बॉलीवूड स्टार हृतिक रोशनने खरेदी केली आलिशान Range Rover, काय आहे किंमत ?

बॉलिवूड स्टार हृतिक रोशन नुकताच एका नव्या आलिशान रेंज रोव्हर एसयूव्हीमध्ये स्पॉट झाला आहे. हृतिकने ही नवीन रेंज रोव्हर विकत घेतल्याचे म्हटले जात आहे. हृतिक रोशनची ही नवीन रेंज रोव्हर एसयूव्ही कशी आहे, त्यात काय फीचर्स आहेत आणि तिची किंमत काय आहे. पाहूयात

बॉलीवूड स्टार हृतिक रोशनने खरेदी केली आलिशान Range Rover, काय आहे किंमत ?
HRITHIK ROSHAN BUYS RANGE ROVER Image Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Mar 24, 2024 | 8:59 PM

नवी दिल्ली : बॉलीवूडच्या सुपरस्टारना आलिशान महागड्या कारचा वापर करण्याची आवड असते. अनेक सुपरस्टार आपल्या पदरी महागड्या लक्झरीयस एसयूव्ही कार ठेवत असतात. आता अलिकडेच सुपरस्टार हृतिक रोशन याने महागड्या रेंज रोव्हर कारला ( Range Rover Autobiography ) विकत घेतले आहे. रेंज रोव्हर कारचे वैशिष्ट्ये काय आहेत. आणि या कारची किंमत काय आहे ते पाहूयात बॉलीवूड स्टार हृतिक रोशन याच्या एका नव्या एसयूव्हीचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. मिळालेल्या माहीतीनूसार अभिनेता हृतिक रोशन याने रेंज रोव्हरच्या नव्या एसयूव्ही Autobiography ला खरेदी केले आहे. या कारमधून प्रवास करतान अलिकडे या स्टार स्पॉट करण्यात आल्यानंतर हा खुलासा झाला आहे. Range Rover Autobiography च्या लॉंग व्‍हील बेस वेरिएंटला हृतिक रोशन याने विकत घेतल्याचे सांगण्यात येते.

काय आहेत वैशिष्ट्ये

Range Rover Autobiography च्या ज्या लॉंग व्‍हील बेस वेरिएंटला हृतिक रोशन याने खरेदी केले आहे. त्यात तीन लिटरचे डीझेल हायब्रिड इंजिनची सुविधा आहे. या एसयूव्हीला 346 बीएचपी आणि 700 न्यूटन मीटरचा टॉर्क मिळतो. यात आठ गिअरचा ऑटोमेटिक गियर्स बॉक्स आहे. या गाडीचे ऑल व्हील ड्राईव्हचे देखील मॉडेल असते. ही कार संपूर्ण साऊंड प्रूफ असून बाहेरील आवाज आत येत नाही. 1600 वॅटच्या 35 स्पिकरची ऑडीओ सिस्टीम यात असते. केबिन एअर प्युरीफायर, 13.1 इंचाची इंफोटेनमेंट स्क्रीन, 13.7 इंचाचा इंस्ट्रुमेंट क्लस्टर, एडेप्टिल सस्पेंशनसारखे अनेक फिचर्सचा या एसयूव्हीत समावेश आहे.

किंमत किती ?

बॉलीवूड स्टार हृतिक रोशन याने सेंटोरिनी ब्लॅक कलरची रेंज रोव्हर एसयूव्हीस खरेदी केली आहे. तिची एक्स-शोरूम किंमत 3.1 कोटी रुपये आहे. हृतिक रोशनकडे अनेक आलिशान गाड्या आहेत ज्यात ऑडी, मर्सिडीज, ॲस्टन मार्टिन आणि रोल्स रॉयस सारख्या लक्झरी आणि सुपरकारचा समावेश आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.