अवघ्या 10 हजारात बुक करा किफायतशीर इलेक्ट्रिक कार, सिंगल चार्जवर 200km धावणार
प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. (Strom R3 electric car)
नवी दिल्ली : प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरी पार गेल्या आहेत, तर काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती 90 रुपयांच्या पुढे आहेत. त्यामुळे 2021 मध्ये अनेक दिग्गज वाहन कंपन्या इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत. पूर्वी इलेक्ट्रिक कार्सच्या बजेटमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिले नाही. कार कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स, बाईक आणि स्कूटर लाँच करत आहेत. दरम्यान, आता एक थ्री व्हीलर इलेक्ट्रिक कार भारतात दाखल झाली असून या कारसाठी बुकिंगला सुरुवात करण्यात आली आहे. (Bookings of Strom R3 three-wheeler electric car open in India)
Strom मोटर्स ने भारतात त्यांची ऑल-इलेक्ट्रिक R3 थ्री-व्हीलरसाठी 10,000 रुपयांच्या टोकन अमाऊंटवर बुकिंग सुरु केलं आहे. या वाहनाला कंपनीने स्पोर्टी लुक प्रदान केला आहे. या कारमध्ये 2-सीटर केबिन असून ज्यामध्ये अनेक सुविधा प्रदान करण्यात आल्या आहेत. ही कार 80kmph च्या टॉप स्पीडने धावू शकते. तसेच एकदा चार्ज केल्यानंतर ही कार 200 किमीपर्यंतचा प्रवास करते. Strom R3 चं डिझाईन खूपच वेगळं आणि दमदार आहे. या कारमध्ये कंपनीने छोटं बोनट, मोठं ब्लॅकआउट ग्रील ज्यामध्ये हेडलाइट्स वाईड एयर ड्रॅम देण्यात आले आहेत.
या कारच्या साईडला तुम्हाला ब्लॅक्ड आऊट बी पीलर्स, ORVMs, अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. कारच्या मागच्या बाजूला टेललाईट्स देण्यात आले आहेत. ही इलेक्ट्रिक कार 2,907 mm लांब, 185 mm रुंद आणि 550 किलो वजनाची आहे. Strom R3 मध्ये एक सनरूफ, ऑटो क्लायमेट कंट्रोल, पॉवर विंडो, रिमोट कीलेस एंट्री, 12 वे अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट आणि 3-स्पोक स्टीयरिंग व्हीलसह 2-सीटर केबिन देण्यात आली आहे.
इंटीरियर आणि फीचर्स
या कारमध्ये 4.3 इंचांचं टचस्क्रीन डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, आयओटी-सक्षम कंटिन्यूअस मॉनिटरिंग सिस्टिमसह 7.0 इंचांचं वर्टिकल-पोस्ट टचस्क्रीन कन्सोल आणि सहायक 2.4 इंच टचस्क्रीन युनिट देण्यात आलं आहे. Strom आर 3 एक लिथियम-आयन बैटरी पॅक आणि एका इलेक्ट्रिक मोटरद्वारे चालते. जे 20hp / 90Nm पॉवर आणि टॉर्क देते. ही कार 80 किमी / तास वेगाने धावू शकते, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. एकदा चार्ज केल्यानंतर ही कार 200 किमीपर्यंतचा प्रवास करु शकते.
ही कार ब्रेकिंग आणि तीन ड्रायविंग मोड्ससह येते. इको, नॉर्मल आणि स्पोर्ट्स असे मोड्स यात देण्यात आले आहेत. अवघ्या तीन तासात या कारची बॅटरी पूर्णपणे चार्ज होऊ शकते. Strom R3 ही कार 2018 मध्ये पहिल्यांदाच सादर करण्यात आली होती. परंतु तेव्हा ही कार भारतीय मार्केटमध्ये लाँच करण्यात आली नव्हती. विशेष म्हणजे या कारची किंमत 4.5 लाख रुपये असून कंपनीने या कारसोबत 3 वर्षांची वॉरंटी दिली आहे.
इतर बातम्या
एकदा चार्ज केल्यावर 452KM धावणार, 1.5 लाखांच्या डिस्काऊंटसह ‘ही’ इलेक्ट्रिक कार विक्रीस उपलब्ध
ह्युंदायचा इलेक्ट्रिक SUVs चा धडाका, भारतात 3200 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार
Renault Kiger चं कोणतं वेरिएंट तुमच्या खिशाला परवडेल? जाणून घ्या सर्व किंमती
Skoda ची पहिली मेड इन इंडिया SUV 18 मार्चला लाँच होणार
(Bookings of Strom R3 three-wheeler electric car open in India)