शानदार ऑफर! Maruti Suzuki Alto कार अर्ध्या किंमतीत खरेदीची संधी
ही कार खरेदी केल्यावर तुम्हाला 7 दिवसांची मनी बॅक गॅरंटी देखील मिळेल. दुसरीकडे, जर तुमचे बजेट कमी असेल तर कंपनी या कारवर कर्जाची सुविधा देखील देते. यासाठी तुम्हाला झिरो डाउनपेमेंट करावे लागेल आणि तुम्हाला दर महिन्याला 5,821 रुपये ईएमआय म्हणून भरावे लागतील.
मुंबई : तुम्हाला एखादी कार खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला कार खरेदी करता येत नसेल, अथवा त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार ऑफरबद्दल (Discount Offer) माहिती देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही अगदी कमी किंमतीत कार खरेदी करु शकाल. कोरोना काळात आपल्याकडे स्वतःची वैयक्तिक कार असणे गरजेजे झाले आहे. जर आपण सेकंड हँड कार (Second Hand Car) विकत घेण्याचा विचार करत असाल परंतु बजेटमुळे (Budget) चिंतेत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार डीलबाबत माहिती देणार आहोत.
आम्ही ज्या कारबद्दल तुम्हाला सांगत आहोत ती कार तुम्हाला शोरुममधून खरेदी करायची असेल तर तुम्हाला 4.50 लाख रुपये मोजावे लागतील. तसेच सध्या इंधनाचे दर गगनाला भिडलेले असताना ग्राहक अधिक मायलेज देणाऱ्या गाड्या घेण्यावर भर देत आहेत. त्यामुळे ही डील तुमच्यासाठी परफेक्ट आहे. आज आम्ही तुम्हाला मारुती सुझुकी अल्टो एलएक्सआय (Maruti Suzuki Alto 800 LXI ) कारच्या एका डीलबाबत माहिती देत आहोत. कंपनीने ही कार वेगवेगळ्या प्रकारांमध्ये लॉन्च केली आहे.
Maruti Alto 800 LXI चं हे 2014 मधील मॉडेल असून ही पेट्रोल कार आहे. ही सेकेंड ओनर कार असून महाराष्ट्रातल्या MH14E या आरटीओमध्ये रजिस्टर्ड आहे. यामध्ये 796 सीसी क्षमतेचं इंजिन देण्यात आलं आहे. यामध्ये मॅन्यूअल ट्रान्समिशनचा पर्याय आहे. ही कार आतापर्यंत 22,626 किमी धावली आहे. या कारवर थर्ड पार्टी इन्श्योरन्स उपलब्ध आहे. हे वाहन सध्या CARS24 वर सूचीबद्ध आहे, जिथे त्याची किंमत 2,49,999 रुपये ठेवण्यात आली आहे. यामध्ये मॅन्युअल ट्रान्समिशनचा पर्याय उपलब्ध आहे.
मनी बॅक गॅरंटी
ही कार खरेदी केल्यावर तुम्हाला 7 दिवसांची मनी बॅक गॅरंटी देखील मिळेल. दुसरीकडे, जर तुमचे बजेट कमी असेल तर कंपनी या कारवर कर्जाची सुविधा देखील देते. यासाठी तुम्हाला झिरो डाउनपेमेंट करावे लागेल आणि तुम्हाला दर महिन्याला 5,821 रुपये ईएमआय म्हणून भरावे लागतील. तसेच कंपनीने फ्री होम डिलीव्हरीचा पर्यायदेखील दिला आहे. या कारवर 6 महिन्यांची वॉरंटीदेखील मिळेल.
महत्त्वाची सूचना : जर आपण ही सेकंड हँड कार घेणार असाल तर सर्व बाजूंनी कार तपासून पाहा. कारचं डेंटिंग आणि पेंटिंग तपासा. कार मालकाचे कागदपत्र तपासा. त्याच वेळी, कार आणि कागदपत्रांची कसून चौकशी केल्यानंतरच ही कार खरेदी करा. तसेच बातमीत दिलेली माहिती ही CARS24 वरुन घेतली आहे.
इतर बातम्या
आता इलेक्ट्रिक गाड्यांमधल्या बॅटरी रिसायकल होणार, Ford आणि Volvo ने सुरु केली स्टार्टअप कंपनी
BMW ची इलेक्ट्रिक Mini Cooper SE भारतात लाँचिंगसाठी सज्ज, कशी असेल नवीन EV?