1 लाख रुपयात बुक करा BMW ची शानदार कार, कंपनीकडून फ्री ड्रायव्हिंग ट्रेनिंग

भारतात बीएमडब्ल्यू ऑल-न्यू BMW M340i या सेडान कारची किंमत 62.90 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे. (BMW free driving training)

1 लाख रुपयात बुक करा BMW ची शानदार कार, कंपनीकडून फ्री ड्रायव्हिंग ट्रेनिंग
BMW M340i
Follow us
| Updated on: Mar 21, 2021 | 7:08 AM

मुंबई : भारतात बीएमडब्ल्यू ऑल-न्यू BMW M340i या सेडान कारची किंमत 62.90 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे. कंपनी या वाहनाच्या केवळ मर्यादित युनिट्सची विक्री करीत आहे, या कारचे उत्पादन स्थानिक स्तरावर केले जात आहे. ग्राहक 1 लाख रुपये देऊन या लक्झरी कारची बुकिंग करू शकतात. कार बुक करणाऱ्या पहिल्या 40 ग्राहकांना भारतातील लोकप्रिय रेसट्रॅकमध्ये क्यूरेट ड्रायव्हर ट्रेनिंग (क्युरेट चालक प्रशिक्षण) दिले जाईल आणि त्याचे प्रमाणपत्रदेखील दिलं जाईल. (Book BMW M340i car in Rs 1 lakh, company Giving free driving training)

BMW M340i एक ऑल-व्हील ड्राइव्ह सेटअपसह येणारी सर्वात वेगवान कार आहे. ही कार 3.0 लीटर, 6 सिलेंडर इंजिनासह सादर करण्यात आली आहे. या कारचे इंजिन 387 बीएचपी पॉवर आणि 500 ​​एनएम टॉर्क जनरेट करते. ही कार अवघ्या 4.4 सेकंदात 100 किमी प्रतितास किंवा त्याहून अधिक गती धारण करण्यास सक्षम (स्पीड घेते) आहे. त्यामुळे ही कार तिच्या सेगमेंटमधील उर्वरित कारपेक्षा खूपच वेगवान कार आहे, असे म्हणता येईल. या कारच्या इंजिनला पॅडल शिफ्टर्ससह 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनची सुविधा आहे. बीएमडब्ल्यू M340i ला इलेक्ट्रिकली मॅनेज करण्यासाठी नवीन लिफ्ट-रिलेटेड डम्पर कंट्रोल देण्यात आला आहे.

All new BMW M340i सेडानमध्ये काय आहे खास

  • >> कारमध्ये अ‍ॅडॉप्टिव्ह एम सस्पेंशन रायडिंग आणि इलेक्ट्रॉनिक कंट्रोल्ड डंपरसह हँडलिंगचा उत्कृष्ट कॉम्बो सादर करण्यात आला आहे.
  • >> एम-स्पेशल चेसिस ट्यूनिंग, बीएमडब्ल्यू एक्सड्राईव्ह ऑल-व्हील ड्राईव्ह आणि एम स्पोर्ट रियर ट्रॅक आणि रोडवर उत्कृष्ट परफॉर्मन्सं देतात.
  • >> बाहेरच्या बाजूला नवीन बीएमडब्लू M340i मध्ये क्रोम bezels, शार्प हेडलाइट्स आणि बम्पर असलेली एक नवीन ग्रिल आहे.
  • >> कारमध्ये 18 इंचांची चाके आहेत जी 19 इंचाच्या पर्यायासह अपग्रेड केली जाऊ शकतात. यात ड्युअल आउटलेटसह डिटेल्ड एलईडी टेललाईट्स आणि एम स्पोर्ट एक्झिटचा एक सेट देखील आहे.
  • >> नवीन BMW M340i ला केबिनमध्ये स्टँडर्ड 3 सिरीज सेडान आणि काही नवीन अपडेट्स देखील मिळतात. यात सनरूफपासून 12.3 इंचांचं इंस्ट्रूमेंट पॅनल आणि कनेक्टिव्हिटी टेक्नोलॉजीसह 10.25 इंचांची टचस्क्रीन देण्यात आली आहे.
  • >> यात ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, एम्बिएंट लायटिंग, एक्सटेंडेड स्टोरेज आणि ऑटोमॅटिक डिमिंग रियर-व्ह्यू मिररदेखील मिळतो.
  • >> कारमध्ये कनेक्टिव्ह पॅकेज प्लससह 8.8-इंचांचा कंट्रोल डिस्प्ले देखील आहे, ज्यामध्ये रीयल-टाइम ट्रॅफिक इन्फॉर्मेशन, रिमोट सर्व्हिसेस, कंसीयज सर्विसेज आणि अॅपल कारप्ले यांचा समावेश आहे.

इतर बातम्या

Renault Kiger खरेदी करताय? इतके महिने वाट पाहावी लागेल

Mercedes-Benz ची लक्झरी E-Class चं नवं फेसलिफ्ट मॉडेल लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Photos | Kia ची इलेक्ट्रिक कार EV6 चा फर्स्ट लूक जारी, नव्या डिझाईनसह कार सादर होणार

(Book BMW M340i car in Rs 1 lakh, company Giving free driving training)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.