विना हेल्मेट बाइक आणि स्कूटर आता सुरुच होणार नाही, ओला आणतंय जबरदस्त टेक्नोलॉजी

Helmet Detection System: दुचाकींसाठी आता हेल्मेट घालणं अनिवार्य केलं आहे. पण असं असूनही अनेक जण त्याकडे दुर्लक्ष करतात आणि अपघात झाला की जीवाला मुकतात. यासाठी ओला आता नवीन तंत्रज्ञान आणत आहे.

विना हेल्मेट बाइक आणि स्कूटर आता सुरुच होणार नाही, ओला आणतंय जबरदस्त टेक्नोलॉजी
ओलाच्या नव्या टेक्नोलॉजीमुळे बाइक प्रेमी खूश, विना हेल्मेट बाइक आणि स्कूटर स्टार्टच होणार नाही
Follow us
| Updated on: Jun 19, 2023 | 9:44 PM

मुंबई : देशात दुचाकीवरून होणारे अपघात पाहता हेल्मेट घालणं अनिवार्य केलं आहे. पण अद्यापही काही जण याकडे दुर्लक्ष करतात. वाहतूक पोलिसांना चुकवून प्रवास करतात. पण अनेकदा हा प्रवास जीवघेणा ठरू शकतो. विना हेल्मेट दुचाकी चालवणं दंडनीय अपराध आहे. मात्र असं असूनही त्याकडे कानाडोळा केला जातो. त्यामुळे हेल्मेटचं महत्त्व जाणून भारतातील सर्वात मोठ्या टू व्हीलर कंपनीने महत्त्वाचं पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ओला इलेक्ट्रिक एक खास तंत्रज्ञान आणणार आहे. कंपनी हेल्मेट डिटेक्श सिस्टमवर काम करत आहे. जर कोणी रायडर हेल्मेट न घालता ओला इलेक्ट्रिक स्कूटर चालवण्यास गेला तर सिस्टम त्याला तात्काळ अलर्ट करेल. इतकंच काय तर ओलाची टू व्हीलर पुढे जाणार नाही.

हेल्मेट डिटेक्शन सिस्टम कॅमेऱ्याच्या माध्यमातून काम करेल. कॅमेऱ्याच्या माध्यमातून रायडरने हेल्मेट घातलं आहे की नाही याबाबतची माहिती मिळेल. ही माहिती व्हेइकल कंट्रोल युनिटपर्यंत जाईल. मोटार कंट्रोल युनिटला हेल्मेटची माहिती मिळेल. इथे टू व्हीलर राइड मोडला आहे की नाही हे कळेल. टू व्हीलर रायडर मोडवर असेल आणि हेल्मेट घातलं नसेल तर गाडी ऑटोमॅटिकली पार्क मोडवर जाईल.

याचा अर्थ असा की जिथपर्यंत तुम्ही हेल्मेट घालत नाही तोपर्यंत स्कूटर पुढे जाणार नाही. पार्क मोडची माहिती डॅशबोर्डवर दिली जाईल. तसेच हेल्मेट घालण्याची आठवण करून दिली जाईल. जेव्हा तुम्ही हेल्मेट घालाल तेव्हा स्कूटर राईड मोडवर येईल आणि तुम्ही पुढचा प्रवास करू शकता.

टीव्हीएसने देखील एक कॅमेरा आधारित हेल्मेट रिमांइडर सिस्टमची घोषणा केली आहे. पण ओलाचं तंत्रज्ञान त्याच्या एक पाऊल पुढे असल्याचं अधोरेखित होतं. कारण तुम्ही जिथपर्यंत हेल्मेट घालणार नाही. तोपर्यंत गाडी पुढे जाणारच नाही. टीव्हीएसमध्ये रायडर एक वॉर्निंस मेसेज मिळेल. यात पार्किंग मोडमध्ये लॉक होईल असं काही सांगण्यात आलेलं नाही.

Non Stop LIVE Update
आम्ही 13 जुलैपर्यंतच वाट बघणार, त्यानंतर...जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम
आम्ही 13 जुलैपर्यंतच वाट बघणार, त्यानंतर...जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम.
मनोज जरांगे साहेब, जरा शब्दांना...शिंदे गटाच्या महिला नेत्यानं सुनावलं
मनोज जरांगे साहेब, जरा शब्दांना...शिंदे गटाच्या महिला नेत्यानं सुनावलं.
कुटुंबातील 17 जण पिकनीकला, भावाचा फोन अन् घाबरतच म्हणाला, मुलगी वाहून
कुटुंबातील 17 जण पिकनीकला, भावाचा फोन अन् घाबरतच म्हणाला, मुलगी वाहून.
सत्तेची वारी शेवटची..माझी लाडकी बहीण योजनेवरून सामनातून दादांवर निशाणा
सत्तेची वारी शेवटची..माझी लाडकी बहीण योजनेवरून सामनातून दादांवर निशाणा.
रस्त्यावरच महाकाय मगरीचा कॅटवॉक, नागरिकांमध्ये खळबळ, बघा थरारक व्हिडीओ
रस्त्यावरच महाकाय मगरीचा कॅटवॉक, नागरिकांमध्ये खळबळ, बघा थरारक व्हिडीओ.
संभाजी भिडेंच्या 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावरून काँग्रेस नेत्या भडकल्या
संभाजी भिडेंच्या 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावरून काँग्रेस नेत्या भडकल्या.
महिलांबद्दल केलेल्या 'त्या' वक्तव्यानं संभाजी भिडे वादाच्या भोवऱ्यात
महिलांबद्दल केलेल्या 'त्या' वक्तव्यानं संभाजी भिडे वादाच्या भोवऱ्यात.
अजित दादांच्या बालेकिल्ल्याला सुरूंग? थोरल्या पवारांचा डाव नेमका काय?
अजित दादांच्या बालेकिल्ल्याला सुरूंग? थोरल्या पवारांचा डाव नेमका काय?.
जिंकल्यानंतर विराट रोहितचा टी20 क्रिकेटला अलविदा, बघा त्यांची कारकीर्द
जिंकल्यानंतर विराट रोहितचा टी20 क्रिकेटला अलविदा, बघा त्यांची कारकीर्द.
आता नाव घेऊन पाडणार, मनोज जरांगे पाटील यांनी काय दिला थेट इशारा?
आता नाव घेऊन पाडणार, मनोज जरांगे पाटील यांनी काय दिला थेट इशारा?.