नव्या रंगात, नव्या ढंगात Bajaj Pulsar 180 सादर होणार, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

बजाज ऑटोने कोणताही गाजावाजा न करता गेल्या महिन्यात नवीन बजाज पल्सर 180 (Bajaj Pulsar 180) ही बाईक लाँच केली होती.

नव्या रंगात, नव्या ढंगात Bajaj Pulsar 180 सादर होणार, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Bajaj Pulsar 180
Follow us
| Updated on: Mar 20, 2021 | 7:11 AM

मुंबई : बजाज ऑटोने (Bajaj Auto) कोणताही गाजावाजा न करता गेल्या महिन्यात नवी बजाज पल्सर 180 (Bajaj Pulsar 180) ही बाईक लाँच केली होती. या बाईकची किंमत 1,07,904 रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) इतकी ठेवण्यात आली आहे. या बाईकला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असतानाच कंपनीने ही बाईक अधिक आकर्षक बनवण्याचे ठरवले आहे. (Bajaj pulsar 180 coming up with new colors like blue)

बजाज ऑटोच्या प्लॅनिंगनुसार पल्सर 180 आता ब्लू कलर ऑप्शनसह लाँच केली जाणार आहे. ब्लूसोबत यामध्ये व्हाईट कलरचा वापर केला जाणार आहे. या बाईकला स्पोर्टी लुक देण्यासाठी कंपनीने ड्युअल टोन ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाइट ग्राफिक्सचा वापर केला आहे. अशा परिस्थितीत ग्राहक उत्सुकतेने या रंगांसह नव्या बाईकची वाट पाहात आहेत. दरम्यान, कंपनीने केवळ या बाईकच्या रंगांमध्ये बदल आणि अपडेट्स केले आहेत. फीचर्सच्या बाबतीत बाईक तशीच असेल जशी लाँचिंगवेळी सादर करण्यात आली होती.

दमदार फीचर्स

बजाज पल्सर 180 या बाईकचं मीटर कंसोल अॅनालॉग टॅकोमीटर आणि LCD स्क्रीनसह मिळेल. यामध्ये तुम्हाला फ्यूल लेवल आणि ओडोमीटर मिळेल. बाईकमध्ये BS 6- कंप्लायंट 180cc एयर कूल्ड सिंगल सिलेंडर देण्यात आलं आहे. जे 8500 rpm वर 17 PS पॉवर आणि 6500 rpm पर 14.2Nm टॉर्क जनरेट करु शकतं. या बाईकचं इंजिन 5 स्पीड गीयरबॉक्ससह डिझाईन करण्यात आलं असून या बाईकचं वजन 145 किलो इतकं आहे.

ब्रेकिंगसाठी या बाईकमध्ये 280 mm फ्रंट डिस्क आणि 230 mm रियर डिस्क ब्रेक देण्यात आला आहे. सेफ्टी नेटमध्ये सिंगल चॅनल एबीएस देण्यात आलं आहे जे स्टँडर्ड किटचा एक भाग आहे. ही बाईक सुरुवातीला दोन रंगांमध्ये उपलब्ध केली होती. ज्यामध्ये लेजर ब्लॅक आणि न्यूक्लियर ब्लू या दोन रंगांचा समावेश आहे. नवीन पल्सर 180 नेकेड मोटारसायकल आहे जी हॅलोजन हेडलँप आणि बल्ब इंडिकेटर्ससह येते. या बाईकमध्ये मागील बाजूस LED टेल लँप देण्यात आले आहेत. टीव्हीएस आपाचे RTR 180 आणि होंडा हॉर्नेट 2.0 या दोन बाईक्ससोबत या बाईकची स्पर्धा सुरु आहे.

पल्सर रेंजमधील बाईक्सना भारतात मोठी मागणी

बजाजच्या पल्सर रेंजमधील मोटारसायकलींना भारतात मोठी मागणी आहे. या रेंजमध्ये कंपनीने अनेक गाड्या सादर केल्या आहेत. बजाजच्या पल्सर 125 आणि पल्सर 150 या बाईक्सना मोठी मागणी आहे. बजाज पल्सर 180 ही बाईक पल्सर 125 आणि पल्सर 150 हून अधिक पॉवरफुल आणि दमदार आहे. पल्सर रेंजमधील मोटारसायकल्सचं डिझाईन खूपच आयकॉनिक आहे, त्यामुळे या रेंजमधील प्रत्येक बाईकला देशभरात मोठी पसंती मिळाली आहे.

इतर बातम्या

अवघ्या 85 हजारात खरेदी करा 2.13 लाखांची Royal Enfield Thunderbird 500

Ducati च्या दोन शानदार बाईक्स बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Honda CB 350 RS vs H’Ness CB 350 : तुमच्यासाठी परफेक्ट बाईक कोणती?

(Bajaj pulsar 180 coming up with new colors like blue)

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.