Bajaj Freedom 125 : Bajaj ने जगाला केले अचंबित; पहिली CNG बाईक लाँच, 330 किमीची रेंज, मग किंमत तरी किती?
World First CNG Bike : बहुप्रतिक्षीत जगातील पहिली सीएनजी बाईक Bajaj Freedom 125 अखेर लाँच झाली. ही पेट्रोल आणि सीएनजी या दोन्ही पर्यायवर धावते. कंपनीच्या दाव्यानुसार, कंपनीने त्यासाठी 11 वेगवेगळ्या टेस्ट केल्या आहेत.
जगातील पहिली सीएनजी बाईक Bajaj Freedom 125 अखेर लाँच झाली. ही बाईक पेट्रोल आणि सीएनजी या दोन्ही इंधनावर धावेल. भारतीय दुचाकी कंपनी बजाजने हा चमत्कार घडवला आहे. बजाजने ते करुन दाखवले जे आतापर्यंत जगातील कोणत्याही कंपनीने केले नाही. या ऐतिहासिक दुचाकीच्या लाँचिंगवेळी केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. त्यांनी ही बाईक गेमचेंजर ठरणार असल्याचे सांगितले. आकर्षक लूक, स्पोर्टी डिझाईनमुळे बघता क्षणीच कोणी पण तिच्या प्रेमात पडेल अशी आहे. या बाईकची सुरुवातीची किंमत 95,000 रुपये (एक्स-शोरुम) आहे.
जगातील पहिल्या सीएनजी बाईकमध्ये काय खास
बजाज ऑटोने त्यांच्या या बाईकला कम्युटर सेग्मेंटमध्ये लाँच केले आहे. या बाईकच्या लूक आणि डिझाईनवर टीमने मेहनत घेतली आहे. पहिल्या नजरेतच तुम्हाला प्रश्न पडेल की सीएनजी सिलेंडर आहे तरी कुठे? ही बाईक पाहिल्यावर तुम्हाला अंदाज पण येणार नाही की, कंपनीने सीएनजी सिलेंडर कुठे ठेवले आहे ते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पण या कमाल डिझाईनचे कौडकौतुक केले.
कुठे आहे CNG सिलेंडर
बजाज ऑटोने याविषयीचा खुलासा केला आहे. या बाईकला कंपनीच्या दाव्यानुसार, सर्वात लांब सीट (785MM) देण्यात आली आहे. फ्रंट फ्युअल टँक त्यात बरोबर बसते. सीएनजी टँक या सीट खाली आहे. यामध्ये हिरव्या रंगाचे सीएनजी तर नारिंगी रंगात पेट्रोल दाखविता येते. या बाईकमध्ये रोबस्ट ट्रेलिस फ्रेम देण्यात आली आहे. त्यामुळे ही बाईक वजनाला हलकी आणि मजबूत झाली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार ही बाईक बाजारातील मानांकनानुसार 11 विविध चाचण्या उत्तीर्ण झाली आहे. ही बाईक पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा करण्यात आला आहे.
📍 𝐏𝐮𝐧𝐞
𝙇𝙖𝙪𝙣𝙘𝙝𝙚𝙙 𝙩𝙝𝙚 𝙒𝙤𝙧𝙡𝙙’𝙨 🌏 𝙁𝙞𝙧𝙨𝙩 𝘾𝙉𝙂 𝙈𝙤𝙩𝙤𝙧𝙘𝙮𝙘𝙡𝙚 🏍 𝙗𝙮 𝘽𝙖𝙟𝙖𝙟 𝘼𝙪𝙩𝙤 𝙞𝙣 𝐏𝐮𝐧𝐞 𝙩𝙤𝙙𝙖𝙮.
This groundbreaking innovation promises significant savings in operating costs and pollution reduction. With this eco-friendly… pic.twitter.com/TLyiLP38At
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) July 5, 2024
इतर वैशिष्ट्ये काय
जगातील पहिली सीएनजी बाईक Bajaj Freedom 125 मध्ये कंपनीिने 125 सीसी क्षमतेचे पेट्रोल इंजिन दिले आहे. हे इंजिन बाईकला 9.5PS ची पॉवर आणि 9.7Nm चा टॉर्क जनरेट करते. यामध्ये कंपनीने 2 लिटरचे पेट्रोल फ्युएल टँक आणि 2 किलोग्रॅमची सीएनजी टँक दिली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, बाईक फुल टँकमध्ये (पेट्रोल+सीएनजी) 300 किमीपर्यंतचे अंतर कापते.
ही बाईक तीन व्हेरिएंट्समध्ये सादर करण्यात आली आहे. Bajaj Freedom 125 बाईक डिस्क ब्रेक आणि ड्रम ब्रेक या दोन ब्रेकिंग सिस्टिमसह येते. ही बाईक एकूण 7 रंगामध्ये येईल. यामध्ये कॅरेबियन ब्लू, इबोनी ब्लॅक ग्रे, प्यूटर ग्रे ब्लॅक, रेसिंड रेड, सायबर व्हाईट, प्यूटर ग्रे येलो, इबोनी ब्लॅक रेड रंगाचा यामध्ये समावेश आहे.