ब्रेक झाले फेल, तर वाहन थांबवणार कसे? जाणून घ्या पहिल्यांदा काय करावे

Brake Fail : कार चालवताना कारचा ब्रेक अचानक फेल झाला तर किती मोठे संकट ओढावेल नाही? ब्रेक अचानाक निकामी झाल्यावर सहाजिकच कोणीही घाबरु शकते. पण अशावेळी प्रसंगावधान राखणे गरजेचे आहे. त्यामुळे कारवर तुमचे नियंत्रण राहिल आणि अपघात घडणार नाही.

ब्रेक झाले फेल, तर वाहन थांबवणार कसे? जाणून घ्या पहिल्यांदा काय करावे
ब्रेक झाले फेल, आता करा हा उपाय
Follow us
| Updated on: May 07, 2024 | 2:41 PM

कार चालविणे हे कौशल्याचे काम आहे. वाहन चालविताना अनेकदा समोर अचानक कोणी तरी येते. समोरील वाहनाचा ब्रेक अचानक लागतो वा इतर अनेक आव्हानं समोर येतात. अशावेळी तुमची जागरुकताच नाही तर समयसूचकता उपयोगी पडते. अचानक वाहनाचा ब्रेक निकामी झाल्यास कोणीही घाबरुन जाईल. अशावेळी घाबरु नका. वेळीच योग्य निर्णय घेतल्यास, प्रसंगावधान दाखविल्यास मोठी हानी टळू शकेल. अपघात होणार नाही. अशावेळी काय करावे लागले?

सर्वत अगोदर करा हे

ब्रेक निकामी झाल्यावर सर्वात अगोदर घाबरु नका. शांत राहण्याचा प्रयत्न करा. सयंम ठेवा. ब्रेक फेल झाल्यावर हॉर्न वाजवा. ज्यामुळे इतर चालकांना काहीतरी गडबड असल्याची सूचना मिळेल. ते तुमच्या कारपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतील. ब्रेक फेल झाल्यावर टॉप गिअरवरुन खालच्या गिअरकडे या. त्यामुळे कारचा वेग कमी होईल.

हे सुद्धा वाचा

पार्किंग ब्रेकचा वापर

तज्ज्ञांच्या मते ब्रेक निकामी झाली तर गिअर चेंज करा. त्यानंतर पार्किंग ब्रेकचा हळूहळू वापर करा. अनेक आव्हानात्मक स्थिती हा ब्रेक कारचा वेग कमी करण्यास मोठी मदत करतो. कारची चाकं लॉक करण्यासाठी पार्किंग ब्रेकचा एकदम वापर करु नका. नाहीतर कार पलटी होण्याची अधिक भीती असते.

हा उपाय करा

ब्रेक फेल झाले असले तरी ब्रेक पॅडल सतत दाबत राहा. परिणामी कारचा वेग कमी होण्यास मदत मिळू शकते. अशा प्रसंगात कारचे हँडल सोडू नका. ते दिशा देण्यासाठी आणि सुरक्षित स्थळी पोहचण्यासाठी मदतीला येईल. कारचा वेग कमी झाला तर पटांगण पाहून ती थांबवण्याचा प्रयत्न करता. सुरक्षित स्थळ शोधा. त्यामुळे कोणाला इजा होणार नाही.

ही गोष्ट लक्षात ठेवा

अशावेळी कारचे इंजिन बंद करु नका. ब्रेक फेल झाल्यावर ही गोष्ट अगदी पक्की लक्षात ठेवा. इंजिन बंद झाले तर कारवर नियंत्रण राहणार नाही. कारचा वेग कमी झाल्यास, कारच्या हँडब्रेकचा वापर करा. कारचा वेग कमी झाला तर वाळूचा ढिगारा, मातीचा ढिगारा अथवा एखाद्या वस्तूला ठोस द्या. त्यामुळे कार थांबेल. पण तुम्हाला इजा होणार नाही आणि कारचे पण मोठे नुकसान होणार नाही.

नियमित सर्व्हिंसिंग करा

कारच्या मेंटेन्सकडे जरुर लक्ष द्या. ब्रेक सिस्टम अगोदर तपासून घ्या. नियमीत त्याची तपासणी करा. ब्रेक सिस्टिम सातत्याने चेक करा. एखाद्या मॅकेनिकला ते दाखवा. कारचे ब्रेक फेल झाले तर सर्वात अगोदर ती रस्त्याच्या कडेला घेऊन वेग कमी करण्याचा प्रयत्न करा.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.