Bike Insurance | कुठे खरेदी करावा दुचाकी विमा, ऑनलाईन की ऑफलाईन, कोणता पर्याय सर्वोत्तम
Bike Insurance | आज दुचाकी विमा गरजेचा झाला आहे. तुम्ही नवीन बाईक खरेदीचा विचार करत असाल तर विमा खरेदीविषयीची माहिती जमा करायला सुरुवात करा. याशिवाय तुमच्याकडे अगोदरच बाईक असेल आणि विमा खरेदी केली नसेल तर ही काही महत्वाची माहिती तुमच्यासाठी गरजेची आहे. ऑनलाईन की ऑफलाईन यापैकी कोणता पर्याय तुमच्यासाठी चांगला असेल?
नवी दिल्ली | 24 ऑक्टोबर 2023 : दुचाकी असेल तर विमा आता गरजेचा झाला आहे. अनेकदा वाहतूक पोलीस तुम्हाला अडवतात आणि तुमच्याकडे परवाना आणि विम्याची माहिती विचारतात. बाईकचा अपघात झाला असेल आणि विमा नसेल तर तुम्हाला मोठा फटका बसतो. तुमचे नुकसान होते. जर तुमच्या बाईकचा इन्शुरन्स अद्याप झालेला नसेल तर तो करुन घ्या. पण विमा कुठून खरेदी करावे याबाबत तुम्ही संभ्रमात असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्वाची ठरेल. पूर्वी ऑफलाईन हाच पर्याय होता. पण आता ऑनलाईनचा पर्याय पण समोर आला आहे. त्यामुळे यापैकी कोणता पर्याय फायदेशीर ठरेल हे पाहुयात..
विम्यावर किती दंड
मोटर वाहन अधिनियम 2019 नुसार विना इन्शुरन्स पॉलिसी दुचाकी चालविणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे पहिल्यांदा तुम्हाला 2,000 रुपयांपर्यंतचा दंड बसू शकतो. तर दुसऱ्या वेळी दंडाची रक्कम 4,000 रुपयांपर्यंत वाढू शकते.
ऑनलाईन-ऑफलाईन कोणता पर्याय बेस्ट
बाईक इन्शुरन्सची डीलरशिप, स्थानिक कंपन्या अथवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून करण्यात येते. दुचाकीचा विमा खरेदी करताना ऑनलाईन की ऑफलाईन कोणता पर्याय बेस्ट ठरतो हे आपण पाहुयात. आता प्रत्येकाकाडे स्वतःचे लॅपटॉप, स्मार्टफोन आहे. इंटरनेटच्या माध्यमातून ग्राहकांना ऑनलाईन बाईक इन्शुरन्स खरेदी करता येईल. त्यामुळे एजंट, मध्यस्थाच्या कमिशनपासून तुमची सूटका होईल आणि विमा स्वस्तात मिळवता येईल. घर बसल्या तुमच्या बाईकला विम्याचे संरक्षण मिळेल.
असा काढा ऑनलाईन बाईक इन्शुरन्स
- स्टेप 1: सर्वात अगोदर आवडीच्या विमा कंपनीच्या संकेतस्थळावर जा. या ठिकाणी बाईक इन्शुरन्सचा पर्याय निवडा. याठिकाणी विम्याची किंमत तुम्हाला लागलीच कळेल. बाईक विमा खरेदीसाठी अगोदर Quote चे बटण दाबा. काही कंपन्या ग्राहकाचा बाईक क्रमांक, फोन क्रमांक, मोबाईल क्रमांक अशी माहिती मागवितात. त्यानंतर विम्याची किंमत कळवतात.
- स्टेप 2 : बाईक क्रमांक, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी अशी माहिती सविस्तर भरा. त्यानंतर तुमच्या बाईकची माहिती द्या. त्याआधारे तुमच्या विम्याचा हप्ता किती असेल. तुम्हाला हा हप्ता करण्यासाठी पर्याय सांगण्यात येईल.
- स्टेप 3 : आता तुम्हाला विमा पॉलिसीचा प्रीमियम किती द्यावा लागेल हे कळल्यानंतर हा प्रीमियम कसा जमा करायचा याचा पर्याय समोर येईल. तुमच्या सुविधेनुसार, डेबिट/क्रेडिट कार्ड, Net banking वा UPI च्या माध्यमातून विम्याचा हप्ता भरता येईल.