हिवाळ्यात बाईकची करा घरच्या घरी सर्व्हिसिंग, संपूर्ण सीझन देईल दमदार मायलेज

हिवाळ्याच्या  वातावरणात गाडी नीट चालत नाही. त्यामुळे अनेकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अश्यातच तुम्ही तुमच्या गाडीची व बाईकचे मेंटेनन्स करून घेणे फार महत्वाचे आहे.

हिवाळ्यात बाईकची करा घरच्या घरी सर्व्हिसिंग, संपूर्ण सीझन देईल दमदार मायलेज
Follow us
| Updated on: Nov 13, 2024 | 4:28 PM

हिवाळा ऋतू सुरु झाला असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. थंडीच्या वातावरणात गाडी नीट चालत नाही. त्यामुळे अनेकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अश्यातच तुम्ही तुमच्या गाडीची व बाईकचे मेंटेनन्स करून घेणे फार महत्वाचे आहे. तुम्हाला जर हिवाळ्यात बाईकमधून चांगले मायलेज मिळवायचे असेल आणि चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी काही खास तयारी करणं गरजेचं आहे. जर तुम्ही तुमच्या बाईकमध्ये काही खास मेंटेनन्स करून घेतले तर तुमची गाडी थंडीत चांगले परफॉर्मन्स तर देईलच पण चांगले मायलेजही मिळेल. यासाठी हिवाळा सुरू होण्यापूर्वी बाईकमध्ये या ५ गोष्टी अवश्य करा. चला तर मग जाणून घेऊयात.

बाईकमधील इंजिन ऑईल बदला

थंडीच्या दिवसात आपल्या गाडीतील इंजिन ऑईल गोठण्याची शक्यता जास्त असते. ज्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या गाडीच्या इंजिनवर होऊ शकतो आणि तुम्हाला कमी मायलेज मिळू शकतो. त्यामुळे तुमच्या गाडीतील जुने इंजिन ऑईल बदली करून चांगल्या दर्जाचे इंजिन ऑईल भरा. जे थंडीत गोठू शकणार नाही.

एअर फिल्टर साफ करणे

गाडीच्या एअर फिल्टरमध्ये खूप धूळ आणि घाण जमा होत असते. ज्यामुळे इंजिनला पुरेशी हवा मिळत नाही आणि मायलेजवर परिणाम होतो. म्हणून हिवाळ्यात एअर फिल्टर साफ करणे किंवा बदलणे चांगले आहे जेणेकरून थंडीच्या दिवसात इंजिन सुरळीतपणे कार्य करू शकेल.

हे सुद्धा वाचा

हिवाळ्यात गाडीचे स्पार्क प्लग तपासणे

तुमच्या गाडीची स्पार्क प्लग योग्यरित्या कार्य करत नसेल तर इंजिनची इग्निशन प्रोसेस कमी होऊ शकते. यामुळे इंधन जाळण्यासाठी अधिक वेळ त्यासोबत अधिक प्रमाणात इंधन लागेल. याकरिता थंडीच्या दिवसात तुमच्या गाडीची स्पार्क प्लगची तपासणी करा आणि आवश्यक असल्यास बदली करून घ्या.

टायर प्रेशर तपासा

हिवाळ्यात टायरमधील हवेचा दाब कमी होऊ शकतो, ज्याचा परिणाम बाइकच्या बॅलन्स आणि मायलेज दोन्हीवर होईल. त्यामुळे दर आठवड्याला टायरमधील हवेचा दाब तपासा आणि योग्य प्रमाणात हवा भरून घ्या.

साखळी आणि ब्रेकची सर्व्हिसिंग

थंडीत गाडीची साखळी आणि ब्रेक गंजण्याची शक्यता असते. म्हणून साखळीतील धूळ आणि ग्रीस काढून टाकण्यासाठी ब्रश आणि डिटर्जंट वापरा. साफ केल्यानंतर साखळीवर चेन ल्युब किंवा ग्रीस लावा, जेणेकरून बाईक सुरळीत चालेल आणि घर्षण कमी होईल. तसेच ब्रेक्स नीट काम करतात का ते नियमितपणे तपासा. ब्रेक पॅड किंवा ब्रेक शूज घासले गेले असतील तर ते बदला. यामुळे इंजिनवरील दबाव कमी होईल आणि मायलेज सुधारेल.

या सोप्या मेंटेनन्स टिप्स फॉलो करून तुम्ही तुमची बाइक हिवाळ्याहिवाळा ऋतूत नीट चालवण्यासाठी पूर्णपणे तयार करू शकता आणि मायलेजचाही फायदा घेऊ शकता.

यंदाच्या अर्थसंकल्पात काय स्वस्त-काय महाग? बघा एकाच व्हिडीओमध्ये....
यंदाच्या अर्थसंकल्पात काय स्वस्त-काय महाग? बघा एकाच व्हिडीओमध्ये.....
Union Budget 2025 : अर्थसंकल्पातील 'या' 10 महत्त्वाच्या घोषणा
Union Budget 2025 : अर्थसंकल्पातील 'या' 10 महत्त्वाच्या घोषणा.
'...म्हणून मुंडेंना आधार दिला', महंत नामदेव शास्त्री स्पष्टच बोलले
'...म्हणून मुंडेंना आधार दिला', महंत नामदेव शास्त्री स्पष्टच बोलले.
गडाआडून मुंडेंचा दबाव? तर महंत नामदेव शास्त्रींचा 'राजकीय' इशारा काय?
गडाआडून मुंडेंचा दबाव? तर महंत नामदेव शास्त्रींचा 'राजकीय' इशारा काय?.
भगवानगडाचं 'राजकीय' दार तब्बल 11 वर्षांनी कसं उघडलं?
भगवानगडाचं 'राजकीय' दार तब्बल 11 वर्षांनी कसं उघडलं?.
देशाचा 'अर्थ' संकल्प कसा असेल? थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी क्लिक करा...
देशाचा 'अर्थ' संकल्प कसा असेल? थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी क्लिक करा....
हत्या महाराष्ट्रात, मृतदेह गुजरातमध्ये..धोडींच्या हत्येचा असा घटनाक्रम
हत्या महाराष्ट्रात, मृतदेह गुजरातमध्ये..धोडींच्या हत्येचा असा घटनाक्रम.
Union Budget : आज अर्थसंकल्प सादर करणार, 'या' 8 घोषणा होण्याची शक्यता
Union Budget : आज अर्थसंकल्प सादर करणार, 'या' 8 घोषणा होण्याची शक्यता.
राज्यपाल बनवण्याच्या चर्चेवर भुजबळ स्पष्टच म्हणाले, '...तोंडाला कुलूप'
राज्यपाल बनवण्याच्या चर्चेवर भुजबळ स्पष्टच म्हणाले, '...तोंडाला कुलूप'.
'उदय सामंतांचंच ऑपरेशन कधी होईल सांगता येत नाही', राऊतांचा टोला
'उदय सामंतांचंच ऑपरेशन कधी होईल सांगता येत नाही', राऊतांचा टोला.