हिवाळ्यात कारने जायचे पर्यटनासाठी दूर, तर मग या टिप्स तर अजिबात नका विसरु

| Updated on: Nov 30, 2023 | 11:39 AM

Winter Car Tips | हिवाळ्यात वाहन चालविताना अधिक काळजी घ्यावी लागते. सकाळी आणि रात्री जास्त लक्ष द्यावे लागते. एकतर पारा घसरल्याने समोरील व्यवस्थित दिसत नाही. धुक्याची चादर घेऊन रस्त्यावरील प्रवास कधी पण अपघाताला निमंत्रण देऊ शकतो. त्यामुळे या काळात कार चालविताना अधिक अलर्ट रहावे लागते. त्यामुळे काही टिप्स फॉलो केल्या तर नुकसान टळू शकते.

हिवाळ्यात कारने जायचे पर्यटनासाठी दूर, तर मग या टिप्स तर अजिबात नका विसरु
Follow us on

नवी दिल्ली | 30 नोव्हेंबर 2023 : हिवाळा आला आहे. त्यात सध्या देशातील काही भागात पाऊस पण सुरु आहे. त्यामुळे सकाळी आणि रात्री पारा घसरलेला आहे. त्यात वाहन चालविण्याची कसरत फार सांभाळून करावी लागते. धुक्यामुळे अगदी हाकेच्या अंतरावरील वस्तू सुद्धा स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे कार चालविताना सावधगिरी ठेवणे आवश्यक आहे. रस्ता निसरडा असू शकतो. घाटात तर धुक्याची समस्या अधिक असते. कारवरील नियंत्रण सुटले तर मोठा अनर्थ घडू शकतो. तुम्हाला मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे हिवाळ्यात वाहन चालविताना अलर्ट रहावे लागते. काही टिप्स फॉलो केल्या तर कारचे आणि पर्यायाने तुमचे होणारे नुकसान टळू शकते.

काच नेहमी स्वच्छ ठेवा

रात्रीच्या वेळी कार चालविताना कारची मागची आणि पुढची काच स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. अशा वातावरणात सातत्याने फॉगची समस्या डोकेदुखी ठरु शकते. त्यामुळे कारमधील वातावरण आणि बाहेरली वातावरण यांच्यात ताळमेळ ठेवणे आवश्य आहे. काचेवर धुक्यामुळे दवबिंदू जमा होतात. ते सातत्याने दूर करावे लागतात. तर वाफेमुळे पण बाहेरील दिसत नाही. अशावेळी कारमधील हिटर तुमच्या मदतीला येऊ शकते. दृश्यमानता वाढते.

हे सुद्धा वाचा

वेगावर ठेवा नियंत्रण

हिवाळ्यात काचेवर सातत्याने वाफ जमा होत असल्याने समोरील दिसत नाही. अशावेळी दुर्घटना, अपघात होण्याची अधिक भीती असते. त्यामुळे हिवाळ्यात सकाळी आणि रात्री कार चालविताना तिचा वेग मर्यादीतच ठेवणे आवश्यक आहे.

लो बीमवर ठेवा दिवे

हिवाळ्यात लाईट्सची विशेष काळजी घ्यावी लागते. हाय बीमवरील दिवे धुक्यात अडचण आणतात. घनता जास्त असल्याने समोरील दिसण्यास अडचण येते. लो बीमवर लाईट्स ठेवल्यास ही अडचण होणार नाही. तुम्हाला निदान रस्त्यावरील एका विशिष्ट अंतरापर्यंत दिसू शकेल.

रस्त्यावरील पट्यांवर ठेवा लक्ष

रस्त्यावरील पट्यांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. तसेच रस्त्याच्या कडेला असलेल्या दिशानिर्देशकावर पण लक्ष ठेवा. त्यावर पूल, चौक, रेल्वे पटरी अथवा तत्सम विषयाची माहिती चिन्हांकित केलेली असते. तर रस्त्यावरील पांढऱ्या पट्या तुम्हाला रस्ता भरकटू देत नाहीत.

कारला लावा रिफ्लेक्टर

हिवाळ्यात दाट धुक्यामुळे दृश्यमानता अत्यंत कमी असते. समोरचे लवकर दिसत नाही. त्यामुळे कारला रिफ्लेक्टर बसवा. त्यामुळे मागील चालकाला तुमच्या वाहनाचा अंदाज घेता येईल. या पट्या रात्रीही चमकतात, त्याचा फायदा होईल.