मुंबई : तुम्हाला एखादी बाईक खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला बाईक खरेदी करता येत नसेल, अथवा त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार ऑफरबद्दल माहिती देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही अगदी कमी किंमतीत बाईक खरेदी करु शकाल. (Buy Bajaj Pulsar 150Dts-i bike in just Rs 33000)
आज आम्ही तुम्हाला अशा एका वेबसाइटबद्दल माहिती सांगणार आहोत ज्यावरून तुम्ही अगदी कमी किंमतीत बाईक खरेदी करू शकता. यावर तुम्हाला कमी किंमतीत दुचाकी आणि स्कूटर दोन्ही खरेदी करता येतील. CredR असं या या वेबसाईटचं नाव आहे. या वेबसाईटवर तुम्हाला सर्व प्रकारच्या सेकेंड हँड बाईक्स आणि स्कूटर खूपच कमी किंमतीत मिळतील. CredR जुन्या बाइक्सचं नूतनीकरण करून त्या बाईक्सची विक्री करते. सोबतच वॉरंटी आणि RC हस्तांतरणाची सुविधादेखील प्रदान करते.
CredR वर तुम्हाला केवळ 33,000 रुपयांमध्ये नुतनीकरण करण्यात आलेली Bajaj Pulsar 150Dts-i बाईक खरेदी करता येईल. ही बाईक 149cc ची आहे. वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार ही एक सेकेंड ओनर बाईक आहे. ही बाईक खरेदी केल्यास तुम्हाला 7 दिवसांचा बाय प्रोटेक्ट, 6 महिन्यांची वारंटी, अश्योर्ड आरसी ट्रान्सफरची सुविधा दिली जाईल.
ग्राहक या लिंकवर (https://www.credr.com/all-used-bikes-in-Bangalore-Indira-Nagar/Bajaj-Pulsar-150Dts-i/17998) जाऊन या बाईकबाबतची माहिती घेऊ शकतात. ही बाईक बंगळुरुमध्ये उपलब्ध आहे. तसेच वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार ही बाईक फक्त 33,000 किलोमीटर धावली आहे. तसेच केवळ 399 रुपये देऊन तुम्ही या बाईकची डोरस्टेप डिलिव्हरी प्राप्त करु शकता. तसेच शोरुमवर जाऊन तुम्ही या बाईकबाबतची माहिती घेऊ शकता.
या बाईकची मूळ किंमत (एक्स-शोरूम) जवळपास 80 हजार रुपये आहे. यामध्ये 149 सीसी चे 4 स्ट्रोक, 2-वॉल्व, ट्विन स्पार्क BSIV कंप्लायंट DTS-i इंजिन देण्यात आले. हे इंजिन 8,000 आरपीएम वर 14 पीएस पॉवर आणि 6000 आरपीएम वर 13.4 एनएम टॉर्क जनरेट करते. त्याच्या फ्रंटमध्ये अँटी-फ्रिक्शन बुशसह टेलिस्कॉपिक सस्पेंशन आहे. मागील बाजूस आपल्याला 5-वे अॅडजस्टेबल, नायट्रॉक्स शॉक एब्सॉर्बर सस्पेंशन मिळेल. बाईकच्या पुढील बाजूस 240 मिमी डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस 130 मिमी ड्रम ब्रेक मिळतील. या बाईकचे वजन 144 किलो आहे.
(सूचना : या बातमीत संबंधित बाईकबद्दल दिलेली माहिती ही CredR वेबसाईटवरुन घेतली आहे. अधिक माहितीसाठी संबंधित वेबसाईटवर संपर्क साधावा.)
इतर बातम्या
Hyundai Alcazar SUV ची वाट पाहणाऱ्यांसाठी वाईट बातमी, कंपनीने लाँचिंगबाबतचा निर्णय बदलला
Mahindra वाहनधारकांसाठी खुशखबर! कोरोनाच्या परिस्थितीत ग्राहकांसाठी कंपनीचा मोठा निर्णय
वाहनांच्या टायर्सबाबत नव्या नियमावलीचा प्रस्ताव, 1 ऑक्टोबरपासून लागू होणारे नियम काय?
(Buy Bajaj Pulsar 150Dts-i bike in just Rs 33000)