मुंबई : तुम्हाला एखादी स्कूटर खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला स्कूटर खरेदी करता येत नसेल, अथवा त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार ऑफरबद्दल माहिती देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही अगदी कमी किंमतीत होंडा अॅक्टिव्हा स्कूटर खरेदी करु शकाल. (Buy Honda Activa in just 25000 rupees)
जर कोणी तुम्हाला असे सांगितले की, आपल्याला 70 हजार रुपये किंमत असलेली होंडा अॅक्टिव्हा स्कूटर (Honda Activa) फक्त 25 हजार रुपयात मिळेल, तर तुम्ही निश्चितपणे थोडासे सावध व्हाल. परंतु यात धक्का बसण्यासारखे काहीही नाही, कारण आम्ही आपल्याला अशाच एका डीलबाबत सांगणार आहोत. वास्तविक, दुचाकी वाहनांमध्ये होंडा अॅक्टिव्हाची क्रेझ अद्याप अबाधित आहे, म्हणून नवीन किंवा जुन्या होंडा अॅक्टिव्हा या स्कूटरला नेहमीच मागणी असते. तसेच या स्कूटरला रिसेल व्हॅल्यूदेखील चांगली मिळते. चला तर मग या खास डीलबाबतची माहिती घेऊया.
काहींना Droom प्लॅटफॉर्मबद्दल माहिती असेलच, किंवा तुम्हाला याबाबत माहिती नसली तरी काळजी करु नका, आम्ही तुम्हाला त्याबद्दलही सांगणार आहोत. Droom हा असा प्लॅटफॉर्म आहे, ज्याद्वारे तुम्ही कार, स्कूटर आणि बाईक ऑनलाइन खरेदी करु शकता. या प्लॅटफॉर्मवर होंडा अॅक्टिव्हाची एक डील उपलब्ध आहे. ज्यात केवळ 25 हजार रुपयांमध्ये होंडा अॅक्टिव्हा स्कूटर उपलब्ध आहे. ही एक दिल्लीतली फर्स्ट ओनर बाईक आहे.
25 हजार रुपयांमध्ये विकली जाणारी ही होंडा अॅक्टिव्हा केवळ 18 हजार किलोमीटर धावली आहे. हे या स्कूटरचे 2013 चे मॉडेल आहे. ही एक 110 सीसी स्कूटर आहे. या स्कूटीचे मायलेज 55 Kmpl इतके सांगण्यात आले आहे. या स्कूटीच्या मॅक्स पॉवरबद्दल सांगायचे तर ते 8 बीएचपी असून चाकाचा आकार 10 इंचाचा आहे. या स्कूटीमध्ये ऑटो आणि किक स्टार्ट सुविधा आहेत. सेफ्टी फीचर्स, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, अँटी थेफ्ट अलार्म, इत्यादी फीचर्स देण्यात आले आहेत.
या स्कूटरमध्ये ड्रम ब्रेक सिस्टम आहे. तर स्कूटरचा डायमेन्शन व्हीलबेस 1238 मिमी, रुंदी 710 मिमी, लांबी 1761 मिमी, उंची 1147 मिमी आणि ग्राउंड क्लीयरन्स 153 मिमी आहे. तुमच्या माहितीसाठी सांगत आहोत की, जर तुम्ही सेकेंड हँड मार्केटमधून स्कूटी किंवा कोणतेही वाहन खरेदी करत असाल तर त्या वाहनाची कागदपत्रे नीट तपासून पाहा. ते वाहन चोरीचे तर नाहीये ना, याची खात्री करुन घ्या. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच व्यक्तीला पैसे द्या ज्याच्या नावावर आरसी नोंदणीकृत आहे. या व्यतिरिक्त वाहनाचे डेंट, इंजिन आणि आवश्यक वस्तू तपासून पहा. अशा वेळी सोबत एखाद्या मेकॅनिक मित्राला किंवा ओळखीच्या मेकॅनिकला घेऊन जाणं सर्वात उत्तम ठरेल.
(सूचना : या बातमीत संबंधित स्कूटरबद्दल दिलेली माहिती ही Droom वेबसाईटवरुन घेतली आहे. अधिक माहितीसाठी संबंधित वेबसाईटवर संपर्क साधावा.)
इतर बातम्या
Hero MotoCorp 16 मेपर्यंत दुचाकींची निर्मिती करणार नाही, जाणून घ्या कारण
Royal Enfield घेऊन लेह लडाखला जाण्याचा प्लॅन करताय, 3-4 महिने वाट पाहावी लागणार
इंधन दरवाढीवर जालीम उपाय, एकदा चार्ज करा आणि सुस्साट फिरा, 130KM रेंजसह ई. स्कूटर बाजारात
(Buy Honda Activa in just 25000 rupees on Droom Platform)