Budget SUV : टाटा पंच की सिट्रोन सी 3? बजेट एसयुव्ही घेत असाल तर जाणून घ्या कोणती आहे बेस्ट?

दोन्ही कार आपआपल्या व्हेरिएंटमध्ये एकदम परफेक्ट आहेत. टाटा पंचची (Tata Punch) किंमत 5.93 लाख रुपये आहे. सिट्रोन सी 3 ची किंमत 5.71 लाख रुपये इतकी आहे.

Budget SUV : टाटा पंच की सिट्रोन सी 3? बजेट एसयुव्ही घेत असाल तर जाणून घ्या कोणती आहे बेस्ट?
Follow us
| Updated on: Jul 31, 2022 | 11:35 AM

जुलैच्या आधीपर्यंत भारतात सर्वात स्वस्त कॉम्पॅक्ट एसयुव्ही कारचा मान टाटा पंचजवळ (Tata Punch) होता. या कारची सुरुवातीची किंमत 6 लाख रुपयांपेक्षाही कमी होती. परंतु जुलैमध्ये सिट्रोन सी 3 (Citroen C3) कार लाँच करण्यात आली आहे;  ही देखील एक कॉम्पॅक्ट एसयुव्ही कार आहे. या कारमध्ये अनेक चांगले फीचर्स देण्यात आले आहेत. दोन्ही कार आपआपल्या व्हेरिएंटमध्ये (variant) एकदम परफेक्ट आहेत. दोन्हींमध्ये आपली वेगळी वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे ज्या वेळी आपण एखादी बजेट एसयुव्ही घेण्याचा विचार करतो तेव्हा साहजिकच या दोन कारपैकी कोणती घ्यावी, असा प्रश्‍न निर्माण होत असतो. आज आम्ही या लेखातून या सर्व प्रश्‍नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करणार असून, दोघांमधील फरक देखील सांगणार आहोत.

कारची किंमत

टाटा पंचची किंमत 5.93 लाख रुपये आहे. सिट्रोन सी 3 ची किंमत 5.71 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. सिट्रोन कारमध्ये 1198 सीसी इंजिन देण्यात आले असून, सिट्रोन सी 3 आणि टाटा पंच या दोन्ही कार्समध्ये पेट्रोल इंजिनचा पर्याय देण्यात आला आहे. सिट्रोनचा दावा आहे, की सी 3 कार एक लिटरमध्ये 19.8 किलोमीटर प्रतिलीटरचे मायलेज देऊ शकते. तर दुसरीकडे टाटा पंच 18.9 किलोमीटर प्रतिलीटरचा मायलेज देते.

दोन इंजिन पर्याय

दरम्यान, सिट्रोन सी 3 ला दोन इंजिन पर्यायांमध्ये सादर करण्यात आले आहे. यामधील एक 1.2 लीटर नॅच्यूरल आस्पेरेटेड पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 81 बीएचपीची पॉवर आणि 155 एनएमचा पीक टार्क जनरेट करु शकतो. या शिवाय दुसरे टर्बो पेट्रोल पर्याय देण्यात आला आहे. या इंजिन सेटअपध्ये 1.2 लीटर मिल जनरेटिंग 109 बीएचपीची पॉवर आणि 190 एनएमचा टार्क मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा

सिट्रोन सी 3 चे फीचर्स

यात 10 इंचाचा टच स्क्रीन डिसप्ले देण्यात आला आहे. हा डिसप्ले इंफोटेनमेंट सिस्टमसह उपलब्ध होईल.यात वायरलेस अँड्रोईड ऑटो आणि ॲप्पल कार प्ले कनेक्टिव्हीटी उपलब्ध आहे. यात चार स्पीकरचा ऑडिओ सिस्टम देण्यात आली आहे. यात ड्युअल फ्रंट एअरबॅग, सीट बेल्ट रिमाइंडर, रिव्हर्स पार्किंग सेंसर, एबीएससह ईबीडी सेंसर देण्यात आले आहे.

टाटा पंच फीचर्स

ही एक कॉम्पॅक्ट एसयुव्ही कार आहे. यात स्लीक आणि मॉडर्न डिझाईनचा वापर करण्यात आला आहे. यात एक स्पिल्ट हेडलँप सेटअप देण्यात आला आहे. समोरच्या ग्रील आणि स्पोर्टी बंपर देण्यात आले आहे. यात एलईडी टेल लाइट्‌स आणि मशिन कट अलॉय व्हील्सचा वापर करण्यात आला आहे.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.