रेड सिग्नल…! गाडीपेक्षा चालत गेलेलं बरं, फक्त 10 किमीसाठी लागतोय तब्बल इतका वेळ

शहरं आणि वाहतूक कोंडी हे गणित आता नित्याचंच झालं आहे. पण जागतिक स्तरावर भारतातील या शहरातील वाहतूक कोंडी डोकेदुखी ठरली आहे. फक्त 10 किमी अंतर कापण्यासाठी अर्ध्या तासांचा अवधी लागतो.

रेड सिग्नल...! गाडीपेक्षा चालत गेलेलं बरं, फक्त 10 किमीसाठी लागतोय तब्बल इतका वेळ
अरे रे! शहराच्या नावावर नकोसा विक्रम, आयटी हब म्हणता वाहतूक कोंडीत अडकता
Follow us
| Updated on: Feb 15, 2023 | 4:33 PM

मुंबई : भारताचा जागतिक लोकसंख्येच्या यादीत दुसरा क्रमांक लागतो. यावरून शहरं, गावं आणि राज्यांचा अंदाज येतो. जेव्हा एखाद्या देशाची लोकसंख्या वाढते तेव्हा त्याचा ताण इतर गोष्टींवर पडतो.असं असताना बंगळुरू शहराची व्यथा काही वेगळीच आहे. या शहरानं वाहतूक कोंडीच्या बाबतीत नव्या विक्रमाची नोंद केली आहे, असं म्हणावं लागेल. बंगळुरू हे आयटी हब आहे. पण वाहतूक कोंडीबाबत विचारलं तर जीव नकोसा होतो. अनेक जण गाडी चालवताना डोक्यावर हात मारतात. तसेच नेमकी गाडी कशासाठी घेतली? असा प्रश्न उपस्थित करतात. बंगळुरूतील वाहतूक कोंडीबाबत अनेक मीम्स देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.नुकत्याच एका अभ्यासातून समोर आलं आहे की, बंगळुरू हे वाहतुकीच्या यादीत सर्वात धीमं शहर आहे. या शहरात 10 किमीसाठी अर्धा तास मोजावा लागतो. कर्नाटकातील बंगळुरु या शहराच्या नावावर नकोसा विक्रमाची नोंद झाली आहे. जागतिक स्तरावर लंडन पहिल्या क्रमांकावर तर बंगळुरू दुसऱ्या क्रमांकाचं वाहतूक कोंडी असलेलं शहर आहे.

जिओलोकेशन टेक्नोलॉजी स्पेशालिस्ट टॉम टॉमनं दिलेल्या अहवालानुसार, वर्दळीच्या वेळी वाहतूक करताना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना 10 किलोमीटरसाठी 28 मिनिटं 9 सेंकद इतका वेळ लागतो. 2022 या वर्षातील अंदाज घेऊन ही आकडेवारी देण्यात आली आहे. या यादीत इंग्लंडमधील लंडन हे शहर पहिल्या क्रमांकावर आहे. 10 किमीसाठी 35 मिनिटांचा अवधी लागतो. आयर्लंडमधील डब्लिन शहर तिसऱ्या क्रमांकावर, जापानमधील साप्पोरो चौथ्या क्रमांकावर आणि इटलीमधील मिलान हे शहर पाचव्या क्रमांकावर आहे. टॉमटॉमने 600 दशलक्ष उपकरणांचे विश्लेषण करून हा डेटा प्राप्त केला आहे. यात कार नेव्हिगेशन, स्मार्टफोन, पर्सनल नेव्हिगेशन आणि टेलेमॅटिक्स सिस्टमचा आधार घेतला आहे.एजन्सीने जगभरातील 61 दशलक्ष जीपीएसकडून डाटा जमा केला आहे.

अहवालात ड्रायव्हिंग कॉस्टबाबतही चाचपणी करण्यात आली आहे. यात पेट्रोल, डिझेलसह इलेक्ट्रिक कार चार्जिंगसाठी लागणारा खर्च यात पकडण्यात आला आहे. त्याचबरोबर अंतर कापण्यासाठी किती अवधी लागला आणि किती कार्बन उत्सर्जन झालं? याचा अभ्यासही करण्यात आला आहे. बंगळुरु शहरात गाडी चालवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला असाच अनुभव आला आहे. या सर्व चाचणीतही बंगळुरु शहर पहिल्या पाचमध्ये आहे.

वर्दळीच्या वेळी बंगळुरुत जबरदस्त वाहतूक कोंडी असते. गेल्या वर्षी 129 तास हे तापदायक वाहतूक कोंडीचे होते. वाहतूक कोंडीच्या बाबतीत पहिल्या पाचमध्ये बंगळुरू शहर चौथ्या स्थानी आहे. वाहतूक कोंडीच्या या काळात पेट्रोल गाड्यांमधून 974 किलो कार्बन उत्सर्जन झालं.कार्बन उत्सर्जनच्या यादीत बंगळुरु पाचव्या स्थानी आहे. या अहवालात डिझेल कार्बन उत्सर्जनाबाबत उल्लेख केलेला नाही.

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...