BMW ची इलेक्ट्रिक Mini Cooper SE भारतात लाँचिंगसाठी सज्ज, कशी असेल नवीन EV?

बीएमडब्ल्यू ग्रुपने (BMW Group) जुलै 2019 मध्ये मिनी ब्रँडची पहिली इलेक्ट्रिक हॅचबॅक कूपर एसई (Cooper SE) लाँच केली होती. गेल्या अडीच वर्षात, या कारला जागतिक बाजारपेठेत चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

BMW ची इलेक्ट्रिक Mini Cooper SE भारतात लाँचिंगसाठी सज्ज, कशी असेल नवीन EV?
BMW Mini Cooper SE (Photo : mini.in/en_IN)
Follow us
| Updated on: Feb 19, 2022 | 12:08 PM

मुंबई : बीएमडब्ल्यू ग्रुपने (BMW Group) जुलै 2019 मध्ये मिनी ब्रँडची पहिली इलेक्ट्रिक हॅचबॅक कूपर एसई (Cooper SE) लाँच केली होती. गेल्या अडीच वर्षात, या कारला जागतिक बाजारपेठेत चांगला प्रतिसाद मिळाला आहे. Cooper SE अखेर 24 फेब्रुवारी रोजी भारतात लॉन्च होईल. इलेक्ट्रिक हॅचबॅकला (Electric Hatchback) मे 2021 मध्ये जागतिक स्तरावर अपडेटेड लुक, नवीन फीचर्स आणि तंत्रज्ञानासह नवीन अपडेट्स मिळाले आहेत आणि आता ही कार भारतात लाँच केली जात आहे. Cooper SE साठी स्थानिक पातळीवर बुकिंग घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे आणि एप्रिल 2022 मध्ये डिलिव्हरी सुरू करु 30 युनिट्सची पहिली बॅच ग्राहकांपर्यंत पोहोचवली जाईल.

मिनी स्टाइलसह, 2022 Cooper SE एक बंद फ्रंट ग्रिल, यलो अॅक्सेंट आणि बल्बनुमा एलईडी हेडलॅम्पसह येते. इतर एस्टीरियर हायलाईट्स युनियन जॅक इन्सर्टसह मेन एलईडी टेल लॅम्प, पिलर्सवर काळ्या रंगाचे फिनिश असलेले ड्युअल-टोन रुफ, रुफवरील इंटिग्रेटेड स्पॉयलर, ब्रिटीश प्लग सॉकेटसारखी दिसणारी 17 इंचांची चाके आणि ORVM कॅप्सवर यलो पेंट यांचा समावेश आहे. रेग्युलर ICE मॉडेलच्या तुलनेत, Mini Cooper SE चे समोर आणि मागील बंपर वेगवेगळे आहेत.

इलेक्ट्रिक हॅचबॅकमध्ये काय आहे खास

इलेक्ट्रिक हॅचबॅक भारतात व्हाइट सिल्व्हर, मिडनाईट ब्लॅक, मूनवॉक ग्रे आणि ब्रिटिश रेसिंग ग्रीन कलर स्कीममध्ये विकली जाईल. इंटीरियर अधिक शानदार बनवण्यासाठी यात नवीन डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, रीजन ब्रेकिंगसाठी सेंटर कन्सोलवर टॉगल स्विच, येलो एक्सेंट, 8.8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल इत्यादींचा समावेश आहे. डिव्हाइस सूचीमध्ये पॉवर-फोल्डिंग मिरर, पॅनोरमिक मूनरूफ, रेन-सेन्सिंग वायपर, लेदर-रॅप्ड स्टीयरिंग व्हील, हरमन कार्डन ऑडिओ, हीटेड फ्रंट सीट्स आणि लेदर सीट्सचा समावेश आहे. ही भारतातील सर्वात स्वस्त लक्झरी इलेक्ट्रिक कार म्हणून ओळख निर्माण करेल, असा कंपनीचा दावा आहे.

Cooper SE मध्ये 32.6 kWh Li-ion बॅटरी पॅक ऑफर केली जाईल, सोबत 184 hp आणि 270 Nm टॉर्क जनरेट करणारी इलेक्ट्रिक मोटर येऊ शकते. कूपर एसई 7.3 सेकंदात शून्य ते 100 किमी प्रतितास वेग धारण करु शकते, असा दावा कंपनीने केला आहे. ही कार ताशी 150 किलोमीटर इतक्या वेगाने धावू शकते. यात चार ड्राइव्ह मोड्सदेखील मिळतात आणि WLTP सायकलमध्ये ही कार 270 किमीपर्यंतची रेंज देते. 50 kW फास्ट चार्जर वापरून ही कार केवळ 35 मिनिटांत 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकते.

इतर बातम्या

गिअरच्या झंझटपासून सुटका, या स्वस्तातील कारमध्ये ऑटोमॅटिक गिअरचा पर्याय

बोलेरोपासून स्कॉर्पिओपर्यंत महिंद्राच्या गाड्यांवर मिळतोय मोठा डिस्काउंट, आताच जाणून घ्या ऑफर!

Tata Motors | जॅग्वार होणार अधिक सुरक्षित, मिळणार नवीन दमदार फीचर्स

...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.