Car Price : आता नाही तर कधीच नाही… ‘या’ गाड्यांवर 25 ते 60 हजार रुपयांपर्यंत बंपर सूट
रेनॉल्ट क्विडच्या खरेदीवर ग्राहकांना 50,000 रुपयांची सूट मिळत आहे. ही ऑफर फेसलिफ्ट 2019 मॉडेलवर उपलब्ध आहे. ही कार दोन पेट्रोल पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. नवीन रेनॉल्ट क्विडमध्ये 35,000 रुपयांची कॅश डिस्काउंट, 5,000 रुपयांच्या मोफत अॅक्सेसरीज आणि स्क्रॅपेज पॉलिसीवर 10,000 रुपयांची एक्सचेंज डिस्काउंटचा समावेश आहे.
भारतातील लोकप्रिय कार कंपनी असलेल्या रेनॉल्ट, होंडा आणि मारुती सुझुकी त्यांच्या अनेक मॉडेल्सवर 25 हजार ते 60 हजार रुपयांपर्यंत सूट देत आहेत. रेनॉल्टबद्दल बोलायचे झाल्यास कंपनीकडून फ्रीडम कार्निवलच्या नावाने आपल्या सर्व मॉडेल्सवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येत आहे. या ऑफर क्विड (Kwid), ट्रायबर (Triber), काइगर, होंडा सिटी, अमेज, ऑल्टो आणि सेलेरिओवर (Celeria) देण्यात येत आहेत. रोख सवलतींसह, स्क्रॅपेज फायदे आणि एक्सचेंज बोनस ऑफरदेखील उपलब्ध आहेत. तर होंडा आपल्या चौथ्या आणि पाचव्या जनरेशनच्या सिटी आणि अमेझ मॉडेल्सवर मेगा डिस्काउंट देत आहे. मारुतीच्या कार्सवरही चांगल्या ऑफर्स देण्यात येत आहे. कोणत्या कार्सवर किती ऑफर देण्यात येत आहे, याची माहिती या लेखातून घेणार आहोत.
रेनॉल्ट ट्रायबर
रेनॉल्ट आपल्या ट्रायबर कारवर 60,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. या कारवर 45000 हजारांची कॅश डिस्काउंट, 5000 हजारांची मोफत अॅक्सेसरीज आणि स्क्रॅपेज पॉलिसी लाभांतर्गत 10 हजार रुपयांची सूट मिळत आहे. एकूणच, कंपनी 60 हजार रुपयांपर्यंत सूट देत आहे.
होंडा सिटी (पाचवी जनरेशन)
ाया कारच्या खरेदीवर ग्राहकांना 27,496 रुपयांची सूट मिळू शकते. ही कार दोन वेगवेगळ्या इंजिन ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. होंडा सिटीवर ग्राहकांना 5,000 रुपयांची कॅश डिस्काउंट, 5496 रुपयांच्या मोफत अॅक्सेसरीज, 7000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट मिळू शकते.
रेनॉल्ट क्विड
या कारच्या खरेदीवर ग्राहकांना 50,000 रुपयांची सूट मिळत आहे. ही ऑफर फेसलिफ्ट 2019 मॉडेलवर उपलब्ध आहे. ही कार दोन पेट्रोल पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. नवीन रेनॉल्ट क्विडमध्ये 35,000 रुपयांची कॅश डिस्काउंट, 5,000 रुपयांच्या मोफत अॅक्सेसरीज आणि स्क्रॅपेज पॉलिसीवर 10,000 रुपयांची एक्सचेंज डिस्काउंटचा समावेश आहे.
होंडा अमेझ
होंडाची अमेझ ही सर्वात लोकप्रिय सेडन कार आहे. होंडा अमेझवर 8,000 पर्यंत डिस्काउंट ऑफर मिळत आहे. या शिवाय 5000 लॉयल्टी बोनस आणि 3,000 कॉर्पोरेट सूट मिळू शकते.
होंडा WR-V
या कारवर 27 हजार रुपयांची सूट मिळत आहे. 10 हजार रुपयांचा कार एक्सचेंज बोनस, 5000 रुपयांचा लॉयल्टी बोनस मिळत आहे. एक्स्चेंज बेनिफिट म्हणून 7 हजार अधिक सूट मिळू शकते. कॉर्पोरेट डिस्काउंटबद्दल बोलायचे झाले तर 5 हजार रुपये मिळू शकतात.
मारुती सेलेरियो
मारुतीची सेलेरियो ही अतिशय लोकप्रिय कार आहे. गाडीवाडी डॉट कॉमनुसार, ग्राहकांना या कारवर डीलरकडून 54 हजारांपर्यंत सूट मिळू शकते. या सवलतीमध्ये 35,000 रोख, 15,000 एक्सचेंज बोनस आणि 4,000 कॉर्पोरेट सूट मिळत आहे.
अल्टो 800
वाहन वेबसाइट ‘गाडीवाडी’नुसार, कंपनी मारुती सुझुकीची सर्वाधिक विक्री होणारी कार अल्टोवर 22 हजार रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. यात 8 हजार रोख सूट, 10 हजार एक्सचेंज बोनस आणि 4 हजार कॉर्पोरेट सूट आहे.