7 रुपयात 100 KM प्रवास करा, ‘ही’ इलेक्ट्रिक बाईक चालवण्यासाठी रजिस्ट्रेशन, लायसन्सची गरज नाही

मुंबई : प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरी पार गेल्या आहेत, तर काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती 90 रुपयांच्या पुढे आहेत. त्यामुळे 2021 मध्ये अनेक दिग्गज वाहन कंपन्या इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत. पूर्वी इलेक्ट्रिक व्हीकल्सच्या बजेटमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु […]

7 रुपयात 100 KM प्रवास करा, 'ही' इलेक्ट्रिक बाईक चालवण्यासाठी रजिस्ट्रेशन, लायसन्सची गरज नाही
Follow us
| Updated on: Mar 06, 2021 | 5:45 PM

मुंबई : प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरी पार गेल्या आहेत, तर काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती 90 रुपयांच्या पुढे आहेत. त्यामुळे 2021 मध्ये अनेक दिग्गज वाहन कंपन्या इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत. पूर्वी इलेक्ट्रिक व्हीकल्सच्या बजेटमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिले नाही. वाहन कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स, बाईक आणि स्कूटर लाँच करत आहेत. हैदराबादस्थित स्टार्टअप कंपनी Atumobiles Pvt Ltd ने एक शानदार आणि किफायतशीर इलेक्ट्रिक बाईक लाँच केली आहे. (Buy Electric Bike Atum 1.0 and travel more than 100 kilometer in Rs 7)

Atumobiles Pvt Ltd ने गेल्या वर्षी अ‍ॅटम 1.0 (Atum 1.0) ही इलेक्ट्रिक मोटरसायकल बाजारात सादर केली होती. या बाईकची किंमत 50,000 रुपयांपासून सुरू होते. लॉन्च झाल्यापासून या बाईकला आतापर्यंत 400 हून अधिक बुकिंग्स मिळाल्या आहेत, त्याचबरोबर या बाईकची डिलिव्हरी देखील सुरू करण्यात आली आहे. सुरुवातीला कॅफे-रेसर शैलीची ही इलेक्ट्रिक बाइक Atum 1.0 केवळ 10 ग्राहकांना देण्यात आली आहे. ही बाईक इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नोलॉजी (ICAT) द्वारे सर्टिफाईड (प्रमाणित) आहे.

इतर बाईक्सच्या तुलनेत सर्वोत्तम

या इलेक्ट्रिक बाईकचा वापर करुन तुम्ही केवळ 7 ते 8 रुपयांच्या किंमतीत 100 किमीपर्यंतचा प्रवास करू शकता. जर तुम्ही सामान्य पेट्रोल बाईक किंवा स्कूटर्सचा विचार केलात तर 100 किलोमीटरपर्यंतचा प्रवास करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 110 ते 120 रुपये खर्च करावे लागतील. त्यामुळे ही इलेक्ट्रिक बाईक इतर बाईक्सच्या तुलनेत बेस्ट ठरते.

7 रुपयांमध्ये 100 किलोमीटरपर्यंत प्रवास करा

ही बाईक पूर्णपणे चार्ज करण्यासाठी 3 ते 4 तास लागतात. ही बाईक नॉर्मल थ्री-पिन सॉकेटद्वारे चार्ज करता येते. यामध्ये एक 48V, 250W इलेक्ट्रिक मोटर वापरण्यात आली आहे. Atum 1.0 ची बॅटरी एकदा फुल चार्ज केल्यानंतर ही बाईक तब्बल 100 किलोमीटपर्यंतची रेंज देते असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. या बाईकवरील खर्चाचा विचार केला तर ही बाईक 7 ते 8 रुपयांमध्ये 100 किमीपर्यंत रेंज देते.

शानदार फीचर्स

या बाईकच्या वैशिष्ट्यांविषयी (फीचर्स) बोलायचे झाल्यास, यात एलईडी टर्न इंडिकेटर, एलईडी हेडलॅम्प्स, स्टायलिश कॅफे-रेसर डिझाईन, एलईडी टेललाईट्स, आरामदायक सीट, डिजिटल डिस्प्ले, गो-वेट फॅट टायर्स आणि 280 मिमी ग्राऊंड क्लीयरन्स मिळेल. विशेष म्हणजे ही बाईक खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायस्न्स (चालक परवाना) नसलं तरी चालेल. तसेच या बाईकचे रजिस्ट्रेशन करण्याचीदेखील गरज नाही. तसेच कोणत्याही वयाचे लोक ही बाईक चालवू शकतात.

इतर बातम्या

बाईकमध्ये पेट्रोल इंजिनऐवजी बॅटरी बसवण्याला प्राधान्य, खर्च किती?

सिंगल चार्जवर 420 KM धावणार, Volvo ची C40 Recharge इलेक्ट्रिक कार सादर

9 मार्चला नव्हे ‘या’ दिवशी लाँच होणार बहुप्रतीक्षित Electric Jaguar I-Pace, बॅटरीवर 8 वर्षांची वॉरंटी

(Buy Electric Bike Atum 1.0 and travel more than 100 kilometer in Rs 7)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.