 2024 मध्ये या तारखेला ही सीएनजी बाईक बाजारात असेल.

दरवर्षी सीएनजी बाईकचा प्रयोग

बजाजचे सीईओ राहुल बजाज सीएनजी बाईकच्या प्रयोगावर भरभरुन बोलले. ग्राहकांमध्ये या बाईकविषयी उत्सुकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला तर आम्ही दरवर्षी नवीन CNG Bike बाजारात उतरवू असे त्यांनी स्पष्ट केले. सीएनजी अंतर्गतच 5-6 मोटरसायकलचा विकास करण्यात येत असल्याचे गुपीत पण त्यांनी एका खास मुलाखतीत उघड केले. ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला तर आम्ही सीएनजीत अभिनव प्रयोग करु. स्वस्त, मोठी, महागडी अशी सीएनजी बाईक आणू, असे त्यांनी स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा

या तारखेला बाईक बाजारात

राजीव बजाज यांनी सीएनजी बाईक कधी बाजारात येणार हे उघड केले. 18 जून 2024 रोजी सीएनजी बाईक बाजारात दाखल होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. पेट्रोल बाईकपेक्षा किफायतशीर इंधनात चालणाऱ्या पहिल्या सीएनजी बाईकच्या उत्पादनासाठी आम्ही सज्ज आहोत असे त्यांनी स्पष्ट केले.

सीएनजीचाच पर्याय का?

बजाजची CNG Bike बाजारात दाखल होत आहे. इलेक्ट्रिक बाईक, स्कूटर जळण्याच्या घटना पाहता, या बाईकविषयी भारतीय अजूनही साशंक आहेत. पेट्रोल आणि ई-बाईक यामधील सीएनजी हा पर्याय भारतीयांच्या पसंतीला उतरण्याची शक्यता आहे. ही बाईक बाजारात हंगामा करेल असा दावा करण्यात येत आहे.

काय असेल नवीन बाईकमध्ये

या नवीन बाईकमध्ये टेलिस्कोपिक फोर्क, फ्रंट डिस्क ब्रेक, एलिव्हेटेड हँडलबार, अपराइट राइडिंग पोझिशन,अलॉय व्हील हे पार्ट असतील. पल्सर NS125 चीच ही कॉपी असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. या बाईकमध्ये मोनोशॉक देण्यात आले आहे. वळणदार आणि मोठी फ्युएल टाकी असल्याचे दिसून येते. सध्या या बाईकला एक सिंगल पीस सीट दिलेले दिसते. टायर हगर, इंटिग्रेटेड फूटरेस्टसह साडी गार्ड आणि इंजिन क्रॅश गार्ड यांचा समावेश आहे. एअर-कूल्ड मोटरची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.